गावाकडे हायवे वाढलेत तसे अपघातही वाढलेत. साथींच्या आजारापेक्षा अपघात बळीची संख्या जास्त होतेय. कमावत्या तरूणाचा बळी जाणे हे त्या कुटुंबाचे आणि राष्ट्रीय संपत्तीचेही एका प्रकारे नुकसान असते अशी सामाजिक भावना जेष्ठ कृषी माल बाजारभाव अभ्यासक दीपक चव्हाण सर यांनी व्यक्त केली आहे
अपघात टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी? लातूरचे अमोल ढवण सांगतात, की आवश्यक तेवढाच प्रवास करावा, होईल तेवढा प्रवास टाळावा. ग्रुपने प्रवास करत असाल तर वाहनचालक कसा आहे, त्याची माहिती काढावी. त्याची झोप पुरेशी झाली आहे का हे तपासावे. मोटारसायकलवर हेल्मेट आवश्यक. ट्रक- ट्रॉलीला कंपलसरी रेडियम लावावे.
अमोल ढवण यांनी नुकतेच वडील गमावले. उजनी (औसा) येथे राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला होता. अॅम्ब्युलन्ससाठी पाऊण तास वेळ गेला. ऑक्सिजनसह प्राथमिक उपचाराची साधने नव्हती. हॉस्पिटलमध्ये पोचेपर्यंत उशीर झाला होता.
अमोल म्हणाले, की दोन-चार गावे मिळून एक तरी अॅम्ब्युलन्स हवी. आपल्यावर आली तशी वेळ दुसऱ्यांवर येऊ नये म्हणून अॅम्ब्युलन्स खरेदीचा संकल्प केलाय. स्वत:सह सामूहिक मदतीतून निधी उभारतोय. संकल्प जवळपास पूर्णत्वाकडे आलाय अशी माहिती अमोल ढवण यांनी दिली आहे.
credit: Deepak Chavan