- Homepage
- ताज्या बातम्या
- बाजार-भाव
- शेतीविषयक
- कृषी-चर्चा
- हवामान
- पशु पालन
- इंडस्ट्री
- सरकारी योजना
- ग्रामीण उद्योग
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Neha Sharma
मार्केट यार्डातील घाऊक बाजारात टोमॅटोची आवक घटल्याने दरांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात सध्या एक किलो टोमॅटोची विक्री प्रतवारीनुसार ६० ते ७० रुपये या दराने केली जात आहे. गेल्या महिन्यात टोमॅटोचा प्रतिकिलो दर १० ते ३० रुपये होता. गेले दोन महिने टोमॅटोला दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी टोमॅटोचे उत्पादन घेणे बंद केल्याने मार्केट यार्डमधील टोमॅटोची आवक निम्म्यावर आली आहे. परिणामी, आता पुरवठ्याच्या तुलनेत मागणी अधिक असल्याने टोमॅटोच्या दरात तेजी अली आहे. टोमॅटोचे उत्पादन वर्षभर घेतले जाते. पुण्यासह, नगर, नाशिक, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आदी भागांतून टोमॅटोची मोठ्या प्रमाणावर आवक होत असते. गेल्या एक ते दीड महिन्यांपूर्वी बाजारपेठेत टोमॅटोची मोठ्या…
अरबी समुद्रात तयार झालेल्या बिपरजॉय चक्रीवादळाचा (Biparjoy Cyclone) धोका वाढत आहे. भारताच्या (India) गुजरात (Gujrat) किनारपट्टी भागात बिपरजॉय चक्रीवादळ (Cyclone Biporjoy) धडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चक्रीवादळीच वाढती तीव्रता पाहता भारतीय हवामान विभागाने गुजरातमधील सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टी भागात ऑरेंज अलर्ट (IMD Orange Alert) जारी केला आहे. याआधी हवामान विभागाने या भागात येलो अलर्ट दिला होता. पण चक्रीवादळाची तीव्रता वाढताना दिसत आहे, त्यामुळे हवामान विभागाने किनारपट्टी भागातील नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. तीव्र चक्रीवादळ बिपरजॉय उत्तरेकडे सरकलं हवामान विभागाने आज दिलेल्या ताज्या माहितीनुसार, पूर्वमध्य आणि लगतच्या ईशान्य अरबी समुद्रावर बिपरजॉय चक्रीवादळाला अत्यंत तीव्र चक्रीवादळ म्हटलं आहे. हलामान विभागाने पुढे सांगितलं आहे की, ‘पूर्वमध्य…
पालखी प्रस्थान सोहळा हा दरवर्षी आयोजित होतो. आजही मानाच्या 56 पालख्या आल्या होत्या. गेल्यावर्षी चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली होती आणि त्यावेळी काही महिला सुद्धा जखमी झाल्या होत्या. त्यामुळे यावर्षी प्रधान जिल्हा न्यायाधीश, धर्मादाय आयुक्त, मंदिर प्रमुख विश्वस्त यांच्यासोबत 3 वेळा बैठका घेऊन गेल्यावर्षीसारखी परिस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून प्रत्येक मानाच्या पालखीतील प्रत्येकी 75 जणांना प्रवेश देण्याचा निर्णय पूर्वीच घेण्यात आला आणि तसे नियोजन सुद्धा करण्यात आले. मानाच्या दिंडीप्रमुखांनी सुद्धा तो मान्य केला. त्यानुसार पासेस वितरित करण्यात आल्या. मुख्य म्हणजे सर्व मानाच्या दिंडी प्रत्येकी 75 जणांनाच पाठवित होते. मात्र आज अचानक काही स्थानिक युवकांनी मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. मंदिर विश्वस्त आणि…
सोयाबीन (Soybean) आणि कापूस (Cotton)उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा आक्रमक झाली आहे. येत्या 15 जूनपर्यंत यासंदर्भात निर्णय घ्या अन्यथा, 16 जूनला मुंबईच्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इमारतीवरुन उड्या मारु असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी दिला आहे. यामध्ये जर शेतकर्यांच्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल असा इशाराही तुपकरांनी दिला आहे. . अद्यापही अनेक शेतकरी पिक विम्यापासून वंचित सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या अडचणीत आहे. तुटपुंज्या मिळणाऱ्या बाजारभावामुळं शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच AIC या पिकविमा कंपनीने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना पिकविमा दिला नाही. तसेच अतिवृष्टीची मदतही मोठया प्रमाणात…
सरकारने स्टाॅक लिमिट लावले तरी तुरीचे भाव तेजीतच आहेत. मागील पाच महिन्यात तुरीच्या भावात ३० टक्क्यांपर्यंत वाढ झाली. देशात उत्पादनच कमी असल्याने भाव तेजीत आले, असे व्यापारी आणि प्रक्रियादार सांगतात. सरकारला मात्र वेगळाचं संशय आहे. व्यापारी आणि आयातदार बाजारातील पुरवठा कमी करून भाव वाढत आहेत, अशी शंका सरकारला आहे. केंद्र सरकारने तुरीवर २ जून रोजी स्टाॅक लिमिट लावले. तुरीचे भाव काही बाजारांमध्ये ११ हजारांवर पोचल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला. ३१ ऑक्टोबरपर्यंत स्टाॅक लिमिट असेल. घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी आणि मोठ्या रिटेल चेन्स, प्रक्रिया उद्योग तेसच आयातदारांना स्टाॅकचे लिमिट ठरवून दिले. केंद्राने स्टाॅक लिमिट लावल्यानंतर तूर डाळीच्या भावात क्विंटलमागं २०० रुपयांची…
शेतमाल : कापूस दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 11/06/2023 वरोरा-माढेली लोकल क्विंटल 435 7000 7150 7100 वरोरा-खांबाडा लोकल क्विंटल 400 3500 7200 7000 10/06/2023 सावनेर — क्विंटल 1700 7200 7225 7225 राळेगाव — क्विंटल 2510 6700 7190 7100 वडवणी — क्विंटल 16 6670 6670 6670 आर्वी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 967 7200 7400 7300 पारशिवनी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 830 7000 7200 7150 उमरेड लोकल क्विंटल 302 6000 7120 7000 वरोरा-माढेली लोकल क्विंटल 569 6700 7150 7000 वरोरा-खांबाडा लोकल क्विंटल 800 6000 7200 7000 हिंगणघाट मध्यम स्टेपल…
शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 11/06/2023 सातारा — क्विंटल 287 800 1200 1000 पुणे लोकल क्विंटल 15934 500 1300 900 पुणे- खडकी लोकल क्विंटल 39 500 1000 750 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 47 400 1200 800 पुणे-मोशी लोकल क्विंटल 508 200 1000 600 10/06/2023 कोल्हापूर — क्विंटल 4996 500 1600 1000 अकोला — क्विंटल 228 500 1100 700 औरंगाबाद — क्विंटल 1846 100 800 450 खेड-चाकण — क्विंटल 2000 700 1300 1000 सातारा — क्विंटल 371 800 1200 1000 जुन्नर – नारायणगाव चिंचवड क्विंटल 15 500…
शेतकऱ्यांची खरीपपूर्व मशागतींची कामे पूर्णत्वास आली असून, आता त्याला पेरणीचे वेध लागले आहेत. पाऊस येताच पेरणी उरकायची, या आशेत असलेल्या शेतकऱ्यांकडून बियाणे खरेदीची लगबग सुरू झाली आहे. जिल्ह्यात गत आठवडाभरात कपाशीच्या एक लाख पाकिटांची उचल शेतकऱ्याकंडून करण्यात आली आहे. यंदा जिल्ह्यात खरीप हंगामात ४ लाख ३३ हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात सर्वाधिक दोन लाख १५ हजार हेक्टरवर कापूस, तर एक लाख ३५ हजार हेक्टरवर सोयाबीनच्या पेरणीचे नियोजन आहे. प्रस्तावित नियोजनाप्रमाणे विविध पिकांचे ६४ हजार क्विंटल बियाणे जिल्ह्याला लागणार आहे. त्यासाठी कृषी विभागाकडून बियाणे तसेच खतांची उपलब्धता करून दिली असल्याचे सांगण्यात आले. आतापर्यंत जिल्ह्यातील कृषी केंद्रांमधून एक लाख…
महागाई नियंत्रित ठेवण्यासाठी; तसेच काळाबाजार आणि साठेबाजी रोखण्यासाठी केंद्र सरकारने तूर, उडीद डाळीच्या साठय़ावर मर्यादा घातली आहे. ही साठा मर्यादा ३१ ऑक्टोबपर्यंत लागू असणार आहे. या शिवाय तेलाचे दर प्रतिलिटर आठ ते बारा रुपयांनी कमी करण्याचा आदेशही केंद्र सरकारने कंपन्यांना दिला आहे. केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालयाने याबाबतचे आदेश काढले आहेत. साठा मर्यादाचे हे र्निबध घाऊक, किरकोळ विक्रेते, मोठे व्यापारी, डाळ मिल आणि डाळींच्या आयातदारांसाठी दोन जूनपासून ३१ ऑक्टोबपर्यंत लागू असणार आहे. देशभरात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती नियंत्रणात राहाव्यात. डाळींचे दर सर्वसामान्य ग्राहकांना परवडतील, असे ठेवण्यासाठी हे निर्बंध घालण्यात आल्याचेही सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. किरकोळ विक्रेत्यांसाठी…
मक्याच्या दरात सध्या घसरण होत आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर मक्याचे चांगले उत्पादन आल्याने तसेच ब्राझिल व अन्य दक्षिण अमेरिकन प्रदेशातून होणारी आवक, असे दुसरे कारण आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. सध्या दर कधी वाढणार याची शेतकरी वाट बघत आहेत. निर्यातक्षम मक्याला मुंबई पोर्टमध्ये दोन हजार रुपये क्विंटलपर्यंतचा दर मिळत आहे. गतवर्षी हाच दर २४०० ते २५०० रुपयांपर्यंतचा होता. महाराष्ट्रासोबतच उत्तर-प्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान, बिहार, कर्नाटकातही मक्याचे पीक मोठ्या क्षेत्रावर घेतले जात आहे. सेच औरंगाबाद ही मक्याची मोठी बाजारपेठ आहे. येथून माल मुंबईला निर्यात करण्यासह देशभरातील स्टार्च कंपन्या, कुक्कुट पालन कंपन्यांना पुरवठा केला जातो. यामुळे येथे व्यापारी येत असतात. एका स्टार्च कंपनीला…
