Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

महाराष्ट्रात थंडीची चाहूल

November 5, 2024

Banana Cultivation : उन्नत तरीके से केले की खेती कैसे करें ?

April 16, 2024

Jowar Market : किसानों को ज्वार सें हुआ करोडो का नुकसान

April 16, 2024
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » शेती ही संस्कृती आहे , असे ऐकून ऐकून कान पिकले आहेत. शेती करणारा शेतकरी तिथेच मातीत गाडला जातो आहे .
ताज्या बातम्या

शेती ही संस्कृती आहे , असे ऐकून ऐकून कान पिकले आहेत. शेती करणारा शेतकरी तिथेच मातीत गाडला जातो आहे .

Neha SharmaBy Neha SharmaJuly 13, 2022Updated:July 13, 2022No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

एक शेतकरी*
============

रोज उत्पन्न वाढेल या आशेवर कोणी काय सांगेल ते प्रयोग करून अंगावर कर्ज वाढवून ठेवायचं काम शेतकऱ्यां कडून चालू आहे.

आज यश मिळेल , उद्या नफा होईल , हे केले तर पान रूंद होतात , ते केले तर पांढऱ्या मुळ्या सुटतात , अमुक फवारणी केली की वजन वाढते , अमुक खते घेतली की फुटवे चांगले निघतात. सगळे शेतकऱ्यांची फसवणूक करून पैसे कमावणारेच ….

रास्त भाव , हमी भाव , एम एस पी , स्वामीनाथन , रंगनाथन ही मागणी केली की योग्य दर मिळेल , तो आयोग लागू झाला पाहिजे , मग उत्पन्न दिडपट मिळेल. असे ऐकून ऐकून दर वर्षी अनुभव घेत देत फक्त कर्ज वाढत गेले भावा , तुमची पोस्ट वाचली आणि कमेंट करावं वाटल , खरच किती वर्षे हे प्रयोग करत जायचे ?
एक एक प्रयोग फेल गेला की , नशीबाला दोष देत एक एक वावर कधी विकले कळालच नाही.

कर्ज काढून पाण्यासाठी पाईपलाईन केली , घरच औत असल तर नांगरट चांगली होते.. ट्रॅक्टर घेतला , शेणखता साठी जनावर केली , शेतीला जोडधंदा असावा म्हणून कोंबड्या – शेळ्या कर्ज काढून घेतली …..
कुणी सांगीतलं शेततळ काढा , कुणी सांगीतलं ड्रिप करा , मिरची लावा , कापुस लावा , भुईमुंग लावा , धान लावा , सोयाबिन लावा , द्राक्षे लावा , केळी लावा , डाळींब लावा , पपई लावा , वांगी लावा ……
सगळे उद्योग थांबले फक्त वाढल ते कर्ज .!!!

सरकार कडून मिळाली सवलत फसवी , दररोज चारा घालून वाढवलेल्या बोकडावर जस कापण्यासाठी अंगावर मांस वाढण्याची वाट पाहात सांभाळले जाते , तसे शेतकऱ्यांना बघण्याची सगळ्यांची दृष्टी !

खतवाला , औषधवाला , बॅंकवाला , सावकार , आडत्या , साखर कारखानदार , दुध संघवाला , सगळे शेतकऱ्यांची कापायला येण्या पुरतीच मदत.
शेतकरी मोठा व्हावा ही कोणाचीच इच्छा नाही. बोकडाला जस मालकाची आपल्यावर मर्जी आहे वाटून उड्या मारत जगत असते , आणि शेवटी कळतं , यान आपल्याला का सांभाळले , तसे वेळ गेल्यावर कळत शेतकऱ्याला उत्पादन वाढवायला का सांगीतले ते !
वर्षातून तीन तीन पीके घेऊन , पाणी पाजून पाजून , खत घालून घालून शेती नापीक होते , तरी पण प्रयोग कांही थांबत नाहीत . ज्याला त्याला विचारल तर म्हणतंय घरची शेती आहे , पडीक पाडायची काय ? आणि पळून पळून प्रयत्न करून उत्पन्न डब्बल करायच्या नादात कर्ज डब्बल कधी होते कळतच नाही. खर आहे रोज होणाऱ्या शेतकरी आत्महत्या आमचं मन सुन्न करीत नाहीत . 😞 कुणीही बोलायला तयार नाही.

शेती ही संस्कृती आहे , असे ऐकून ऐकून कान पिकले आहेत. शेती करणारा शेतकरी तिथेच मातीत गाडला जातो आहे .

बापाच्या छातीवर हात ठेवून झोपणाऱ्या मुलांना विचारा एकदा की , तू का ठेवतो छातीवर हात ? तेंव्हा त्याचं उत्तर येते की , बाप जिवंत आहे का ? हे चेक करावे म्हणून ठेवावा लागतो हात !

भयाण आहे हे सर्व आमच्या शेतीची पार वाट लावून टाकली इथल्या राजकीय सत्तेने !

शेतीवर कविता करणारे छान जगतात , शेतीवर कादंबरी लिहिणारे खुशाल जगतात , शेतकरी आत्महत्या वर पुस्तक लिहिणारे सुद्धा मजेतच असतात . शेती कशी करावी हे सांगणारे तर अधिकच मजेत आहेत .

प्रत्यक्ष शेतीत राबणारा जीव मात्र कासाविस होतो आहे . त्याला त्याच्या प्रश्नांचे उत्तर ही शोधू दिले जात नाही ….
ही गोष्ट जर सत्य वाटले तर शेअर करा !

एक शेतकरी मित्र ……

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

Pm Surya Ghar Yojana : मोदी सरकार की नई योजना; एक करोड़ घरों को मिलेगी मुफ्त बिजली, ऐसे करें आवेदन।

March 30, 2024

Summer Management Of Dairy Animal : गर्मियों में ऐसे करे डेयरी पशुओं की देखभाल।

March 29, 2024

Agriculture Market : चुनाव की आपाधापी में किसान संकट में; सोयाबीन और चना सहित कृषि उपज की कीमतों में गिरावट।

March 28, 2024

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

महाराष्ट्रात थंडीची चाहूल

हवामान November 5, 2024

सध्या ऑक्टोबर हिटचा प्रभाव अजूनही जाणवत आहे. पण लवकरच महाराष्ट्रात थंडीचीही चाहूल लागू शकते. सध्या…

Banana Cultivation : उन्नत तरीके से केले की खेती कैसे करें ?

April 16, 2024

Jowar Market : किसानों को ज्वार सें हुआ करोडो का नुकसान

April 16, 2024

ROSE CULTIVATION : पॉलीहाउस में गुलाब लगाकर कमाएं लाखों रुपए।

April 12, 2024

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.