- Homepage
- ताज्या बातम्या
- बाजार-भाव
- शेतीविषयक
- कृषी-चर्चा
- हवामान
- पशु पालन
- इंडस्ट्री
- सरकारी योजना
- ग्रामीण उद्योग
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Neha Sharma
शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 25/08/2023 कोल्हापूर — क्विंटल 3820 1000 2400 2400 अकोला — क्विंटल 310 1500 2500 2100 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 516 2400 4500 3200 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 10287 1000 2500 1750 खेड-चाकण — क्विंटल 200 1000 2300 1800 दौंड-केडगाव — क्विंटल 2950 1200 2800 2100 जुन्नर – नारायणगाव चिंचवड क्विंटल 20 500 2250 1500 जुन्नर -आळेफाटा चिंचवड क्विंटल 9320 1200 2710 2200 सोलापूर लाल क्विंटल 12676 100 3200 1300 धुळे लाल क्विंटल 390 200 2300 1800 जळगाव…
शेतमाल : कापूस दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 25/08/2023 पारशिवनी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 160 7200 7300 7250 24/08/2023 आर्वी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 721 7500 7650 7600 खामगाव मध्यम स्टेपल क्विंटल 30 6600 7700 7510 23/08/2023 आर्वी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 707 7500 7650 7600 खामगाव मध्यम स्टेपल क्विंटल 92 6700 7800 7250 पुलगाव मध्यम स्टेपल क्विंटल 135 7600 7600 7600 22/08/2023 आर्वी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 842 7500 7650 7600 बारामती मध्यम स्टेपल क्विंटल 11 6100 6500 6400 खामगाव मध्यम स्टेपल क्विंटल 25…
केंद्र सरकार साखरेच्या निर्यातीवर बंदी (Sugar Export Ban) घालणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. या मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. साखरेच्या निर्यातीवर बंधने आणावीत याबाबत केंद्र सरकारच्या मंत्रालयात चर्चा सुरु आहे. साखर निर्यातीवर जर बंदी घातली तर साखरेचे बाजारभाव कमी येतील असे शरद पवार म्हणाले. याबाबत मी काही लोकांची चर्चा केल्याचे पवार म्हणाले. कमी पावसाचा उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता यावर्षी आतापर्यंत कमी पाऊस झाला आहे. पावसाळ्यात पाऊस कमी पडल्याने ऊस उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत आगामी सणासुदीचा हंगाम आणि या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि 2024 मध्ये होणाऱ्या…
ऑगस्ट महिना संपत आला तरी राज्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पण आता राज्यातील पाऊस दिलासा देण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि कोकणतील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. तर उर्वरित राज्याच्या इतर भागात देखील हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान खात्याने विदर्भ आणि कोकणात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदीया तसेच गडचिरोली जिल्ह्यातील काही ठिकाणी अति जोरदार ते जोरदार पावसाचा अंदाज दिला. या भागांमध्ये विजांसह पावसाची शक्यता आहे. तसेच विदर्भातील इतर भागांमध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. इतर विदर्भाच्या इतर…
सध्या राज्यात पावसानं दडी मारल्याचं चित्र आहे. त्यामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत. राज्यातील शेतकऱ्यांनी दुष्काळाची (Drought) चाहूल लक्षात घेऊन उपलब्ध पाण्याचा ताळेबंद आखून पुढील पावलं टाकणं गरजेचं असल्याचं मत आदर्श गाव हिवरे बाजारचे कार्याध्यक्ष पोपटराव पाटील (Popatrao Pawar) यांनी व्यक्त केलं. राज्य सरकारनं आतापासूनच शेतकऱ्यांच्या जनावरांच्या चाऱ्याबाबत नियोजन करणं गरजेचं असल्याचीही सूचना त्यांनी केली. एबीपी माझानं त्यांची संपर्क साधला, त्यावेळी ते बोलत होते. दुग्ध व्यवसायावरही परिणाम होण्याची शक्यता सध्या राज्यातील अनेक भागात पावसानं ओढ दिली आहे. त्यामुळं खरिपाचं पीक वाया जाण्याची भीती आहे. पावसानं ओढ दिल्याचा परिणाम दुग्ध व्यवसायावरही झाल्यानं शेतकरी अडचणीत सापडण्याची शक्यता पोपटराव पवार यांनी व्यक्त केली. पावसाच्या या पार्श्वभूमीवर…
राज्यात सध्या पावसानं (Rain) दडी मारली आहे. शेतकऱ्यांच्या पिकांना पावसाची गरज असताना पाऊस पडताना दिसत नाही. हातची पीकं वाया जाण्याचा धोका निर्माण झालाय. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैमध्ये काही प्रमाणात पाऊस झाला. मात्र, पुन्हा ऑगस्ट महिना संपत आला तरी म्हणावा तसा पाऊस झाला नाही. यासंदर्भातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट केलं आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यात दुष्काळ जाहिर करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, तसेच परीस्थितीचा तातडीने आढावा घ्यावा अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केलीय. राज्यातील अनेक जिल्हे तहानलेले सुप्रिया सुळेंनी राज्यातील पावासाच्या स्थितीबाबत ट्वीट केलं आहे. यामध्ये त्यांनी राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. राज्यात पावसानं दडी मारल्यानं बळीराजा…
नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकरी आता पुन्हा आक्रमक झाले आहेत. आक्रमक शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पडलेले आहेत. चांदवड, लासलगाव पिंपळगाव आणि येवला बाजार समितीत शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडला आहे. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या उपस्थित (दि.२३) रोजी बैठक पार पडली होती. त्यावेळी नाफेडमार्फेत २४१० रुपयांनी शेतकऱ्यांचा कांदा खरेदी केला जाईल, असं स्पष्ट करण्यात आले होते. पण तसं झालं नाही. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी कांदा मार्केट बंद पाडले आहे. शेतकऱ्यांना कांदा खरेदीचा भाव २४१० रुपये मिळणे अपेक्षित होते. पण प्रत्यक्षात मात्र आज या ठिकाणी ज्यावेळी लिलाव सुरू झाले. त्यावेळेला शेतकऱ्यांना २००० ते २१०० भाव देण्यात आला. त्यामुळे…
सध्या संपूर्ण राज्यामध्ये पावसाने खंड दिला असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड प्रमाणात चिंतेचे वातावरण पसरले आहे. अजून दोन दिवस राज्यामध्ये पावसाची पोषक परिस्थिती नसल्याचे देखील हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे. गेल्या दोन दिवसापासून राज्यातील विदर्भ व मराठवाडा तसेच काही भागांमध्ये थोड्याफार प्रमाणात पावसाला सुरुवात झाली. परंतु हा पाऊस पुरेसा नसून जोरदार पावसाची प्रतीक्षा शेतकरी बंधूंना आहे. जर या बाबतीत हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर मराठवाडा व कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये 24 ऑगस्टपर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे. परंतु आजपासून विदर्भात हवामान कोरडे राहण्याचा देखील अंदाज वर्तवण्यात आला आहे. परंतु…
इस्रोच्या (ISRO) चांद्रयान-3 (Chandrayaan-3 Mission) चं चंद्रावर यशस्वी लँडिंग झालं आहे. भारतातील 140 कोटी जनतेची मान आज अभिमानाने वर गेली आहे. भारताच्या चंद्रयानाने चंद्राला अलिंगन दिलं आहे. इस्रोचं चांद्रयान-3 चंद्राच्या कुशीत शिरलं आहे. चंद्रमोहिमांच्या अपयशाची जळमटं क्षणार्धात कुठल्या कुठं झटकून टाकली गेली आहेत. चंद्रयान 3 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरताच भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अशी कामगिरी करणारा भारत हा पहिला देश आहे. तर चंद्रावर मोहीम फत्ते करणारा भारत चौथा देश ठरला आहे. चंद्राच्या अभ्यास करण्यास यामुळे मोलाची मदत होणार आहे. इस्रोच्या या कामगिरीमुळे प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावली आहे. 40 दिवसांचा प्रवास करत चंद्रयान 3 चंद्राच्या…
राज्यातील नाशवंत माल साठवणुकीसाठी १३ ठिकाणी ‘कृषक समृद्धी प्रकल्प’ उभारणार आहोत. या ठिकाणी रब्बी कांदा पिकासाठी १० लाख टन इतकी शास्त्रोक्त पद्धतीने साठवणूक क्षमता उपलब्ध करून दिली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी (ता. २२) दिली. केंद्र सरकारने दोन लाख टन कांदा खरेदीचा निर्णय घेतल्यानंतर सह्याद्री अतिथिगृहावर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री पवार यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचा पुनरुच्चार केला. Onion Procurment मुख्यमंत्री म्हणाले, की कांद्याच्या दरातील घसरणीचा अभ्यास करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने सुचविलेल्या विविध शिफारशींवर विचार सुरू आहे. यात काही तत्काळ अंमलबजावणी करण्याच्या आणि काही दीर्घकालीन उपाययोजनासुद्धा आहेत. कांदाप्रश्नी राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून,…
