नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण कोथिंबीर चे बाजार भाव ऑगस्ट ते ऑक्टोबर 2022 काय रहाण्याची शक्यता आहे याचा एक अंदाज बांधणार आहोत. बाजार भावाचे अपडेट देताना आपण नारायणगाव मार्केट हे प्रमाण धरलेले आहे.कारण नारायणगाव मार्केट कोथिंबीर चा जुडा हा नाशिक मार्केट च्या तुलनेत थोडा छोटा असतो तर इतर लोकल मार्केट च्या तुलनेत मोठा असतो.आपण दराचा तुलनात्मक अभ्यास करताना लोकल मार्केट आणि होलसेल मार्केटचा फरक लक्षात घेतला तर समजायला थोडंसं सोपं जाईल.
2022 कोथिंबीर बाजार भावाचा आढावा घेतला तर जानेवारी ते 15 मार्च 2022 हा कालावधी मंदीचा होता. इथे साधारण गड्डी चे भाव 5/10 रुपये दरम्यान होते जे उत्पादन खर्चाच्या तुलनेत किफायतशीर नव्हते. 15 मार्च ते 10 मे या कालावधीत साधारण 18/22 रुपये अशा एका ठराविक पातळीवर टिकून राहिले . जे उत्पादन खर्चाच्या तुलनेत किफायतशीर ठरते. 10 मे ते 10 जुन भाव पातळी आणखी उंचावून ते 28 ते 32 रुपये दरम्यान पहायला मिळाले.दरवर्षी जुन जुलै महिन्यात कोथिंबीर चे भाव हे फार मोठ्या उंचीवर पहायला मिळतात मात्र 2022 अपवाद ठरला . तापमान मोठी वाढ असताना सुद्धा मार्केट त्या तुलनेत वाढले नाही. आणि त्याला जोड जुन महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. पाऊस कमी असल्यामुळे नुकसान नगण्यच राहिले.जुलै महिन्यात सततच्या पावसामुळे नुकसान आणि वापसा कंडीशन नसल्यामुळे लागवड चे प्रमाण जुलै महिन्यात कमीच दिसते.
पुढिल तीन महिन्याचा आढावा घेताना जेव्हा जुन जुलै महिन्यात मोठी तेजी असते तेव्हा ऑगस्ट महिना मंदीचाच जातो आणि 15 सप्टेंबर नंतर भाव वाढायला सुरुवात होते. मात्र 2022 उलटं होण्याची शक्यता आहे इथे ऑगस्ट महिन्यात कोथिंबीर बाजार भाव 20+ च्या पातळीवर टिकून रहाण्याची शक्यता आहे. काही दिवस 30+ चे भाव ऑगस्ट महिन्यात दिसण्याची शक्यता आहे. कदाचित 5 ऑगस्ट ते 25 सप्टेंबर हा कालावधी कोथिंबीर चे भाव हे 2022 चे सर्वात उंचावर चे दर दिसण्याची शक्यता आहे.तर आक्टोबर महिन्यात पण 20+ गड्डीचे दर टिकून रहाण्याचीच शक्यता जास्त आहे. जेव्हा आपण सर्वात टॉप च्या दराचा विचार करतो तो काही दिवस 40+ पण जाण्याची शक्यता आहे.
बाजार भावाचे असेच अपडेट मिळवण्यासाठी आपल्या Shivaji Awate शेती बाजार भाव विचार मंच या युट्यूब चॅनलला भेट देऊन सबस्क्राईब करा. 🙏
शिवाजी आवटे
28/7/2022