Author: Neha Sharma

शेतकर्‍यांना शेतीपंपासाठी रात्री वीजपुरवठा केला जात असल्याने पिकाला पाणी सोडण्यासाठी रात्रभर शेतात जागरण करावे लागत असल्याने शेतकर्‍यांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भावनिक साद घालणारे मेसेज व्हॉटस्अ‍ॅपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात फिरत आहेत. शेतकरी वाचला तरच सरकार वाचेल, असे भावनिक साद घालणारे मेसेजेस फिरत आहेत. शेतीसाठी विद्युत मंडळाकडून दरमहा वीजपुरवठ्याचे वेळापत्रक प्रसिद्ध केले जाते आणि त्यानुसार विद्युतपुरवठा केला जातो. पण हे वेळापत्रक कागदावरच राहिले आहे. सध्या रब्बी हंगामातील कामांना वेग आला असून, शेतीपिकांना पाणी देण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. रब्बीच्या लागवडीसाठी शेतकरी सध्या दिवसभर शेतात राबतो. परंतु दिवसभर वीजपुरवठा खंडित असतो. रात्री दहा-बारानंतर वीजपुरवठा सुरू होत असल्याने शेतात…

Read More

औताळे (ता. दिंडोरी) शिवारातील द्राक्ष व टोमॅटो कॅरेटच्या गोडावूनला आग लागून हजारो रुपयांचे कॅरेट आगीत भस्मसात झाले. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी लाखाेंचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मंगळवारी (दि. १) दुपारी द्राक्ष व्यापारी शीतलदास यांच्या यांच्या गोडाऊनमध्ये शेडच्या दुरुस्तीचे काम चालू होते. येथे वेल्डिंगचे काम चालू असताना ठिणगी पडली. यावेळी नेमके कामगार काही कामासाठी दुसरीकडे गेले असता गोडाऊनने अचानक पेट घेतला. या ठिकाणी अग्निशमन व्यवस्था नसल्याने बादलीने पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु आगीने रौद्ररूप धारण केल्याने यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान, आग विझविण्यासाठी पिंपळगाव येथून अग्निशमक दलाला पाचारण करण्यात आले. मात्र, आगीने उग्र…

Read More

केळीच्या शेतीमधून राजेंद्र हरी पाटील या जळगावमधील शेतकऱ्याने एक कोटींहून अधिक रुपये मिळवले आहेत. एक कोटी  रुपयांचा आकडा ऐकल्यानंतर तुम्हाला वाटत असेल आमचं काही चुकत असेल पण असं काहीही नाही तुम्ही जे वाचलेय ते खरं आहे. जळगाव जिल्ह्यात ऐकीकडं केळी पिकावर सी एम वी रोगानं थैमान घातले होतं. यामध्ये हजारो शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालं होतं. शेतकरी अडचणीत सापडला होते. अशातच या शेतकऱ्यांनं कोट्यवधींची कमाई केली आहे.  जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील वाढे गावच्या राजेंद्र हरी पाटील या शेतकऱ्याने स्वत:च्या दीड एकर शेतीसह दुसऱ्याची साठ एकर शेती केली होती. यामध्ये केळीच्या उत्पादनाच्या माध्यमातून एक कोटी रुपयांच्या हून अधिक रुपयांची कमाई…

Read More

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कापूस, सोयाबीनसह सर्व खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील 2 लाख 19 हजार 105 हेक्टरवरील 4 लाख 61 हजार 407 शेतकऱ्यांची शेती उद्ध्वस्त झाली आहे. मराठवाड्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचवेळी पीक विमा कंपन्यांचे अधिकारी शेतकऱ्यांना योग्य वागणूक देत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यानंतर सत्तार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत विमा कंपनीचे अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी, तालुका कृषी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडविण्याचे आदेश दिले. त्यानंतर, त्यानुसार प्रत्येक तालुकास्तरावर पीक विमा कंपन्यांची कार्यालये तातडीने सुरू करण्यात आली आहे. यामुळे याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. तसेच शेतकऱ्यांना मदत मिळणार…

Read More

देशवासियांसाठी दिवाळीनंतरची (diwali) पहिली आनंदाची बातमी आहे. ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी कमर्शियल एलपीजी सिलेंडरच्या  दरात मोठी कपात केली आहे. ही कपात तात्काळ लागू करण्यात आली आहे. तात्काळ प्रभावाने गॅस सिलिंडर दरात 115.50 रुपयांची घट करण्यात आली आहे. जून महिन्यानंतर सिलिंडर दरात कपात  करण्याची ही सातवी वेळ आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसचे दर घसरल्याने देशांतर्गतही एलपीजीचे दर कमी करण्यात आले आहेत. 19 किलोच्या कमर्शियल गॅस सिलिंडरच्या दरात 610 रुपयांची कपात करण्यात आलेली आहे. या निर्णयामुळे हॉटेल, रेस्टॉरंटसह आदींना मोठा दिलासा मिळाला आहे. कमर्शियल वापराच्या 19 किलोच्या एलपीजी सिलिंडरचे भाव आता 1744 रुपये झाले आहेत. यापूर्वी हे सिलिंडर दिल्लीत 1859 रुपयांना मिळत होते. कोलकातामध्ये…

Read More

केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर हे उद्या पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, त्यांना राज्यातील अतिवृष्टीबाबतची माहिती दिली जाणार असल्याचं राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हंटले आहे. सोबतच राज्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक यावे अशी मागणी करत, नुकसानभरपाईसाठी केंद्राने मदत करण्याबाबत मागणी देखील करणार असल्याचं अब्दुल सत्तार म्हणाले आहे. तसेच पीक विमाबाबत ज्या काही जाचक अटी आहेत त्याही कमी कराव्यात अशा पद्धतीची मागणी सुद्धा केंद्रीय कृषीमंत्री तोमर यांच्याकडे करणार असल्याची माहिती सत्तार यांनी दिली. यावेळी पुढे बोलतांना अब्दुल सत्तार म्हणाले की, नुकसानग्रस्त भागातील अनेक ठिकाणी पंचनामे झाले नसल्याचे आरोप केले जात आहे. मात्र कुणीही पंचनामे करण्यापासून सुटणार नाही. संपूर्ण पंचनामे…

Read More

परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे मोठ्याप्रमाणावर आवक घटल्याने भाजीपाल्यांचे दर चांगलेच वधारले आहे. दरम्यान भाजी बाजारात शेवगा 200 रुपये किलो मिळत आहे. तसेच शहरातील किरकोळ भाजी बाजारात वांगी, टोमॅटो, भेंडी, फ्लॉवरसह सर्वच फळभाज्यांची सरासरी 60 रुपये किलो दर पाहायला मिळत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसत आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे पीकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. ज्याचा फटका भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना देखील बसला आहे. या सर्व परिस्थितीत भाजी बाजारात भाज्यांची आवक घटली आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे दर देखील वाढले आहेत. शहरातील जाधववाडी बाजार समितीतच फळभाज्यांचे भाव सरासरी 30 ते 50 रुपयांवर पोहचले आहे. त्यामुळे केळीबाजार, औरंगपुरासह शहरातील किरकोळ भाजीमंडईत…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे पक्षातर्फे सोमवारी 31 ऑक्टोबर अधिकृत ट्वीटर हॅंडल वरून कळवण्यात आले आहे.  81 वर्षीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात नेण्यात आले असून पुढील तीन दिवस ते दाखल राहतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसने या निवेदनात म्हटले आहे. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी अधिकृत पत्राद्वारे केलेल्या विनंतीनुसार, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर जमू नये,” असेही यात म्हटले आहे.

Read More

शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : शेवगा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 31/10/2022 पुणे लोकल क्विंटल 34 4000 10000 7000 पुणे-मोशी लोकल क्विंटल 2 8000 10000 9000 30/10/2022 अकलुज — क्विंटल 3 2500 6500 5500 खेड-चाकण — क्विंटल 5 10000 15000 12000 राहता — क्विंटल 3 7000 9000 8000 पुणे लोकल क्विंटल 105 6000 10000 8000 पुणे-मोशी लोकल क्विंटल 3 8000 10000 9000 29/10/2022 जुन्नर – नारायणगाव — क्विंटल 8 500 4500 3000 खेड-चाकण — क्विंटल 14 8000 12000 10000 सातारा — क्विंटल…

Read More

राज्यात दुधाचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. आज पुण्यातील कात्रज येथे राज्यातील विविध दूध संघांची बैठक होत आहे. सध्या अनेक दूध उत्पादक संघ शेतकऱ्यांकडून जास्त दराने दूध खरेदी करतात, त्याचा परिणाम दरवाढीवर होण्याची शक्यता आहे. बैठकीला उपस्थित सदस्यांनी दूध खरेदी दरात वाढ करण्याची मागणी केली आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये लम्पी चर्मरोगाने थैमान घातले आहे. महाराष्ट्रातही विविध जिल्ह्यात जनावरांना लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे पशुपालक चिंतेत आहेत. लम्पी रोगामुळे पशुधनाचे नुकसान होत असल्याने आता दुधाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे दुधाच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पुण्यातील कात्रज येथील दूध डेअरीमध्ये सरकारी आणि खासगी दूध…

Read More