Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

महाराष्ट्रात थंडीची चाहूल

November 5, 2024

Banana Cultivation : उन्नत तरीके से केले की खेती कैसे करें ?

April 16, 2024

Jowar Market : किसानों को ज्वार सें हुआ करोडो का नुकसान

April 16, 2024
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » वांगी पिक मार्गदर्शन
ताज्या बातम्या

वांगी पिक मार्गदर्शन

Neha SharmaBy Neha SharmaJuly 8, 2022No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

नमस्कार शेतकरी बंधूनो, रिमझिम पाऊस त्यात ऊन अशा परिस्थितीत वांगी पिकांच्या वातावरणातील बदल लक्षात घेऊन वांगी पिकांचे संरक्षण करत असताना एकात्मिक रोग व किड व्यवस्थापनाबरोबरच एकात्मिक अन्नद्रव्य व पाणी व्यवस्थापन योग्य रित्या करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने वांगी पिकांतील 30 ते 50 दिवसाच्या कालावधीत

आळवणी घेत असताना त्यात 12:61:00 = 4 किलो + ग्रोथ मास्टर 500 मिली + कॅल्शियम नायट्रेट विथ बोरॉन = 500 ग्रॅम किंवा 13:40:13 = 4 किलो + मॅग्नेशियम सल्फेट 2 किलो + ऑर्गेनिक कार्बन 1 लिटर किंवा 00:52:34 = 4 किलो + न्युट्रीमिक्स 1 लिटर प्रति एकर याप्रमाणे कोणतेही एक आलटुन पलटून आळवणी घ्यावी. यामुळे वांगी पिकांची संतुलित वाढ होते, पाने हिरवीगार होतात, पानांची संख्या वाढते, मॅग्नेशियम वनस्पतींमध्ये फॉस्फरस वाहक म्हणून कार्य करते. पेशी विभाजन आणि प्रथिने निर्मितीसाठी हे आवश्यक आहे. त्यामूळे फुटव्यांची संख्या वाढते, भरघोस वाढ होऊन अन्नद्रव्यांची निर्मीती भरपूर प्रमाणात होते त्यामूळे भविष्यात फुलगळ होत नाही, फळधारणा भरपूर प्रमाणात होते, एकंदरीत वांगी फळांचा विकास चांगला होतो फळे चांगली पोसतात. उत्पन्नात वाढ होते.

एकात्मिक नियंत्रण :-
1) प्रति एकरी 5 ते 6 कामगंध सापळे वापरावेत तसेच यातील सेप्टा (ल्युसी ल्युर) दर दोन महिन्यांनी बदलावी.
2) वांगी लागवडीनंतर 45 दिवसांनी तुडतुडे, मावा व पांढरी माशी या किडी आढळल्यास डायमेथोएट 30 टक्के प्रवाही 10 मिली किंवा मिथिल डिमेटॉन 25 टक्के प्रवाही मिली किंवा ट्रायझोफॉस 10 मिली 10 लिटर पाण्यातून फवारावे.
3) वांगी लागवडीनंतर 20 दिवसांनी दर आठवड्याला किडलेले शेंडे व फळे आढळल्यास ती गोळा करून नष्ट करावीत किंवा खोल खड्ड्यात पुरून टाकावीत. या किडीसाठी सायपरमेथ्रीन (25 टक्के प्रवाही) 5 मिली किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 4 मिली 10 लिटर पाण्यातून फवारावे.
4) वांगी पिकावर कोळी किड आढळल्यास पाण्यात मिसळणारे गंधक 30 ग्रॅम किंवा डायकोफॉल 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून फवारावे.

फवारणी :-
वांग्यामधील बोकड्या/ पर्णगुच्छ याचा प्रसार तुडतुडे या किडीमुळे होतो. यासाठी तुडतुडे या किडींचे योग्य प्रकारे नियंत्रण करावे.
1) निमकरंज = 1.5 मिली + इमामेक्टीन बेंझाएट = 0.4 मिली + रिडोमिल गोल्ड = 2 ग्रॅम + प्राईम झाईम = 2 मिली 2) ड़ायमेथोएट 30% = 1 मिली किंवा इमिडाक्लोप्रीड 17.8% = 0.4 ग्रॅम + एम 45 = 2 ग्रॅम + फ्लॉवरबूस्ट = 2.5 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये एकत्र घेऊन सायंकाळी 5 ते 6 च्या नंतर फवारणी घ्यावी. वरिल फवारणी सर्व रसशोषक किडींच्या प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रणासाठी उपयुक्त आहे. तसेच पानांवर येणारी हानिकारक बुरशीचा नायनाट होतो. करपा, मिलीड्यू यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रणासाठी व रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी करण्यासाठी मदत होते. पानांची रुंदी वाढून कार्यक्षमता वाढते. त्यामूळे वांगी पिकांची निरोगी पोषक वाढ होते.

Mr.SATISH BHOSALE
Founder & CEO,
KRUSHIWALA FARMER’S GROUP
(General Manager)
DevAmrut Agrotech Pvt Ltd.
Mob No.: 09762064141

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

Pm Surya Ghar Yojana : मोदी सरकार की नई योजना; एक करोड़ घरों को मिलेगी मुफ्त बिजली, ऐसे करें आवेदन।

March 30, 2024

Summer Management Of Dairy Animal : गर्मियों में ऐसे करे डेयरी पशुओं की देखभाल।

March 29, 2024

Agriculture Market : चुनाव की आपाधापी में किसान संकट में; सोयाबीन और चना सहित कृषि उपज की कीमतों में गिरावट।

March 28, 2024

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

महाराष्ट्रात थंडीची चाहूल

हवामान November 5, 2024

सध्या ऑक्टोबर हिटचा प्रभाव अजूनही जाणवत आहे. पण लवकरच महाराष्ट्रात थंडीचीही चाहूल लागू शकते. सध्या…

Banana Cultivation : उन्नत तरीके से केले की खेती कैसे करें ?

April 16, 2024

Jowar Market : किसानों को ज्वार सें हुआ करोडो का नुकसान

April 16, 2024

ROSE CULTIVATION : पॉलीहाउस में गुलाब लगाकर कमाएं लाखों रुपए।

April 12, 2024

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.