नमस्कार द्राक्षबागायतदार बंधुनो,
द्राक्ष बागेत फळछाटणी पुर्व पानगळ करण्याचा काळ खुप महत्त्वाचा असतो. वेलिवरील नैसर्गिक पानगळ अवस्था लक्षात घेऊन पानगळ कधी करावी हे ठरविता येते. पानगळ ही साधारणतः फळ छाटणीच्या १५ दिवस अगोदर करावी. हा कालावधी बागेतील पानगळ कमी/अधिक अवस्था पाहून ठरवावा. बागेमधील नैसर्गिकरीत्या पानगळ ही साधारणतः ७० ते ८०% झाली असल्यास अशा बागेची छाटणी लवकर करुन घ्यावी. बागेमध्ये नैसर्गिक रित्या पानगळ झाली नसल्यास इथेफॉनची फवारणी घेऊन पानगळ करावी.
द्राक्ष बागेतील फळ छाटणी करण्यापुर्वी द्राक्ष बागेतील ७० ते ८०% टक्के पानगळ होने खुप गरजेचे असते. नैसर्गिकरीत्या पानगळ होन्यासाठी बागेला पाण्याचा ताण देणे आवश्यक आहे.
👉 द्राक्ष बागेत पानगळ करण्याकरीता पाण्याचा ताण देणे:-
द्राक्ष बागेत खरड छाटणीनंतर काडीची परिपक्वता होण्यासाठी साधारणतः १४० ते १५० दिवसांचा काळ लागतो. म्हणून आपण फळछाटणी ही काडीची परिपक्वता झाल्यानंतर करतो. काडी परिपक्व झाल्यानंतर फळछाटणीच्या १५ ते १६ दिवसांपूर्वी पानगळ करावी लागते. त्यासाठी द्राक्ष बागेत नैसर्गिकरीत्या पानगळ होण्यासाठी पाण्याचा ताण द्यावा लागतो. पाण्याचा ताण दिल्यामूळे बागेत वेलीची नविन वाढ होत नाही व झाडावर काही प्रमाणात हिरवी राहीलेली काडी पक्व होते व अन्नसाठा वरिल नविन वाढीत नष्ट न होता तो परिपक्व काढीतच संग्रह होतो व हाच काढीतील अन्नद्रव्य साठा उद्याच्या फळछाटणीनंतर तेजदार घड निर्मीती होण्यात मदतगार होतो.
👉 द्राक्ष बागेत फळछाटणीपूर्व पानगळ करणे :-
वेलिवरील नैसर्गिक पानगळ अवस्था लक्षात घेऊन पानगळ कधी करावी हे ठरविता येते. पानगळ ही साधारणतः फळ छाटणीच्या १५ दिवस अगोदर करावी. हा कालावधी बागेतील पानगळ कमी/अधिक अवस्था पाहून ठरवावा. बागेमधिल नैसर्गिक पानगळ ही साधारणतः ७० ते ८०% झाली असल्यास अशा बागेची छाटणी लवकर करुन घ्यावी. बागेमध्ये नैसर्गिक रित्या पानगळ झाली नसल्यास इथेफॉनची फवारणी घेऊन पानगळ करावी.
👉 इथ्रेल (इथेफॉन) हे संजीवक ग्रोथ इनहिबीटर्स (इथीलीन) या गटात मोडते. याचे रासायनिक नाव टू-क्लोरोइथाईल फॉस्फोनिक अॅसिड असे आहे. द्राक्ष बागेतील ऑक्टोबर छाटणीपूर्वी सुमारे दोन आठवडे १००० ते २५०० पीपीएम एवढया तीव्रतेच्या इथ्रेलची फवारणी केल्यास वेलीची पानगळ होण्यास मदत होते. यामुळे नेमक्या डोळयांवर छाटणी करणे सुलभ जाते. तसेच छाटणीनंतर काडीवरील डोळे लवकर फुटण्यास मदत होते.
👉 द्रावण कसे तयार करावे :-
इथ्रेल हे संजीवक पाण्यात पूर्णपणे मिसळते याची तीव्रता ४०% असते. वेगवगळ्या पीपीएमचे इथ्रेलचे द्रावण पुढील प्रमाणे तयार करावे.
१००० पीपीएम = २५० मिली इथ्रेल + १०० लिटर पाणी
२००० पीपीएम = ५०० मिली इथ्रेल + १०० लिटर पाणी
२५०० पीपीएम = ६२५ मिली इथ्रेल + १०० लिटर पाणी
इथ्रेल (इथेफ़ॉन 39%) २ ते ३ मिली प्रति लीटर पाणी व ४ ते ५ ग्रॅम ००:५२:३४ (विद्राव्य खत) याप्रमाणे फवारणी द्यावी. एकरी ४०० लिटर द्रावण करून फवारणी केली पाहिजे. पानांची खूपच गर्दी असल्यास ४०० लिटर ऐवजी ४५० लिटर द्रावण करून फवारणी केली पाहिजे. इथेफ़ॉनचा परिणाम चांगल्या प्रकारे जाणवण्यासाठी द्राक्ष बागेस पाण्याचा ताण बसणे आवश्यक आहे. इथ्रेल फवारणी करताना जमिनीत पुरेसा वाफसा असणे आवश्यक आहे.
👉 पानांच्या स्थितीनुसार इथ्रेलचे प्रमाण / डोस :-
द्राक्षांच्या छाटणीच्या १५ ते १६ दिवस अगोदर इथ्रेलचा वापर करावा. जर झाडावर भरपूर प्रमाणात चांगली पाने असतील तर प्रतिलिटर पाण्यास ३ मिली याप्रमाणे एकरी ४०० लिटर द्रावण करून फवारणी केली पाहिजे.
पाने २५ % खराब झालेली असल्यास २.७५ मिली प्रतिलिटर व ५० % खराब झालेली असल्यास २.५० मिली प्रतिलिटर याप्रमाणे एकरी ४०० लिटर द्रावण करून फवारणी केली पाहिजे. पानांची खूपच गर्दी असल्यास ४०० लिटर ऐवजी ४५० लिटर द्रावण करून फवारणी केली पाहिजे.
👉 इथ्रेल फवारणीचे चांगले परिणाम मिळविण्यासाठी फवारणीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याचा पीएच (सामू) ५ ते ६ च्या दरम्यान असावा. इथ्रेल मुळात अॅसिडीक असते ते पाण्यात टाकल्यानंतर त्या पाण्याचा पीएच (सामू) दोन ते तीनच्या दरम्यान येतो, तो पीएच (सामू) पाच ते सहा च्या दरम्यान असावा लागतो त्यासाठी या द्रावणात पोटशियम बायकर्बोनेट मिसळून पीएच (सामू) संतुलित करावा.
टीप – इथ्रेल सोबत पोटशियम बायकर्बोनेट मिसळून फवारणी करावी.
👉 इथ्रेल फवारणी करताना पावसाचा संबंध :-
इथ्रेल फवारणी करताना निदान दिड ते दोन तास पाऊस पडायला नको, जेणेकरून पाने पूर्णपणे सुकून गेली पाहिजेत व ते शोषलं गेलं पाहिजे, नंतर पाऊस आला तरीही त्याचा काही परिणाम होत नाही.
परंतु, इथ्रेल फवारणी केल्यानंतर लगेचच पाऊस आला तर मात्र पुन्हा ५०% डोस घेऊन रिपीट करावा लागेल.
👉 इथ्रेल फायदे :-
पाने हळू हळू पिवळे पडत पानगळ होते, पाने एकदम गळून न जाता हळू हळू गळतील आणि स्टोरेज चांगलं होईल. पानांतील अन्नघटक, कार्बोहायड्रेट, स्टोरेज, खताचे इतर अन्नघटक काडीत साठले जातात. नंतर छाटणीकरून पेस्ट केल्यानंतर जेव्हा डोळे फुटून बाहेर येतात तेव्हा हे सर्व घटक डोळ्यांना पूरक ठरतात. घड जिरण्याचे प्रमाण कमी होते. फ्लॉवरिंग एकसमान येते….!!!✍
टीप:- आपल्या द्राक्ष बागेतील माती, पाणी, पान, देठ आणि काडी परिक्षण अहवाल नोंदी लेखनापासुन खत, कीटकनाशक, बुरशीनाशक आणि सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या दररोजच्या नोंदी ठेवण्यासाठी तसेच द्राक्ष बागेतील अन्नद्रव्य व रोग-कीड व्यवस्थापन माहितीसाठी व कमीत कमी खर्चात एक्सपोर्ट दर्जाच्या द्राक्ष उत्पादनासाठी फ्रूटवाला बागायतदारच्या द्राक्ष नोंदवहीचा वापरा आवश्य करावा.
साभार :सतीश भोसले
🦚🌹🦚 !! अन्नदाता सुखी भव: !!🦚🌹🦚
काळजी घ्या…आपला जिव्हाळा कायम राहो
🙏विचार बदला! जीवन बदलेल!!🙏
Mr.SATISH BHOSALE
Founder & CEO,
KRUSHIWALA FARMER’S GROUP
General Manager,
DevAmrut Agrotech Private Limited
Mob No.: 09762064141
FB Link: https://www.facebook.com/sp.bhosale2151
🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇