- Homepage
- ताज्या बातम्या
- बाजार-भाव
- शेतीविषयक
- कृषी-चर्चा
- हवामान
- पशु पालन
- इंडस्ट्री
- सरकारी योजना
- ग्रामीण उद्योग
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Neha Sharma
सध्या शेतकऱ्यांना पाचट जाळण्यापासून रोखण्यासाठी राज्य सरकारांच्या स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे. यामुळे यावर उपाय काढण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. यावर उत्तर प्रदेशात योगी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे यावर आळा बसेल, असे म्हटले जात आहे. युपीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी पाचट जाळले असेल, अशा प्रकरणात त्यांचा समावेश असेल, अशा शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे दिले जाणार नाहीत असा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांत पाचट जाळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे दिल्लीमधील वायू प्रदूषण घातक स्तरावर पोहोचले आहे. सरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतरही प्रदूषणाचा स्तर घटलेला नाही. यामुळे…
महागाई मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. यावर्षी ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांरी चांगलाच आनंदात आहे. आत्ता सध्या ज्वारी या धान्याचेही दर गगनाला भिडले आहेत. सध्या शेतकऱ्यांना ज्वारीचे चांगले दर मिळत आहेत. ज्वारीला चांगले दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ज्वारीचे पीक घेतले जाते. मात्र दरवर्षी राज्यभरात ज्वारीला हजार ते पंधराशे रुपये क्विंटल दर मिळत असतो, मात्र यावर्षी ज्वारीचे दर तेजीत असल्याचे चित्र नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत दिसून येत आहे. नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती चांगल्या प्रतीच्या ज्वारीला प्रतिक्विंटल 2966 रुपयांचा दर मिळत असून, हा आजपर्यंतचा सर्वाधिक दर असल्याचे व्यापारी आणि शेतकरी सांगतात बाजार समितीत दररोज…
अमेरिकेच्या पर्यावरण सुरक्षा एजन्सीचा निष्कर्ष पुणे : ग्लायफोसेट तणनाशकाचा वापर ‘लेवल’ नुसार केल्यास ते धोकादायक नसल्याचा निष्कर्ष अमेरिकेच्या पर्यावरण सुरक्षा एजन्सीने दिला. तथापि, भारताने पेस्ट कंट्रोल ऑपरेटरच्या (पीसीओ) माध्यमातूनच त्याच्या वापरावर निर्बंध घातले आहेत. सरकारचा हा निर्णय हितकारक असल्याचे मत काही तज्ज्ञांकडून व्यक्त होताना दुसरीकडे त्याची उपयुक्तता व गरजही प्रयोगशील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. ‘पीसीओं’चा शेतीत वापर ही संकल्पना आजतरी अव्यावहारिक, अविकसित असून त्यांची पुरेशी उपलब्धता, अनुभव, कौशल्य आदींबाबतही प्रश्नचिन्हे उभी ठाकली आहेत. शेतकरी, मजूर, पदवी विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करून प्रमाणित परवानाधारक ‘पीसीओ’ यंत्रणा उभारणे शक्य असल्याचे मतही तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. ग्लायफोसेट तणनाशकाचा वापर केवळ ‘पेस्ट कंट्रोल…
गेल्या काही दिवसांपूर्वी आलेल्या कोरोना महामारी आणि लम्पी सारख्या आजारानंतर सध्या दूध धंद्यांत शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळत आहेत. दुधाला सध्या चांगले दर आहेत. यामुळे शेतकरी समाधानी आहे. तसेच सध्या दुभत्या जनावरांना मागणी वाढल्याने त्यांच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. कोरोना काळात महागाईमुळे दूध व्यवसाय पूर्णपणे कोलमडून पडला होता. त्यामुळे नाइलाजाने अनेक शेतकर्यांना गोठ्यातील जनावरांची संख्या कमी करावी लागली. यामुळे शेतकऱ्यांना अनेक संकटाचा सामना करावा लागला. त्या काळात अनेक दूध उत्पादक शेतकरी आर्थिकदृष्ट्या संकटात सापडले होते. कोरोनाच्या काळामध्ये 50 ते 60 हजार रुपये किमत असलेल्या गाईला आता तब्बल 1 लाख रुपयांच्या पुढे मागणी केली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना चार पैसे…
सध्या उसाचा हंगाम सुरु झाले आहेत, यामुळे कारखाने उसाचे दर किती देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असताना उत्तर प्रदेशमधून एक बातमी समोर आली आहे. साखर कारखान्याकडे जवळपास ३५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. प्रशासनाने याबाबत वारंवार निर्देश दिले आहेत. नोटिसा बजावल्या तरीही कारखान्याने याची दखल घेतली नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी हर्षिता माथुर यांच्या निर्देशानंतर जिल्हा ऊस विकास सहकारी समितीचे सचिव अशोक कुमार यांनी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आणि व्यवस्थापन विभागातील सहा अधिकाऱ्यांच्या विरोधात फसवणूक, जीवनावश्यक वस्तू अधिनियम आदी अंतर्गत सोरोंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गळीत हंगाम २०२१-२२ मध्ये कारखान्याकडे ऊस बिलाची ३५.३० कोटी रुपयांची थकबाकी आहे. शिवाय…
ऊस उत्पादक शेतकर्यांनी खासगी वजन काट्यावर केलेले वजन साखर कारखान्यांना नाकारता येणार नसल्याचा निर्वाळा वैध मापनशास्त्र विभागाचे नियंत्रक डॉ. रविंद्र कुमार सिंघल यांनी साखर आयुक्तांना दिलेल्या पत्रात दिला आहे. त्यामुळे काटामारी करुन ऊसच्या मापात पाप करणार्या कारखान्यांना आता चाप बसण्याची अपेक्षा असून बुधवारी साखर आयुक्तालय या बाबतचे परिपत्रक जारी करणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे सोमवारी साखर संकुलवर धडक मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी स्वाभिमानीने उसाच्या वजनातील काटामारी रोखण्यासाठी साखर आयुक्तालयाकडे आणि वैध मापन विभागाकडे पाठपुरावा यशस्वी झाला आहे. त्यादृष्टिने वैध मापन विभागाकडून आलेले स्पष्टीकरण महत्त्वपूर्ण ठरले असून एक प्रकारे स्वाभिमानीची मागणी मान्य झाली आहे. शेतकर्यांनी खासगी वजन काट्यावर…
अतिपावसामुळे चारा सडून गेल्याने आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात आतापासूनच चारा टंचाईचा सामना दूध उत्पादक शेतकर्यांना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकर्यांनी बटाट्याचा पाला, उसाचे वाढे जनावरांना खाऊ घालण्यास सुरुवात केली आहे. दुधाला दर वाढत असतानाच एरव्ही उन्हाळ्यात जाणवणारी चारा टंचाई यंदा हिवाळ्यातच जाणवू लागल्याने दूध उत्पादकांची चिंता वाढली आहे. तालुक्याच्या पूर्व भागात शेतकरी जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर करू लागले आहेत. गेल्या पाच-सहा महिन्यांपासून दुधाच्या दरात चांगली वाढदेखील होत आहे. या भागात खासगी दूध संकलन करणारे व्यावसायिक अधिक प्रमाणात असल्याने त्यांच्यामध्ये दुधाला जादा दर देण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. यामुळे शेतकर्यांना दुधाचे दर आता चांगले मिळू लागले आहेत. दरम्यान, दूध व्यवसायात…
कापूस शेतकऱ्याचे नगदी पीक आहे त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात कापूस पिकाची लागवड करतात. मात्र, यंदा दिवाळीनंतर बाहेरगावातील मजूर कापूस वेचणीला आले नाहीत. त्यामुळे लाख मोलाचे पांढरे सोने मजुरांअभावी शेतातच आहे. मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्याची चिंता वाढली आहे. मात्र काबाडकष्ट मेहनत करून पिकवलेला कापूस वेचून घरी आणता यावा यासाठी शेतकरी मजुरांच्या शोधात फिरताना दिसत आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा संपायला तयार नाही. कधी निसर्गाची अवकृपा तर कधी शासनाचे शेतकरी विरोधी धोरण यामुळे जगाचा पोशिंदा असणा-या शेतकरी राजा संकटात आहे. उत्पादन खर्च जास्त व उत्पादन कमी अशी शेतकऱ्यांची बिकट अवस्था झाली आहे. अशातच वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत असल्याने पिकांवर…
पाथरी तालुक्यातील गुंज येथील शेतकऱ्याच्या सोयाबीनच्या गंजीला शनिवारी (दि. ५) आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये अंदाजे ४० क्विंटल इतकी सोयाबीनची गंजी जळून खाक झाली. ज्ञानोबा कुंडलिकराव नेमाने असे या नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील गुंज शिवारातील चार एकरमधील सोयाबीन काढून गंजी लावून ठेवली होती. शनिवारी (दि. ५) पहाटे ३ च्या सुमारास या गंजीस आग लागल्याने गंजी जाळून खाक झाली. दरम्यान, ही आग नेमकी कशी लागली? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. संबंधित शेतकऱ्याचे दोन ते अडीच लाखांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.
गणेगाव दुमाला (ता. शिरूर) येथे सुमारे ४० एकर ऊसाला अचानक आग लागली. यामध्ये ऊसाचे मोठे नुकसान झाले आहे. या आगीचे कारण मात्र समजू शकले नाहीत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. ६) दुपारी बाराच्या सुमारास गणेगाव दुमाला येथील शितोळे मळा येथील अविनाश शितोळे यांच्या उसाच्या शेताला आग लागली. त्यानंतर दत्तात्रय शितोळे, रामराव गरुड, पोपट गरुड, कोंडीबा गरुड, संतोष गरुड, मानसिंग शितोळे, अमरसिंग शितोळे, दिलीप शितोळे, किसन गरुड, अरुण गरुड, दीपक गरुड, ज्ञानदेव सांगळे, चंद्रकांत कुदळे, महादेव कुदळे, नाना कुदळे या शेतकऱ्यांच्या एकूण ४० एकर ऊस जळून मोठे नुकसान झाले आहे. नागरिकांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. शितोळे वस्तीवरील लग्नसोहळा…
