Author: Neha Sharma

पंतप्रधान पीक विमा योजनेतील (PMFBY) लाभार्थ्यांचे 2021-22 मधील 2,761.10 कोटी रुपयांचे दावे प्रलंबित असल्याची माहिती केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर (Agriculture Minister Narendra Singh Tomar) यांनी संसदेत दिली.  राजस्थान, महाराष्ट्र आणि गुजरात (Rajasthan, Maharashtra and Gujarat) या राज्याला मिळणारे पीक विम्याचे पैसे सर्वाधिक प्रलंबित आहेत. या तीन राज्यातील शेतकऱ्यांना अद्याप अडीच हजार कोटी रुपयांची भरपाई मिळालेली नाही, त्यात महाराष्ट्रातील 336 कोटी रुपयांचे दावे प्रलंबित आहेत.  केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर (Agriculture Minister Narendra Singh Tomar) यांनी संसदेत लेखी उत्तरात पीक विम्यासंदर्भात माहिती दिली. महाराष्ट्रासह गुजरात आणि राजस्थानमधील काही शेतकऱ्यांचे (पंतप्रधान पीकविमा योजनेचे) पीक विम्याचे पैसे अद्याप मिळाले नाहीत, त्याविषयी विचारलेल्या प्रश्नांला नरेंद्रसिंह…

Read More

मॉन्सूनचा आस उत्तरेकडे सरकल्याने राज्याच्या अनेक भागात पावसाने उघडीप दिली आहे. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडत आहेत. आज (ता. ८) राज्यात ढगाळ आकाशासह ऊन सावल्यांच्या खेळात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज कायम असल्यानचे हवामान विभागाने म्हटले आहे. उत्तर बांग्लादेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत आहेत. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा त्याच्या सर्वसाधारण स्थितीच्या उत्तरेकडे सरकला आहे. Rain Forecast हा आस पंजाबच्या अमृतसरपासून कर्नाल, बरेली, गोरखपूर, भागलपूर, मालदा ते मनिपूरपर्यंत विस्तारला आहे. पुढील चार ते पाच दिवस मॉन्सूनचा आस हिमालयाच्या पायथ्याकडे राहण्याची शक्यता आहे. उत्तरेकडे सरकलेला मॉन्सूनचा आस, किनारपट्टीला समांतर कमी दाब पट्ट्याचा…

Read More

पशुसंवर्धन आयुक्‍त हेमंत वसेकर यांनी कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विकास विभागाच्या सचिवांकडे एक मागणी केली केली. यामध्ये राज्यात शेतीपूरक पोल्ट्री व्यवसाय करणाऱ्यांना व्यावसायिक दराने वीजपुरवठा केला जातो. यामुळे विजेवर मोठा खर्च होत आहे. त्यामुळे कुक्‍कुटपालकांना कृषिपंपाप्रमाणे सवलतीच्या दरात वीजपुरवठा करण्याबाबत ऊर्जा विभागाला विनंती करून त्यामाध्यमातून ‘महावितरण’ला निर्देश द्यावेत, असे म्हटले आहे. पोल्ट्री व्यवसायिकांच्या समस्या सोडविण्यासाठी समन्वय समितीचे गठण पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या सूचनेवरून करण्यात आले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यामध्ये बपोल्ट्री क्षेत्रातील विविध समस्यांसोबतच वीज दराबाबतचा मुद्दाही सातत्याने मांडण्यात आला आहे. यापूर्वी शासनास प्रस्ताव सादर केला होता. यावर निर्णय झाला नाही. पशुपालकांच्या मागणीनुसार वीज देयक दरात…

Read More

मराठवाड्यात देखील जून महिन्याने पावसाने चांगलीच हुलकावणी दिली आहे. किमान १५ जूनला तरी पेरण्या होतील अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मराठवाड्यात जून महिना पूर्ण सरला तरी पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. जुलै महिन्यात पाऊस झाला पण हातचा राखूनच. ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा सरला आहे. तरी पाऊस बळीराजावर कृपा करत नाही. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. संपूर्ण मराठवाड्यात आतापर्यंत सरासरी ३३६ मिमी पाऊस झाला आहे. ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा सरला आहे तरी मराठवाड्यात नांदेड जिल्हा वगळता इतर भागात पाऊस नाही. जर यंदा पाऊस झाला नाही तर मराठवाड्यात दुष्काळाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तसंच…

Read More

सुमारे दोन लाखांपेक्षा जास्त परोपजीवी कीटक आणि सात हजारांपेक्षा जास्त परभक्षी कीटकांच्या प्रजाती आहेत. तसेच पाचशेपेक्षा जास्त विषाणू, जिवाणू आणि इतर रोगांच्या प्रजाती किडींचे शत्रू म्हणून कीटक विश्वात कार्यरत आहेत. त्यापैकी जैविक कीडनाशके म्हणून विकसित झालेल्या घटकांची निर्मिती व पुरवठा कृषी विद्यापीठे आणि खासगी कंपन्यांद्वारे केला जात आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्याद्वारे विकसित केलेली उपयुक्त जैविक कीडनाशके पुढीलप्रमाणे. Use of Trichocard for pest control ट्रायकोग्रामा (Trichogramma cards) हा गांधील माशीसारखा दिसणारा परोपजीवी कीटक असून, त्याचा आकार अतिशय लहान म्हणजेच ०.४-०.७ मि.मी.असतो. जैविक कीड नियंत्रणासाठी वापरण्यात येणारा प्रमुख किटक म्हणून ट्रायकोग्रॅमा मित्र किटकाची ओळख आहे. या ट्रायकोग्रॅमाच्या ८० हून अधिक…

Read More

१ ऑगस्टपासून NCDEX मध्ये मक्यासाठी डिसेंबर डिलिव्हरी व्यवहार सुरू झाले. सध्या NCDEX मध्ये मक्यासाठी सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर डिलिव्हरीसाठी व हळदीसाठी ऑक्टोबर व डिसेंबर डिलिव्हरीसाठी व्यवहार करता येतील. MCX मध्ये कापसासाठी नोव्हेंबर व जानेवारी डिलिव्हरीसाठी आणि कपाशीसाठी नोव्हेंबर, फेब्रुवारी व एप्रिल डिलिव्हरीसाठी व्यवहार चालू आहेत. हळदीच्या किमतीतील तेजी याही सप्ताहात कायम राहिली आहे. हळदीच्या स्पॉट व फ्यूचर्स किमतींमध्ये बराच मोठा फरक आहे. त्यामुळे फ्यूचर्स मार्केटमध्ये विकणे अजूनही किफायतशीर आहे. हेजिंगसाठी संधी आहे. मका, हळद, तूर, हरभरा, कांदा व टोमॅटो यांच्या किमती वाढत आहेत. कापसाचे भाव १४ जुलैपर्यंत घसरत होते; आता ते वाढत आहेत. मुगाच्या किमती मात्र मे महिन्यापासून घसरत…

Read More

शेतमाल : टोमॅटो दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 06/08/2023 कोल्हापूर — क्विंटल 45 3000 8000 5500 पुणे-मांजरी — क्विंटल 395 6800 12000 9300 मंचर — क्विंटल 1 9000 14000 11500 राहता — क्विंटल 20 2500 11000 6700 रामटेक हायब्रीड क्विंटल 68 12000 16000 14000 पुणे लोकल क्विंटल 1769 4000 12000 8000 पुणे- खडकी लोकल क्विंटल 4 3000 7000 5000 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 1 7000 7000 7000 पुणे-मोशी लोकल क्विंटल 110 8000 10000 9000 मंगळवेढा लोकल क्विंटल 11 2200 10000 8100 भुसावळ वैशाली क्विंटल 5 10000 12000 11000 05/08/2023…

Read More

शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 06/08/2023 मंचर — क्विंटल 6391 1500 2250 1875 दौंड-केडगाव — क्विंटल 2525 450 1800 1500 राहता — क्विंटल 11096 500 2500 1950 जुन्नर चिंचवड क्विंटल 5485 1100 2250 1900 जुन्नर -आळेफाटा चिंचवड क्विंटल 7521 1100 2510 1900 पुणे लोकल क्विंटल 11367 800 1800 1300 पुणे- खडकी लोकल क्विंटल 6 1000 1600 1300 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 34 600 1600 1100 पुणे-मांजरी लोकल क्विंटल 148 800 1100 1000 पुणे-मोशी लोकल क्विंटल 309 400 1200 800 जुन्नर -ओतूर उन्हाळी क्विंटल 8599 800 2210…

Read More

: पुणेः सध्या हळदीच्या बाजारात मोठी तेजी आली. हळदीचे भाव एकाच महिन्यात जवळपास दुप्पट झाले. आता नव्या लागवडी संपल्या. पण यंदा हळदीच्या लागवडीत घट झाल्याचे अहवाल आहेत. त्यामुळे हळदीच्या भावातील तेजी पुढील काळातही टिकून राहू शकते, असे अभ्यासकांनी सांगितले. हळदीचा बाजार गेली दोन वर्षे मंदीत होता. कोरोना काळात भाव वाढल्यानंतर शेतकऱ्यांनी लागवडी काहीशा वाढवल्या होत्या. पण नंतरच्या काळात हळदीचे भाव नरमले. हळदीला सलग दोन वर्षे भाव कमी मिळाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी २०२२-२३ च्या हंगामात हळद लागवड कमी केली. तसचं हळद पिकाला काढणीच्या काळात पावसाचा फटका बसला होता. महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील हळद उत्पादक भागात मार्च आणि एप्रिलमध्ये फटका बसला. तसच…

Read More

कपाशी पिकावर तुडतुडे यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. जर आपण याबाबतीत कपाशीच्या वाणाचा विचार केला तर ज्या कपाशीच्या वाणाच्या पानावर लव नसते असे वाण लवकर व जास्त प्रमाणात या किडीस बळी पडतात. तसेच ज्या कपाशीच्या वाणाच्या पानावर खालच्या बाजूला लांब व दाट केस असतात अशा वाणावर प्रादुर्भाव कमी होतो. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यामध्ये पावसाने दिलेली उघडीप किंवा ढगाळ वातावरण असते अशा वातावरणामध्ये तुडतुडे किडेची वाढ जास्त होते. या किडीची पिल्ले आणि प्रौढ पानाच्या खालच्या बाजूस राहून रस शोषण करतात व पानात विषारी द्राव सोडतात. त्यामुळे पानाच्या प्रकाश संश्लेषण क्रियेवर विपरीत परिणाम होऊन झाडाची वाढ खुंटते. प्रादुर्भाव झालेली पाने खालच्या…

Read More