Author: Neha Sharma

परतीच्या पावसानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांकडून सरकारकडे नुकसानभरपाईची मागणी केली जात आहे. आता नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई मिळावी यासाठी लोकसंघर्ष मोर्चा काढला आहे. लोकसंघर्ष मोर्चातर्फे त्यांनी जिल्‍हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलनाला सुरुवात केली आहे. या जिल्ह्यातील सातपुडाचा दुर्गम भागात आणि तळोदा, अक्कलकुवा तालुक्यात परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. त्यामुळे या भागात ओला दुष्‍काळ जाहीर करावा, तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्यात यावे तसेच आदिवासी बांधवांचे वन हक्क दावे मंजूर करण्यात यावे अशा अनेक मागण्यांसाठी त्यांनी हे आंदोलन केलं आहे. जर येत्या पंधरा दिवसात या मागण्या मान्य नाही झाल्या तर मात्र दिल्लीत आंदोलन करण्यात येईल असा इशारा लोक संघर्ष मोर्चाच्या नेत्या…

Read More

केंद्र आणि राज्य सरकार  योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना साहाय्य करत आहे. शेतकरी आधुनिक शेती  करत असल्याने त्यांच्या उत्पनात वाढ होऊ लागली आहे. शेतकऱ्यांच्या  उत्पनात  अधिक वाढ व्हावी, यासाठी पिकांना योग्य वेळेत आणि पुरेसे सिंचन करता यावे याकरिता राज्य सरकारने एक योजना सुरू केली आहे. या योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना .या योजनेतून शेतकऱ्यांना वीज तर मिळणारच शिवाय पैसाही मिळणार आहे. विजेचा खर्च भागवू न शकणाऱ्या शेतकऱ्यांना स्वस्तात वीज उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे. कमी दरात वीज उपलब्ध झाल्याने संपूर्ण शेतकरी वर्ग विजेचा वापर करू शकेल. या योजनेसाठी जमीन लागणार असून वार्षिक 75 हजार रूपये…

Read More

वरूण राजा निघुण गेला आहे तरी आपण आता रब्बी हंगामातील हरभरा गहु पेरणीसाठी पोषख वातावरण कोणते आहे ते जाणून घेऊ.दि.4,5 नोव्हेबंर राज्यात काही भागात अंशत ढगाळ वातावरण ते जिल्हे कोल्हापूर सांगली सोलापूर . विदर्भात थंडी धुके कडक सुर्यदर्शन .मराठवाडात थंडी धुके सुर्यदर्शन.Cold foggy sunrise in Marathwada.पं- महाराष्ट्र व दक्षिण महाराष्ट्र थंडी धुके व दि 4,5 नोव्हेंबर अशंत ढगाळ वातावरण.उत्तर महाराष्ट्रात जास्त थंडी धुके व कडक देशात कर्नाटक , आंध्रप्रदेश तामिळनाडू केरळ, या राज्यात 20 नोव्हेबर पर्यत पावसाचे वातावरण असेल.माहीतीस्तव – राज्यातून मान्सून 22 ऑक्टोबरला निघून . शेतकऱ्यांचे सोयाबिन मका काढायची असेल तर काढूण घ्यावी .पेरणीसाठी पोषख वातावरण तयार आहे .…

Read More

लसणात आैषधी  गुणधर्म असून मनुष्याच्या शरीरातील काही रोगांचे नियंत्रण करण्यास याचा उपयोग होतो. कंदवर्गीय पिकांमध्ये भारतात प्राचीन काळापासून व जगात एक महत्वाचे मसाल्याचे पीक म्हणून उपयोग केला जातो. भारतात मध्यप्रदेश, गुजरात, ओरिसा, राजस्थान, उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्र ही राज्ये लसूण लागवडीत आघाडीवर आहेत. महाराष्ट्रात पुणे, नाशिक, धुळे, अहमदनगर, जळगाव व सातारा हे लसूण पिकवणारे प्रमुख जिल्हे आहेत. आपल्या देशातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता प्रती हेक्टरी सरासरी उत्पादकता ४ ते ५ टनात वाढ करून १० ते १२ टन मिळविणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी लसणाच्या अधिक उत्पादन देणा-या जातींची लागवड व योग्य पीक उत्पादन पद्धतीचा अंगीकार करणे आवश्यक आहे. हवामान व…

Read More

पुणे : गायीच्या दुधाचा विक्री दर प्रतिलिटरला 54 रुपयांपेक्षा अधिक नसावा, असा निर्णय राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाने नुकताच घोषित करताना डिलर ते एमआरपीमधील तफावत कमी करण्याची घेतलेली भूमिका जागेवरच राहिली आहे. याउलट ग्राहकांवर दरवाढीचा बोजा पडणार नसल्याचे सांगताना प्रत्यक्षात 2 नोव्हेंबरपासून बहुतांशी सहकारी व खासगी दूध संघांनी गायीच्या दुधाच्या विक्री दरात लिटरला थेट 1 ते 2 रुपयांनी वाढ केली आहे. त्यानुसार लिटरला 53 ते 54 रुपयांची पातळी गाठत शेवटी ग्राहकांच्या खिशाला भुर्दंड दिला आहे. मागील रविवारी (दि.30) कल्याणकारी संघाची बैठक कात्रज मुख्यालयात दुपारी झाली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेतही संघाच्या पदाधिकार्‍यांनी दुधाची अधिकतम किंमत लिटरला 54 रुपयांपेक्षा…

Read More

सध्या खतांच्या वाढत्या किमतीमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यामुळे शेतकरी अडचणीत येत आहे. असे असताना केंद्रीय मंत्रिमंडळाने एक मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने फॉस्फरस आणि पोटॅश खतांच्या नवीन दरांना मंजुरी दिली आहे. फॉस्फेटिक आणि पोटॅश खतांच्या नवीन दरांना मंजुरी दिली आहे. दरम्यान, हे नवीन अनुदान दर रब्बी हंगाम २०२२-२३ साठी आहेत. हे नवीन दर 1 ऑक्टोबर 2022 ते 31 मार्च 2023 पर्यंत आहेत. निर्णयानंतर आता शेतकऱ्यांना कमी दरात खते मिळू शकणार आहेत. शासनाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना रब्बी 2022-23 मध्ये सर्व फॉस्फेट खते आणि पोटॅश खते कमी दरात मिळू शकतील. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने हे…

Read More

शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : गहू दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 04/11/2022 संगमनेर — क्विंटल 3 2683 2683 2683 भोकर — क्विंटल 6 2401 2401 2401 कारंजा — क्विंटल 170 2555 2695 2640 अंबड (वडी गोद्री) — क्विंटल 35 2249 3126 2500 राहता — क्विंटल 8 2625 2655 2635 शेवगाव २१८९ क्विंटल 22 2050 2750 2750 शेवगाव – भोदेगाव २१८९ क्विंटल 2 2400 2400 2400 परतूर २१८९ क्विंटल 4 2050 2451 2201 दौंड-यवत २१८९ क्विंटल 40 2100 2700 2400 सिल्लोड अर्जुन क्विंटल…

Read More

शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : मिरची (हिरवी) दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 04/11/2022 खेड-चाकण — क्विंटल 240 3000 4000 3500 राहता — क्विंटल 16 3000 3800 3400 कळमेश्वर हायब्रीड क्विंटल 16 2575 3500 3045 पुणे-मोशी लोकल क्विंटल 88 3000 4000 3500 कामठी लोकल क्विंटल 6 2000 3000 2500 वाई नं. २ क्विंटल 12 3500 5000 4250 03/11/2022 कोल्हापूर — क्विंटल 63 2000 3600 2500 औरंगाबाद — क्विंटल 69 2500 5000 3750 खेड-चाकण — क्विंटल 189 2000 4000 3000 श्रीरामपूर — क्विंटल 20…

Read More

भुईमूग शेंगा फोडणी यंत्र: हाताने भुईमूग शेंगा फोडणे हे काम कष्टाचे, खर्चाचे, वेळ घेणारे आणि मजुरांच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. हे कष्टाचे व खर्चिक काम स्वस्त व सुलभ करण्याकरिता शेंगा फोडणी यंत्र विकसित केलेले आहे. यामुळे शेंगा फोडण्याचे काम लवकर होऊन वेळेची व खर्चाची बचत होते. या यंत्राच्या रचनेत चार पाय असलेल्या एका लोखंडी पेटीत खालच्या बाजूस वक्राकार जाळी बसविलेली असते. पेटीच्या मध्यभागी फिरणाऱ्या दांड्यावर एक लांब हॅण्डल असतो. हॅण्डलच्या खालच्या टोकाला तीन खरबरीत लोखंडी ब्रश बसविलेले असतात. वक्राकार जाळीत चार ते पाच किलो शेंगा टाकून हॅंडल पुढे-मागे हलविला, की जाळीवरच्या ब्रशखाली शेंगा भरडल्या जातात आणि शेंगा व टरफले अलग होऊन…

Read More

कृषिविध्यापिठे खोटे बोलतात की , ”  मुळयाना पाणी पाहिजे  ” . पण नैसर्गिक सत्य हे आहे की , कोणत्याही झाडाच्या मुळीला पाणी नको . झाड पाणी पीत नाही . किंबहुना मुळी पाण्याला स्पर्शही करत नाही . मुळयाना पाणी नको तर वाफसा हवा .  आपण बीजाम्रुत संस्कार केला , जीवाम्रुत देऊन आच्छादन केले पण मुळीजवळ वाफसा नसेल तर पिकाचि वाढ होणार नाही . ही चारही तत्वे ( बीजाम्रुत , जीवाम्रुत , आच्छादन व वाफसा ) एकमेकाशी इतके जुळलेले आहेत की यापैकी एकाला ही टाळता  येणार नाही . ” This is complete package of practices ” ही चारही तत्वे अंमलात आनाविच…

Read More