- Homepage
- ताज्या बातम्या
- बाजार-भाव
- शेतीविषयक
- कृषी-चर्चा
- हवामान
- पशु पालन
- इंडस्ट्री
- सरकारी योजना
- ग्रामीण उद्योग
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Neha Sharma
गुरुवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. जर आपण सध्याच्या शिंदे फडणवीस सरकारचा विचार केला तर अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्याचा सपाटाच लावला असून शेतकरी वर्गासाठी देखील अनेक प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतले आहेत. त्या अनुषंगाने आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये देखील अनेक महत्वपूर्ण निर्णय सरकारने घेतले आहेत. त्यासंबंधी या लेखात माहिती घेऊ. भूविकास बँकेचे कर्ज घेतलेले शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी ज्या शेतकऱ्यांनी भूविकास बँकेचे कर्ज घेतलेले होते अशी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात येणार असून याअंतर्गत 964 कोटी 15 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफी करण्यात आली आहे. एवढेच नाही तर बँकेच्या मालमत्तांचे शासनाकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. 75 हजार पदे भरण्याचा मार्ग मोकळा दुसरा महत्त्वाचा निर्णय म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट-ब…
भारतीय संस्कृतीत दिवाळी सणाला विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण म्हणून दिवाळीला मान आहे. वसुबारस म्हणजेच गाय आणि वासरू. या दिवशी गाय-वासराची पूजा करत दिवाळी पर्वाला सुरुवात होते. आज दिवाळीचा पहिला दिवस आहे. अंधाराकडून प्रकाशाकडे, दु:खाकडून आनंदाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी. वसुबारसपासूनच खऱ्या अर्थाने दिवाळीला सुरुवात होते. या वसुबरारसेचं नेमकं महत्त्व काय? याविषयीची माहिती जाणून घेऊ.. दिवाळीचा पहिला दिवस हा गाई वासरांची दिवाळी म्हणून ओळखला जातो. भारतीय संस्कृतीत गायीला मातेचा दर्जा देण्यात आला आहे. तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वसुबारस या दिवशी गाय आणि तिच्या वासराची पूजा केली जाते. भारतीय संस्कृतीत गायीला मातेचा दर्जा देण्यात आला आहे. गायीच्याप्रती कृतज्ञतेतून…
सध्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. पुणे जिल्ह्यातही पावसाने माघार घेतली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरीही चिंतेत आहेत. दरम्यान, अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी पुणे जिल्हा प्रशासनाने 3 कोटी 18 लाख रुपयांचे अनुदान वितरित केले आहे. जून ते ऑगस्ट 2022 या कालावधीत अतिवृष्टीमुळे दोन हजार 247 हेक्टर, 85 आर क्षेत्रातील नऊ हजार 192 शेतकऱ्यांची पिके नष्ट झाली. राज्य शासनाकडून तालुक्यांना गुंतवणूक अनुदान म्हणून एकूण तीन कोटी 18 लाख 45 हजार रुपयांचे वितरण करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. …
सध्या उसाचा हंगाम सुरु होत असून अनेक कारखान्यांनी तयारी केली आहे. असे असताना पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने गतवर्षी 2021-22 च्या गिरणी हंगामात गाळप केलेल्या उसाचा अंतिम भाव जाहीर केला आहे. 2800/- प्रति मेट्रिक टन कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी जाहीर केले आहे. माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, संस्थापक-संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली भीमाशंकर सहकारी साखर कारखाना काम करत आहे. कारखान्यास अनेक पुरस्कार मिळाले आहेत. कारखान्याने यापूर्वी रु. ऊस उत्पादकांना 2642/- प्रति मेट्रिक टन एकरकमी पेमेंट करण्यात आले आहे. शेवटच्या हप्त्याची शिल्लक रु. 158/- प्रति मेट्रिक टन जमा करण्यात आले आहेत. कारखान्याचे संस्थापक-संचालक वळसे-पाटील यांनी वार्षिक…
दोन दिवसांवर दिवाळी सण येऊन ठेपला आहे. खुसखुशीत फराळाच्या चवीद्वारे सण साजरा करण्याची लगबग सुरू झाली आहे. मात्र, सर्वसामान्यांच्या या अपेक्षेवर महागाई पाणी फेरले जाण्याची शक्यता आहे. दिवाळी फराळासाठी वापरण्यात येणाऱ्या खाद्यतेलाच्या दरात वाढ करण्यात आली. खाद्यतेलाचे दर आठवडाभरात सरासरी 18 रुपयांनी वाढले आहेत. केंद्र सरकारने मागील काही महिन्यांत आयातशुल्कात मोठी कपात केल्यानंतरही ही दरवाढ झाली आहे. तर सर्वाधिक मागणीच्या पामतेलापेक्षा सोयाबीन तेलाची मागणी बाजारात अचानक वाढलेली दिसून येत आहे. देशात सणासुदीचे दिवस असल्याने दिवाळीमुळे मागणी किमान 25 टक्क्यांनी वाढली आहे. मागणीच्या तुलनेत खाद्यतेलांची आवक कमी झाल्याने घाऊक बाजारात खाद्यतेलाच्या 15 किलो डब्यांच्या दरात 100 ते 150 रुपयांनी वाढ झाली आहे.…
गोठा चांगला असेल तर जनावरांचे स्वास्थ्य चांगले राहते. सुधारित पद्धतीमुळे गोठ्यातील कामे सहजपणे होतात, मनुष्यबळ कमी लागते, तसेच जनावरांचे दुग्ध उत्पादन वाढते. गोठा बांधताना शेतातील उंचावर असलेली कठीण व सपाट जागा निवडावी, जेणेकरून गोठ्यातील मल-मूत्र, सांडपाणी याची विल्हेवाट व्यवस्थित लावता येईल. चाऱ्यासाठी योग्य प्रकारची गव्हाण आणि प्रत्येक जनावरास हालचालीसाठी पुरेशी जागा मिळेल याची काळजी घ्यावी. गोठ्याचे छत योग्य उंचीवर आणि न गळणारे असावे. गोठ्यात भरपूर सूर्यप्रकाश व हवा खेळती राहील अशी व्यवस्था असावी. गोठ्यातील गटार, गव्हाण व जनावरांना उभे राहण्याच्या जागेवर भरपूर सूर्यप्रकाश येण्यासाठी शक्यतो लांबीच्या बाजूने गोठा दक्षिण-उत्तर दिशेस असावा. गोठ्यातील जमिनीकरिता भाजलेल्या विटा किंवा दगडी फरशा असाव्यात. जमिनीस…
शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : गवार दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 20/10/2022 कळमेश्वर हायब्रीड क्विंटल 8 4085 5000 4555 पुणे-मोशी लोकल क्विंटल 12 3000 5000 4000 रत्नागिरी नं. २ क्विंटल 55 6000 7000 6500 19/10/2022 औरंगाबाद — क्विंटल 4 3500 5000 4250 खेड-चाकण — क्विंटल 46 3000 5000 4000 श्रीरामपूर — क्विंटल 3 4000 5000 4550 भुसावळ — क्विंटल 2 2500 2500 2500 सातारा — क्विंटल 14 4000 5000 4500 राहता — क्विंटल 1 6000 6000 6000 नाशिक हायब्रीड क्विंटल 24…
सध्या राज्यात परतीचा पाऊस सर्वत्र धुमाकूळ माजवत आहे. परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील काढणीसाठी आलेली पिके संकटात सापडली आहेत. हार्वेस्टिंग झाल्यानंतर देखील शेतमालाला मोठा फटका बसत आहे. मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी ठिकाणी सोयाबीनच्या गंज्या वावरातूनच वाहून गेल्या. सोयाबीन प्रमाणेच काढण्यासाठी आलेल्या मका पिकाला देखील याचा फटका बसत आहे. एवढेच नाही तर आत्ताच लागवड करण्यात आलेल्या कांदा पिकाला ही याचा फटका आहे. तसेच काढण्यासाठी आलेल्या कापूस पिकाला देखील परतीच्या पावसामुळे मोठा फटका बसत असून कापूस पिकाचा दर्जा आणि उत्पादन परतीच्या पावसामुळे कमी होणार असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. एकंदरीत काय तर परतीच्या पावसामुळे शेतकरी बांधवांच्या उत्पन्नात घट होण्याची भीती निर्माण झाली…
ऐन दिवाळीत देशावर चक्रीवादळाचं संकट घोंगावतंय. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सीतरंग चक्रीवादळ असं या वादळाचं नाव असणार आहे. २० ते २१ ऑक्टोबरच्या दरम्यान हे चक्रीवादळ निर्माण होऊ शकतं असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. कोलकाता येथील आयएमडीच्या प्रादेशिक हवामान केंद्राने ही माहिती दिली आहे. अंदमान समुद्र आणि त्याच्या आसपासच्या परिसरात सोम्य चक्रीवादळ निर्माण झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली असून आत्तापर्यंत हे वादळ अंदमान समुद्र परिसरात होते, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. सीतारंग चक्रीवादळाचा परिणाम म्हणून येत्या २३ आणि २४ ऑक्टोबरच्या सुमारास पूर्व महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. दिवाळीत पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान…
मुंबई : साखरेच्या बाबतीत सध्याचे खुले निर्यात धोरणच सुरु ठेवावे. कोटा पद्धतीने साखर निर्यात करण्यास महाराष्ट्रातील साखर कारखानदारांचा विरोध असून यामुळे कारखान्यांना मर्यादा येतील, यासंदर्भात आपण हस्तक्षेप करून वाणिज्य तसेच ग्राहक संरक्षण आणि अन्न व सार्वजनिक मंत्रालयाला योग्य तो निर्णय घेण्याची विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांना केली आहे. आपल्या पत्रात मुख्यमंत्री म्हणतात की, २०२१-२२ मध्ये साखर निर्यातीच्या बाबतीत केंद्र सरकारने खुले धोरण स्वीकारल्याने जगात साखर निर्यातीत भारत मोठा निर्यातदार ठरला. यामुळे साखर कारखान्यांना आर्थिक स्थैर्य मिळाले आणि परकीय चलन सुध्दा वाढले. यंदापासून साखर निर्यातीसाठी कोटा पद्धत लागू करण्यात येणार आहे असे कळते. मात्र,…
