आज रोजी कांद्याला मिळणारा अत्यल्प भाव हा सर्वच कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या घरातील आर्थिक चक्र फिरण्यास असमर्थ झाला आहे ह्या परिस्थितीतुन शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मिळून आर्थिक मदत करणे गरजेचे आहे. आणि त्यात नाफेडणेपण हातभार लावावा. सर्वच लोकप्रतिनिधींनी आता राजकारण बाजूला ठेऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे रहावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रमोद पानसरे यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना यांनी आधीच कांद्याला 5 रु प्रतिकिलो अनुदान तात्काळ मिळावे ही प्रमुख मागणी मुख्यमंत्र्यापासून ते पंतप्रधान यांच्यापर्यंत केलेली आहे. आणि ह्यात फक्त उत्पादन खर्चच निघणार आहे हे सर्वांनी समजून घ्यावे.आता वेळ आहे ती सर्व लोकप्रतिनिधींनि एका सुरात मागणी लावून धरण्याची. अन्यथा काळ खूप वाईट आहे. शेतकऱ्यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलू नाही.
राज्यकर्ते असेच मूग गिळून बसले आणि ही वेळ अशीच निघून गेली तर याचे परिणाम सर्वांना भोगावे लागतील.
कृपया कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखे पाऊल उचलू नये ही विनंती.आम्ही आहोत सदैव आपल्या सोबत आहोत असा दिलासा त्यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

