- Homepage
- ताज्या बातम्या
- बाजार-भाव
- शेतीविषयक
- कृषी-चर्चा
- हवामान
- पशु पालन
- इंडस्ट्री
- सरकारी योजना
- ग्रामीण उद्योग
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Neha Sharma
देशात दरवर्षी ११ हजार कोटी मुल्याचा कांदा हा योग्य साठवण क्षमतांअभावी वाया जातो, असे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाने २०२२ मध्ये जारी केलेल्या एका रिपोर्टमध्ये म्हटले होते. ‘अपेडा’कडील माहितीनुसार मागील आर्थिक वर्षांत (एप्रिल-मार्च २२-२३) देशातून 4522 कोटी रुपये मुल्याचा कांदा निर्यात झाला आहे.म्हणजे निर्यात मुल्यापेक्षा दुपटीहून जादा कांदा हा चांगल्या साठवण सुविधांअभावी वाया जातो. नेमके काम कुठे करणे गरजेचे आहे? कारण केंद्र सरकारने अलिकडेच ४० टक्के ड्यूटी लावून निर्यात रोखण्याचा प्रयत्न केला आहे. जर स्टोअरेज लॉसेस वाचवले तर निर्यात प्रतिबंधित करण्याची गरज आली नसती. आणखी एक पर्याय आहे निर्जलीकरणाचा. -डिहायड्रेशन. साधारणपणे दहा किलो कच्चा कांदा डिहायड्रेड केला तर एका किलोपर्यंत घटतो.…
केंद्र सरकारनं नाफेड आणि एन सी सी एफ मार्फत महाराष्ट्रातील दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा कांदा 2 हजार 410 रुपये प्रति क्विंटल दराने मिळणार आहे. दरम्यान, या कांदा खरेदीला आजपासूनच सुरुवात होणार आहे. आवश्यकता भासल्यास अधिकचा कांदाही खरेदी करणार असल्याचे मत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी व्यक्त केलं. अहमदनगर, नाशिक, लासलगाव केंद्रावरुन कांद्याची खरेदी होणार महाराष्ट्रातील कांदा प्रश्नी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या मागणीस केंद्र सरकारनं सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत राज्यातील दोन लाख मेट्रिक टन कांदा 2 हजार 410 रुपये प्रतिक्विंटल या दराने आजपासूनच…
कृषी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Mudne) आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांच्या झालेल्या बैठकीत कांदा दराबाबत महत्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. केंद्र सरकार नाफेडमार्फत (NAFED) दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार असल्याची घोषणा मंत्री पियुष गोयल यांनी केली आहे. त्यामुळे काहीअंशी शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क वाढविल्यामुळे (Export Duty) गेल्या दोन दिवसांपासून शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत होते. त्यामुळे अनेक आंदोलन करण्यात आली. रास्ता रोको करण्यात आला. या पार्श्वभूमीवर आज कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेत कांदा प्रश्नावर चर्चा केली. यावर पियुष गोयल यांनी सकारात्मक उत्तर देत कांदा प्रश्नावर दिलासा देणारी…
केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर चाळीस टक्के शुल्क(onion) आकारण्याचा निर्णय घेतला आहे. या विरोधात खासदार अमोल कोल्हे यांनी आंदोलन छेडलं आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केंद्र सरकार दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र या निर्णयाने शेतकरी समाधानी नसल्याने अमोल कोल्हे आंदोलनावर ठाम आहेत. कांदा फेकून दिला तेव्हा देवेंद्र फडणवीस यांना जाग आली नाही का? असा सवाल उपस्थित करत आम्हाला 4 हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळायलाच हवा, अशी मागणी त्यांनी केली आहे. केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर चाळीस टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. हे चुकीचे कृषी धोरण आहे, म्हणूनच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे…
कापूस बाजार गेल्या काही दिवसांपासून स्थिर दिसतो. देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील वायद्यांमध्ये मात्र काहीसे चढ उतार सुरु आहेत. देशात सध्या कापसाला प्रतिक्विंटल सरासरी ७ हजार ते ८ हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळतोय. तर वायद्यांमध्ये आज दुपारपर्यंत कापसाचे भाव काहीसे नरमले होते. वायद्यांमध्ये दुपारपर्यंत भाव ५९ हजार ८२० रुपये प्रतिखंडीचा भाव मिळत आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे गेल्या आठवडाभरापासून ८५ सेंटभोवती फिरत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे आज दुपारपर्यंत ८४.२० सेंट प्रतिपाऊंडवर होते. कापसाचा भाव स्थिरावल्याने बाजारातील आवकही स्थिर दिसते. बाजारात ७ हजार गाठींची आवक झाल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं. दुसरीकडं देशातील कापूस लागवड आतापर्यंत २ टक्क्यांनी कमी दिसते. पिकाला कमी पावसाचा फटकाही…
आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की धनगर समाज हा त्यांच्या मेंढ्यांच्या उदरनिर्वाह करिता कायम फिरस्तीवरच असतात. कायम त्यांना त्यांचे घर सोडून मेंढ्यांच्या पालन पोषणाकरिता एका ठिकाणाहून दुसरीकडे जावे लागते. त्यामुळे ही सगळी परिस्थिती समोर ठेवून मेंढपाळ बंधूंच्या जीवनामध्ये देखील सुधारणा करणे गरजेचे असून त्या अनुषंगाने मेंढ्यांच्या पालन पोषणाकरिता नियोजन करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी बैठकीचे आयोजन केलेले होते व त्यामध्ये त्यांनी पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभागाला यासंबंधी काही आवश्यक कार्यवाही करण्यासाठी महत्त्वाच्या सूचना दिल्या. याबद्दलचे सविस्तर वृत्त असे की धनगर बांधवांच्या जीवनामध्ये काळानुरूप सुधारणा करण्याच्या अनुषंगाने मेंढ्यांच्या पालन पोषणाकरिता चराई क्षेत्रालगतची जमीन अर्धबंदिस्त…
केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के निर्यात मूल्य आकारल्यानंतर त्याचे पडसाद राज्यभर उमटू लागलेले आहेत. या निर्णयाला विरोध करण्यासाठी आज शेतकरी संघटना आक्रमक झालेल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील व्यापारी असोसिएशनने जिल्ह्यातील 14 समित्यांवरील लिलाव आज बेमुदत बंद ठेवलेले आहेत. काल झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. तर एकमेव पिंपळगाव बाजार समितीमध्ये कांदा लिलावासाठी ट्रॅक्टर आल्याचे समजते आहे. त्यामुळे येथील कांदा लिलाव सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारने कांद्याचा निर्यात शुल्क वाढवून 40 टक्क्यांवर नेल्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी (Onion Farmers) आणि व्यापारी आक्रमक झाल्यात सरकारच्या निर्णयामुळे कांद्याच्या निर्यातीमध्ये घट होणार आहे. यामुळे पुढच्या काळात किरकोळ बाजारात कांद्याचे दर…
केंद्र सरकारने कांद्याबाबत रविवारी आणखी एक निर्णय घेतला आहे. कांद्याचा बफर स्टॉक तीन लाख टनांवरून पाच लाख टनांपर्यंत वाढवला आहे. तसंच हा कांदा NCCF मार्फत आजपासून २५ रुपये प्रति किलो दरानं कांदा विकण्यात येणार आहे. तर आता केंद्राने बफर स्टॉकमधून कांद्याची विल्हेवाट लावण्यास सुरुवात केली आहे. ज्या भागात किंवा राज्यांत किरकोळ किमती अखिल भारतीय सरासरीपेक्षा जास्त आहेत, अशी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील प्रमुख बाजारपेठांमध्ये NCCF मार्फत कांदा विकण्यात येणार आहे. आजपर्यंत, बफरमधून सुमारे चौदाशे टन कांदा बाजारपेठेत पाठवले गेला आहे. बफर स्टॉकमधून सुमारे १४०० टन कांदा बाजारापेठेत पाठवला आहे. एजन्सी आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मचा समावेश करून आगामी काळात कांद्याची किरकोळ विक्री…
तलाठी परिक्षा (Talathi Exam) पार पडत असताना सर्व्हर डाऊन झाल्यामुळे राज्यातील सर्वच परिक्षा केंद्रावर गोंधळ उडाला. यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. यावरुन आमदार रोहीत पवार यांनी सरकारवर टीका केली आहे. रोहीत पवार यांनी ट्विट करुन सरकारवर टीका केली आहे. ते ट्विटमध्ये म्हणाले की, “तलाठी भरतीसाठी हजार रुपये शुल्क वसुली करुनही संबंधित कंपनीला परीक्षा सुरळीत घेता येत नाही. कधी पेपरफुटी तर कधी सर्व्हर डाऊन… ही अडथळ्यांची शर्यत परिक्षार्थ्यांना पार पाडावी लागतेय. सकाळी ८ वाजता रजिस्ट्रेशन सुरु होणं अपेक्षित असताना सर्व्हर डाऊन झाल्याने संपूर्ण राज्यातील परीक्षा खोळंबली. या सरकारला काही #SERIOUSNESS आहे की नाही? की यात काही काळंबेरं आहे?”, असा…
सध्या सुरु असलेल्या कांदाप्रश्नी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांची दिल्लीत भेट घेणार आहेत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्र सरकारसोबत आणि केंद्र सरकारमधील काही महत्त्वाच्या नेत्यांसोबत धनंजय मुंडे उद्या चर्चा करणार आहेत. या चर्चेअंती तरी काही तोडगा निघणार का? हे पाहणं आता महत्त्वाचं आहे. शेतकऱ्यांना सुद्धा मालाचा योग्य बाजाराभाव मिळावा,यासाठी कृषिमंत्री मुंडे केंद्रीय कृषिमंत्री आणि वाणिज्यमंत्री यांना भेटणार आहेत. उद्या होणाऱ्या या बैठकीत आणखी इतर शेती प्रश्नांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. ४० टक्के निर्यातकर आकारणीविरोधात बंद केंद्र सरकारने कांद्यावर लादलेल्या ४० टक्के निर्यातकर आकारणीविरोधात नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनने बंदचा…
