- Homepage
- ताज्या बातम्या
- बाजार-भाव
- शेतीविषयक
- कृषी-चर्चा
- हवामान
- पशु पालन
- इंडस्ट्री
- सरकारी योजना
- ग्रामीण उद्योग
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Neha Sharma
रब्बी कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली असून, काही शेतकऱ्यांची अजून लागवड व्हावयाची आहे. कांद्यावर येणाऱ्या रोगांचे व किडींच्या नियंत्रणासाठी बीज प्रक्रियेपासून काळजी घेतल्यास पीक उत्पादनात वाढ होण्यास चांगली मदत होईल. उशिरा कांदा लागवडी करताना रोपवाटिकेच्या सुरवातीपासून काळजी घेतल्यास निरोगी रोपांची उपलब्धता होईल. कांद्यावरील रोगाचे व्यवस्थापन 1. रोपवाटिकेतील मर – कांदा पिकाच्या रोपवाटिकेत रोपांवर मर रोग हा फ्युजॅरियम बुरशीमुळे होतो. रोपांची मान जमिनीलगत अचानक कुजून ती कोलमडलेली दिसते. त्याचप्रमाणे बुरशीमुळे लागवडीनंतरही प्रादुर्भाव होऊन मर किंवा सड होते. उपाययोजना – रोपवाटिकेची जागा दर वर्षी बदलावी. कांद्याच्या रोपवाटिकेसाठी जमीन उत्तम निचरा होणारी आणि मध्यम प्रतीची असावी. रोपे गादी वाफ्यावरच तयार करावीत. बियाणे निरोगी, स्वच्छ…
परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांची सर्वच पिके पाण्यात असल्याने पिकांचे नुकसान होत आहे. परभणी आणि हिंगोली या दोन जिल्ह्यांतील सोयाबीन, कपाशी, तूर इ. पिके पाण्यात सापडली आहेत. परभणी, हिंगोली जिल्ह्यात यावर्षी ८ लाख ५६ हजार ७७ हेक्टरवर पेरणी झाली. त्यात सोयाबीन ५ लाख २७ हजार २२९ हेक्टरवर, कपाशीची लागवड २ लाख ११ हजार ६०६ हेक्टरवर, तुरीची ७७ हजार ९६ हेक्टर पेरणी झाली. अतिवृष्टी, सततच्या पावसाचा सर्वाधिक फटका सोयाबीनला बसला आला. त्यामुळे ५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील सोयाबीनचे पिकाचे नुकसान झाले आहे. २ लाखांहून अधिक हेक्टरवरील कपाशी, ७७ हजार हेक्टरवरील तूर, हजारो हेक्टरवरील हळद, ऊस, फळे,…
सरकार देशातील सर्व पंचायतींमध्ये सहकारी डेअरी उघडणार, अमित शहा यांची माहिती सध्या दुग्ध व्यवसायाला चांगले दिवस आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना चार पैसे मिळत आहेत. सध्या दुधाला चांगला बाजारभाव मिळत आहे. यामुळे शेतकरी समाधानी आहे. सरकार शेतकर्यांना दुग्ध व्यवसायाकडे वळण्यासाठी सातत्याने प्रोत्साहन देत आहे. यामुळे याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. दुग्धव्यवसाय उघडण्यासाठी सरकार शेतकर्यांना आर्थिक मदतही देते. आता केंद्र सरकार देशातील प्रत्येक पंचायतीमध्ये डेअरी सुरू करण्याचा विचार करत आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह म्हणाले की, दुग्धव्यवसाय हे शेतकर्याच्या समृद्धीचे साधन बनवले जाऊ शकते. त्याची यंत्रणा सहकारी असावी. त्यामुळे शेतकर्यांची गरिबी दूर होऊ शकते.…
(Bark eating caterpillar) इन्डरबेला क्वाड्रीनोटेटा हे तिचे शास्त्रीय नाव असून लेपिडोप्टेरा या कुळातील आहे हि अळी डाळिंब, पेरू, आंबा, बोर, आंबा, आंवळा, लिंब इत्यादी बागायती पिकांचे नुकसान करते. जीवनक्रम:फिकट तपकिरी रंगाची मादी पतंग सालातील चिरा आणि छिद्रात अंडी घालते. अंड्यातून आठ ते दहा दिवसानंतर लालसर तपकिरी डोके असलेले अळी बाहेर पडते अळीचा कालावधी ९ – १० महिन्यांपर्यंत असु शकतो त्यानंतर अळी त्या बोगद्यात २५ दिवस पर्यंत कोषावस्थेत असते त्यानंतर कोषातून पतंग बाहेर पडतात ते अल्पायुषी असतात वर्षभरात एक पिढी पूर्ण होते. नुकसानीचा प्रकार:साल खाणाऱ्या अळीच्या प्रामुख्याने अंडी, अळी, कोष आणि प्रौढ या चार अवस्था असतात. त्यातील अळी अवस्था सर्वात नुकसानकारक…
पिकांच्या जोमदार वाढीसाठी व अधिक उत्पादनासाठी रासायनिक आणि सेंद्रिय खतांचा संतुलित वापर करणे फायदेशी पिकांच्या जोमदार वाढीसाठी व अधिक उत्पादनासाठी रासायनिक आणि सेंद्रिय खतांचा संतुलित वापर करणे फायदेशीर ठरते. रासायनिक खतांच्या मर्यादा व सेंद्रिय खतांचे फायदे लक्षात घेता पिकास निव्वळ रासायनिक खते न देता त्याबरोबर आपल्याच शेतात तयार होणारी सेंद्रिय खते देणे ही एक शास्त्रीय तशीच काळाची गरज आहे. अलीकडे बागायती क्षेत्र वाढल्यामुळे रासायनिक खतांचा वापर भरपूर वाढला आहे. दिवसेंदिवस शेणखत व कंपोस्ट खते उपलब्ध होत नाहीत. शेतातील ऊस तोडून गेल्यानंतर जी वाळलेली पाने शेतात पडतात, त्यास पाचट असे म्हणतात. पाचटामध्ये लिग्रिन व मेणचट पदार्थाचे प्रमाण १५ टक्के असते. पाचटावर…
परतीच्या पावसाचे गणित २०१० पासून बिघडले आहे. साधारणत: १७ सप्टेंबरला राजस्थानातून माघारी फिरणारा पाऊस यंदा २३ सप्टेंबरपासून माघारी फिरत आहे. मात्र, उष्ण लाटांमुळे राज्यात पावसाचा मुक्काम वाढला आहे. राज्यातून पाऊस १५ ऑक्टोबरनंतर परत जाण्याची शक्यता आहे. पावसामुळे काढणीला आलेले पीक भुईसपाट होत आहे. शेतकऱ्यांना पुढील खरीप हंगामातील पेरणीच्या तारखाही बदलाव्या लागतील, असे मत हवामान अभ्यासक नोंदवीत आहेत. मुंबई : परतीच्या पावसाचे वेध लागले असताना मुंबईसह राज्यभरात पावसाने पुन्हा जोर पकडला आहे. हवामान विभागाने शुक्रवारी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. शनिवारनंतर पाऊस थांबणार असला तरी दिवाळीदरम्यान २० ते २४ ऑक्टोबरदरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. १४…
पुणे | टोमॅटोची वाहतूक करणारा ट्रॅक्टर व ट्रॉली फाट्या मध्ये पडून रावणगाव (ता. दौंड) येथे झालेल्या अपघातात तीन महिला ठार तर सहा महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमींना दौंड व भिगवण येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातातील मयत झालेल्या महिलांची नावे सुरेखा बाळू पानसरे, रेश्मा भाऊसो पानसरे,अश्विनी प्रमोद आटोळे तर इंदुबाई बाबासाहेब आटोळे, मीना बापू आटोळे,अनिता धनाजी साळुंखे, आक्का सुदाम साके, कावेरी माणिक आटोळे, उषा राजेंद्र आटोळे या महिला किरकोळ काही गंभीर जखमी अवस्थेत आहेत गुरुवारी( दि.१३) सायंकाळी पाच वाजता टोमॅटोने भरलेला ट्रॅक्टर शेतातून बाहेर काढत असताना खडकवासला धरण कालव्याच्या बत्तीस फाट्यामध्ये ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात…
अलीकडे शेतीत मोठा बदल पाहायला मिळत आहे. आता शेतकरी बांधव शेतीमध्ये उत्पन्न वाढीचे अनुषंगाने फळपिकांची मोठ्या प्रमाणात शेती करत आहेत. विशेष म्हणजे फळबाग शेतीतून शेतकऱ्यांना चांगली कमाई होत आहे. किन्नू हे देखील असंच एक फळ पीक आहे. आज आम्ही तुम्हाला किन्नू शेती विषयी काही महत्त्वाच्या बाबी सांगणार आहोत. खरं पाहता भारतातील जवळपास सर्वच प्रदेशात किन्नूची लागवड सहज करता येते. यामध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण सर्वाधिक असते. हा आंबट आणि गोड फळांचा संतुलित आहार आहे. ते खाल्ल्याने शरीरात रक्त वाढते आणि हाडे मजबूत होतात. यासोबतच किन्नू खाल्ल्याने पचनशक्ती चांगली राहते. हे लिंबूवर्गीय पीक आहे. ज्यामध्ये संत्रा, लिंबू आणि टेंजेरिन या जातींचा समावेश…
आहारचे योग्य संतुलन राखायचे असेल, तर भाज्या, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, डाळी, कडधान्ये इत्यादींच्या बरोबर फळांचाही समावेश आहारामध्ये असायला हवा. अशाच फळांपैकी एक फळ म्हणजे अंजीर. हे फळ ताजे आणि सुकविलेले अशा दोन्ही प्रकारे खाता येते. अंजीर आरोग्याला अतिशय फायदेशीर असून, याचे नियमित सेवन करण्याचा सल्ला आहारतज्ञ देतात. निरनिराळ्या ऋतूमध्ये मिळणारी ताजी फळे, ही निसर्गाने मनुष्याला दिलेली देणगीच आहे. ही ताजी रसरशीत फळे शरीराच्या आरोग्याकरिता अतिशय लाभदायक असतात. अंजीर हा सुकामेव्यातील एक पदार्थ आहे. ओलं फळ किंवा सुकवलेले अंजीर हे दोन्ही आरोग्याला फायदेशीर ठरते. अंजीरचे फायदे अंजीरमध्ये फायबर घटक मुबलक असल्याने पोट साफ होण्यास मदत होते. ताजे आणि सुकवलेले अंजीर…
शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 12/10/2022 अहमदनगर — क्विंटल 316 4000 5000 4500 येवला — क्विंटल 1640 3900 5000 4400 लासलगाव — क्विंटल 2605 3000 5280 5081 औरंगाबाद — क्विंटल 26 4001 4676 4338 माजलगाव — क्विंटल 1628 3800 4900 4500 राहूरी -वांबोरी — क्विंटल 34 4000 4701 4350 उदगीर — क्विंटल 1975 5100 5201 5150 कारंजा — क्विंटल 3000 4150 4800 4525 लासूर स्टेशन — क्विंटल 146 4250 4900 4650 तुळजापूर — क्विंटल 220 4500 4951 4800 राहता — क्विंटल 30 4286 4901 4351 धुळे…
