ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील पाऊस उघडीप देणार असल्याची माहिती हवामान खात्याने व्यक्त केली आहे. या दरम्यान मुंबईसह राज्यात पावसाच्या हलक्या सरी बसरण्याची शक्यता असून मुसळधार पाऊस होणार नाही, असंही हवामान खात्याने म्हटलं आहे. मान्सूनच्या पश्चिम पूर्व वाऱ्याचा पट्टा उत्तरेकडे सरकला आहे. दक्षिण छत्तीसगड वरील कमी दाबाची तीव्रता कमी झाले आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात राज्यात पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे.
मागील आठवड्यात राज्यात पावसाने हाहाकार माजवला होता. आज (दि.३१) रोजी देखील कोकण घाटमाथ्यावर तुरकळ ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तसंच मराठवाड्यात देखील विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
राज्यात सुरू असलेला पाऊस ओसरल्यानंतर राज्यात ढगाळ हवामानासह अधून-मधून हलक्या सरी कोसळत आहेत. काही ठिकाणी बऱ्याच दिवसांनंतर सूर्य दर्शन होत ऊन सावल्यांचा खेळ सुरू होता. आज (ता. ३१) कोकणातील रायगड, रत्नागिरीसह पुणे जिल्ह्यांचा घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा ‘येलो अलर्ट’ आहे. मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता असून, उर्वरित राज्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी ३० ते ४० प्रति किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा आणि विजांचा कडकडाट, ढगांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. पुणे आणि परिसरात वातावरण ढगाळ राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.