- Homepage
- ताज्या बातम्या
- बाजार-भाव
- शेतीविषयक
- कृषी-चर्चा
- हवामान
- पशु पालन
- इंडस्ट्री
- सरकारी योजना
- ग्रामीण उद्योग
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Neha Sharma
केंद्रीय मंत्रालयाच्या ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव रोहित कुमार सिंग यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, सरकार डाळींच्या आयातदारांशी सतत संवाद साधून जीवनावश्यक खाद्यपदार्थ आणि वस्तूंचे उत्पादन, आयात, निर्यात आणि उत्पादनात गुंतले आहे. संशोधन संस्था, व्यापारी संघटना इ. उपलब्धतेवर बारीक लक्ष ठेवून आहे. सरकारी गोदामांमध्ये डाळींचा साठा वाढावा यासाठी सरकारने १ लाख टन आयात तूर आणि ५० हजार टन उडीद खरेदी सुरू केली आहे. मंत्रालयाने सांगितले की, तूर आणि उडदाची आयात 31 मार्च 2023 पर्यंत ‘मुक्त श्रेणी’मध्ये ठेवण्यात आली आहे. केंद्रीय सचिव पुढे म्हणाले की, देशांतर्गत उपलब्धता वाढवण्यासाठी आणि डाळींची निर्बाध आयात सुनिश्चित करण्यासाठी तूर आणि उडदाची आयात ‘मुक्त श्रेणी’मध्ये ठेवण्यात…
पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. असे असताना औरंगाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी चक्क स्मशानभूमीत दिवाळी साजरी करत आंदोलन केला आहे. औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील वाहेगाव येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे. असे असताना मात्र सरकारकडून अद्याप कोणतीही मदत मिळाली नाही. त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी आज गावातील स्मशानभूमीत दिवाळी साजरी करत अनोखं आंदोलन केलं. यामुळे याची चर्चा सुरु आहे. अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत कोणतीही शासकीय यंत्रणा पोहोचली नाही.त्यामुळे सरकारकडून शेतकऱ्यांसाठी कोणतीही भरीव मदत मिळत नसल्याचे चित्र आहे. अशात दिवाळी सारखा सण आला आहे, मात्र आमच्याकडे यासाठी पैसे नाहीत. त्यामुळे गावातील सर्व शेतकरी आज स्मशानभूमीत दिवाळी साजरी करत…
नाशिकच्या शेतकऱ्यांसमोर आता नवीन संकट उभे राहिले आहे. आधीच अस्मानी संकटाने शेतकरी मेटाकुटीला आलेल्या असल्याने पुन्हा शेतकरी भीतीच्या सावटाखाली आलेला आहे. मुसळधार पावसाने शेतकऱ्याच्या शेतमालचे नुकसान झाले होते. त्यात कसाबसा वाचविलेला शेतमाल दोन पैसे मिळवून देणारा ठरत असल्याने त्यावरच चोरडे डल्ला मारत आहे. त्या विशेष म्हणजे टोमॅटोला बाजारात चांगला भाव मिळत असल्याचे पाहून भुरटे चोर रात्रीच्या वेळी टोमॅटो चोरी करत आहे. नाशिकच्या परिसरात टोमॅटो काढणी सुरू आहे. त्यात शेतात काढणीला आलेल्या टोमॅटोची चोरी होत असल्याची घटना मखमलाबाद शिवारात घडली आहे. वारंवार अशा घटना घडत असल्याने शेतकऱ्यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अनेकदा याबाबत तक्रार देऊनही चोर हाती लागत नसल्याने…
सिंहगड किल्ल्याच्या परिसरातील रांजणे येथील डोंगररांगेतील खोल दरीत 25 दिवसांपासून अडकून पडलेल्या मुक्या जिवाला खडतर परिश्रमानंतर अखेर सोमवारी जीवनदान मिळाले. जखमी अवस्थेत दुर्गम दरीत खितपत पडलेल्या सर्जा नावाच्या बैलाचा जीव वाचविण्यासाठी जिवाचा आटापिटा करणार्या शेतकर्यांची अखेर दिवाळी गोड झाली. लोणावळा येथील अॅनिमल रेस्क्यू टीएमने प्राणाची बाजी लावत सायंकाळी पाचच्या सुमारास सर्जाला दोरखंडाने बांधून कड्या-कपारीतून बाहेर काढले आणि सर्जाचे मालक शेतकरी विजय मारुती शेंडकर (रा. दापोडे, ता. वेल्हे) आणि त्यांच्या कुटुंबीयांसह ग्रामस्थांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. सर्जा रानात चरत चरत उंच डोंगरावर गेला आणि तेथून शेजारच्या रांजणे गावच्या हद्दीत एक हजार फूट खोल दरीत कोसळला होता. सुरुवातीला दोन आठवडे सर्जाचा शोध…
महागाईच्या नावाखाली कडधान्यांचे दर कमी करण्याचा प्रयत्न पुणे : केंद्र सरकार कडधान्याचे उत्पादन, आयात, निर्यात आणि उपलब्धतेवर बारीक लक्ष ठेऊन असल्याचे ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे सचिव रोहीत कुमार सिंह यांनी सांगितले. तसेच देशात कडधान्यांचा मुबलक बफर स्टॉक असून सरकार डाळींचे दर नियंत्रणात ठेवेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यासाठी सरकारने आयात तूर आणि उडीद खरेदीचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकार महागाईच्या नावाखाली कडधान्यांचे दर कमी ठेवण्यासाठी वाटेल ते करताना दिसत आहे. त्यातच परिपाक म्हणून आयात तूर खरेदी करण्यासाठी आधारभूत किंमत इतिहासात पहिल्यांदाच जाहीर करण्यात आली. तसेच ३१ मार्च २०२३ पर्यंत तूर आणि उडदाची आयात मुक्त श्रेणीत ठेवण्यात आली आहे. केंद्र सरकार…
परतीच्या पावसामुळे अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. यामुळे अनेकांचे मोठे नुकसान झाले. असे असताना देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर ‘सितरंग’ चक्रीवादळ धडकणार आहे. यामुळे अलर्ट जारी केला आहे. याचा फटका पश्चिम बंगाल, आसाम, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, मणिपूर, नागालँड या सात राज्यांना बसणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. यामुळे काळजी घ्यावी लागणार आहे. या वादळामुळे आज आसामच्या काही भागांत पाऊस झाला आहे. सध्या सितरंग वादळाचा केंद्रबिंदू पश्चिम बंगालच्या उपसागरात दक्षिणेला 520 किलोमीटर तर बांगलादेशपासून 670 किलोमीटर समुद्रात होता. यामुळे मच्छिमारांना देखील काळजी घेऊन समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पश्चिम बंगालच्या उत्तर आणि दक्षिण परगणा, पूर्व मिदनापूरला या…
सांगली तालुक्यात गेल्या काही दिवसांपूर्वी पडलेल्या परतीच्या मुसळधार पावसाने ऊस शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. काही ठिकाणी शेतात गुडघाभर पाणी साठून राहिल्याने उत्पादन घटणार या चिंतेने सध्या शेतकरी हवालदिल झाला आहे. या पावसाने आले, हळद, भुईमूग, सोयाबीन, ज्वारी यासह अन्य भाजीपाला पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. सततच्या पडणार्या पावसाने सध्या तोडणीला आलेल्या उसाचे प्रचंड मोठे नुकसान झाल्याचे कडेगाव तालुक्यातील चित्र आहे. सध्या ऊस हंगाम सुरू झाला आहे. परंतु बहुतांश ठिकाणी उसाच्या शेतातून मोठ्या प्रमाणवर पाणी वाहत असल्याने ऊस तोडणी मजुरांना शेतातून ऊस बाहेर काढणे मोठे आव्हान ठरत आहे. पावसामुळे सध्या शेकडो एकरावरील ऊस भुईसपाट झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. आधीच…
..सुनक केवळ भिन्नवर्णीय नाहीत. तर भिन्नधर्मीयदेखील आहेत. प्रॉटेस्टंट ख्रिश्चन बहुसंख्येने असलेल्या देशाच्या पंतप्रधानपदी सुनक यांच्या रूपाने प्रथमच हिंदूधर्मीय विराजमान होईल. हे शुद्ध त्या देशाचे मोठेपण. संपूर्ण निवडणुकीच्या काळात सुनक यांच्या वर्णाचा ना उल्लेख झाला ना धर्माचा. सानिया मिर्झा हिने पाकिस्तानी व्यक्तीशी निकाह लावल्यामुळे तिला पाकिस्तानी, पाक-धार्जिणी ठरवणाऱ्या; पण राजीव गांधी यांच्याशी विवाहानंतर सोनिया गांधी यांस मात्र इटालियन म्हणूनच हिणवणाऱ्या मानसिकतेच्या पार्श्वभूमीवर ब्रिटिश जनतेच्या मानसिक मोठेपणाचा आकार लक्षात यावा. ज्या देशावर ब्रिटिशांनी सुमारे दीडशे वर्षे राज्य केले त्या देशातील स्थलांतरित आणि आश्रिताचा मुलगा थेट पंतप्रधानपदी बसणार याचा कोणताही विषाद त्या देशातील मतदारांनी व्यक्त केला नाही. देश, प्रदेश मोठे का होतात, याचे…
औरंगाबाद – राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर आले आहेत. गेल्या काही दिवसात परतीच्या पावासमुळे मराठवाड्यात शेती आणि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या नुकसानीची ठाकरे यांनी पाहणी केली. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच ठाकरे राज्याच्या दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी त्यांनी संकटग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेत त्यांच्याशी थेट संवाद साधला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. औरंगाबाद येथे पोहचल्यानंतर ते शेतकऱ्यांच्या बांधावर गेले. नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी ठाकरेंसमोर आपली व्यथा मांडली. शेतकरी बांधव ठाकरेंना म्हणाले की, “साहेब.. बँकेचा तगादा आहे. पण, शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. आम्ही हवालदिल झालो आहोत, काहीतरी करा साहेब.मदत करा, कर्ज…
शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : झेंडू दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 24/10/2022 भुसावळ लोकल क्विंटल 257 2500 2500 2500 23/10/2022 पुणे लोकल क्विंटल 893 2000 6000 4000 भुसावळ लोकल क्विंटल 159 3300 3300 3300 रामटेक नं. १ क्विंटल 14 2000 2400 2200 22/10/2022 पुणे लोकल क्विंटल 600 1000 4000 2500 भुसावळ लोकल क्विंटल 18 3000 3000 3000 21/10/2022 पुणे लोकल क्विंटल 433 1000 4000 2500 19/10/2022 पुणे लोकल क्विंटल 148 2000 5000 3500 भुसावळ लोकल क्विंटल 1 5000 5000 5000 18/10/2022 पुणे…
