सध्या थंडी पडायला सुरुवात झाली आहे, असे असताना ऐन थंडीत हवामान खात्याकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. गेल्या महिन्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
13 आणि 14 नोंव्हेबरला मध्य महाराष्ट्र आणि कोकणच्या काही भागांत हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. यामुळे आता शेतकऱ्यांपुढे पुन्हा एकदा संकट उभे राहिले आहे.
दरम्यान, बंगालच्या उपसागरातील वायव्य भागापासून श्रीलंकेच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्ट्याची स्थिती तयार झाली आहे. याचबरोबर पुढच्या 24 तासांत कमी दाबाच्या पट्ट्याची क्षमता वाढण्याची शक्यता आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
उद्यापासून हा कमी दाबाचा पट्टा तमिळनाडू-पुद्दुचेरी किनारपट्टीवर धडकणार आहे. यामुळे आता पुन्हा नुकसान होणार का असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. राज्यात दिवसा ढगाळ वातावरण राहिल्यामुळे कमाल तापमानात वाढ होत आहे.
तसेच रात्रीच्या वेळी किमान तापमानात वाढ होत आहे. मात्र, 13 आणि 14 नोंव्हेबरला मध्य महाराष्ट्र आणि कोकणच्या काही भागांत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे याबाबत शेतकऱ्यांनी नियोजन करावे
या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, साताऱ्यासह पुण्यातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भ या भागांत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.