Indian Farmer Entrepreneurs च्या माध्यमातून गेल्या चार वर्षांमध्ये राज्यातील अनेक शेतकऱ्यांना भेटता आले. महाराष्ट्रातील अनेक चांगले चांगले मॉडेलस युट्युब व फेसबुक च्या माध्यमातुन लोकांपर्यंत पोचवता आले याचे समाधान वाटते.
आपण नेहमी म्हणतो की शेतकऱ्यांनी आपला माल/आपले उत्पादन विकायला शिकले पाहिजे. खरंतर यासर्व गोष्टी बोलणे सोपे असतात परंतु यामागच्या अडचणी त्यालाच माहीत असतात. आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांना किंवा शेतकरी उत्पादक कंपनी यांना त्यांचे प्रॉडक्ट् किंवा उत्पादन विकण्यासाठी काय करू शकतो याचा विचार गेल्या दोन- अडीच वर्षांपासून चालू होता.
आपल्याकडे प्लॅटफॉर्म तयार आहे याच प्लॅटफॉर्मचा फायदा अनेक Farmer Entrepreneurs ला आपण करून देऊ शकतो आणि याच माध्यमातून ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म तयार करण्याचा विचार आला. (Indian Farmer Entrepreneurs Store )
IFE Store हे आपले हक्काचे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आपल्यासमोर आम्ही घेऊन येत आहे.
IFE Store वर आपण फक्त फार्मर किंवा FPO यांनी तयार केलेले फूड प्रॉडक्ट् वा फार्म प्रॉडक्ट्स ठेवत आहोत. सध्या देशभरातील मार्केट लक्षात ठेवून अति ग्रामीण भागात सुद्धा IFE Store चे प्रॉडक्ट् पोहचवण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे.
AgroZee Organics चे मिलेट्स पासून तयार केलेले नूडल्स,पोहे,रवा, शेवाई तसेच लाडू हे सर्व प्रकारचे प्रॉडक्ट्स, Madhupushp Honey चे सर्व प्रकारचे मध तसेच मधुगंध शेतकरी महिला बचत गटाचा कोयनेच्या जंगलातील फॉरेस्ट हनी, Agrivision Farmer Producer Company चे गुलकंद,गुलाब सिरप तसेच बेदाणे, OxyGoat फार्मचा शुद्ध गूळ,गांडूळ खत तसेच Kalifornia30 Farms चे लेंडी खत, Sumbran Goat Farm चे मटण- चिकन लोणचे, Bamboo India चे बांबू ब्रश व अन्य उत्पादने, Krishved Farm चे साहिवाल गायींचे तूप, सचिन गोरे या सेंद्रिय शेतकऱ्याची हळद पावडर,सेंद्रिय गूळ विविध वाणांचे गहू,तसेच खिल्लार गायींचे तूप असे एकूण 20 कॅटेगरीज मधील 56 प्रॉडक्ट्स सध्या आपण वेबसाइटवर लिस्ट केली आहेत.
आपण ही सर्व प्रॉडक्ट्स ग्राहकांना घरपोहोच करत आहोत.IFE Store भविष्यात जगभरातील मार्केट डोळयासमोर ठेवून वाटचाल करणार आहे. महाराष्ट्रातील तसेच देशभरातील शेतकऱ्यांचे फूड प्रॉडक्ट्स वेबसाईटवर लिस्ट करून त्यांना जगभर पोहचवण्याच काम आम्हाला करायच आहे आणि करणार आहोत.
Indian Farmer Entrepreneurs च्या पुढे जाऊन IFE Store हे आपले हक्काचे Marketplace आपल्या समोर घेऊन आलो आहे.
अधिक माहितीसाठी IFE Store च्या फेसबुक पेज ला सुद्धा तुम्ही जॉइन होऊ शकता.
वेबसाईट लिंक-
IFE Store- https://ifestore.com/

