जय किसान शेतकरी मित्रांनो आज आपण काकडी या पिकाचे सप्टेंबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत काय भाव रहाण्याची शक्यता आहे या विषयावर चर्चा करणार आहोत.काकडी या पिकाचे बाजार भाव हे हॉटेल लाइन ची मागणी जशी असेल तसे चालतात.मागिल 15/20 वर्षाचा विचार करता जुन जुलै आणि डिसेंबर जानेवारी ह्या महिन्यात सातत्याने काकडी चे बाजार भाव हे चांगल्या पातळीवर टिकून असलेले दिसतात. आणि ह्या महिन्यात पर्यटक जास्त प्रमाणात बाहेर पडल्याचे दिसून येते.
काकडी हे पिकं टोमॅटो निघून गेल्यावर जे स्ट्रक्चर उभे असते त्या स्ट्रक्चर वर घेण्याचा बहुतांश शेतकऱ्यांचा कल असतो. टोमॅटो च्या स्ट्रक्चर वर काकडी लागवड केली तर उत्पादन खर्च कमी होतो.इथे 12/15 रुपये किलो दराने जरी काकडी गेली तरी चांगले पैसे मिळून जातात. एकरी 15/20 टनांपर्यंत सर्व सामान्य शेतकरी काकडी चे उत्पादन घेऊ शकतो.
मागील 4/5 वर्षाचा विचार केला तर गणपती ते दिवाळी या कालावधीत काकडी चे पिक मंदीत गेलेले दिसते . याचं महत्त्वाचं कारण म्हणजे उन्हाळी टोमॅटो निघून गेल्यावर त्या क्षेत्रात वाढतं असलेली काकडी लागवड.
2022 मात्र उन्हाळ्यात टोमॅटो लागवड चे प्रमाण फार कमी होते.आणि 2022 ला इतर भाजीपाला पिकांचे बाजार भाव तेजीत असल्यामुळे कुठल्याही एकाच पिकाची लागवड होऊन भाव पडतील अशी शक्यता सध्या तरी दिसत नाही. दरवर्षी सप्टेंबर आक्टोबर महिन्यात मंदीत चालणारी काकडी 2022 ला अपवाद ठरण्याची शक्यता आहे . इथे सप्टेंबर आक्टोबर या दोन्ही महिन्यात काकडी चे बाजार भाव 15 ते 25 रुपये किलो दरम्यान पहायला मिळू शकतात. 18/22 रुपये ची सरासरी बरेच दिवस काकडी चे भाव पहायला मिळण्याची शक्यता आहे . नोव्हेंबर महिन्यात काकडी चे भाव 12/18 रुपये दरम्यान टिकून रहाण्याची शक्यता आहे मात्र डिसेंबर 2022 पासून पुन्हा 20+ रुपये किलो काकडी चे भाव दिसण्याची शक्यता आहे .
बाजार भावाचे असेच अपडेट मिळवण्यासाठी आपल्या Shivaji Awate शेती बाजार भाव विचार मंच या युट्यूब चॅनलला भेट देऊन सबस्क्राईब करा धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏
शिवाजी आवटे