उत्तम शेती मध्यम व्यापार कनिष्ठ नोकरी या म्हणी लहानपणापासून वाडवडिलांकडून ऐकत आलो ,आणि ” गरीब म्हणून जन्माला आलो असेल पण गरीब म्हणून मरणार नाही “हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शिक्षण अर्ध्यावर सोडून लवकरच स्व कर्तुत्वाचे दिवसाढवळ्या स्वप्न पाहणारा,मी किंवा माझ्यासारखे अनेक तरुण वर्ग आज कसे चरख्या खाली भरडले जात आहेत, आणि त्यांच्या वेदना ,विवरण आणि आर्त किंकाळ्या पण कोणी ऐकायला तयार नाही येत ,
किंबहुना ऐकू येत असेल तरी ना ऐकण्याचं सोंग करता येत , टोमॅटो पाचशे रुपये कॅरेट झाल्यावर, मेथी दोन हजार रुपये विकल्यावर, कोथंबीर चार हजार झाल्यावर ,भेंडी चाळीस रुपये झाल्यावर, शिमला पाचशे रुपये झाल्यावर जी मीडिया रात्रंदिवस झोपत नाहीत, त्याच त्याच न्युज चायनल वर दाखवून सातवा वेतन घेणाऱ्या, ज्या कंपनी मालकांचे कोटी रुपयांची टर्नओहर असतात त्यांचे किंबहुना सर्व देशवासीयांच,ज्यांची पगार सहा अंकी आहेत त्यांचे मासिक बजेट कोलमडत आहेत असं दाखवतात ती मीडिया पण आज सर्व शेतीमाल हा कवडीमोल भावाने विकत असताना क्वारनटाईन झालेल्या आहेत.
जगाचा पोशिंदा…. जगाचा पोशिंदा हे पात्र निभावत असताना आम्ही जगायचं कधी विसरूनच गेलो हे कळलेच नाही, आमचं पण एक कुटुंब आहेत हे पण विसरून गेलो ,दिवसा लाईट नाही म्हणून रात्री बारा एकला बायको पोरांसोबत पिकांना पाणी देता देता, आमच्या शरीरातील रक्त कधी आटुन गेलं हे कळलच नाहीत, पारंपारिक शेतीमध्ये उत्पन्न कमी येतं हे जेव्हा, पाहत होतो तेव्हा वाटत होतं शेतकरी परंपरागत जगतोय रुढी परंपरेत ला धरून चालतो आहे म्हणून तो कुठेतरी चुकत आहेत,मग आमची नवीन जनरेशन म्हणून आम्ही कुठेतरी बदल करावा ,हायटेक शेतीची कास धरावा ,पारंपरिक शेतीला फाटा द्यावा, म्हणून आधुनिक शेतीकडे वळलो, रात्र रात्र दिवस रात्र अभ्यास केला, शेतीतील बारकावे जाणून घेतले, औषध कंपन्यांचे मॉलिक्यूल, त्यांची कार्य करण्याची पद्धत ,जमिनीचा सेंद्रिय कर्ब ,पाण्याचा पीएच, टीडीएस ,वातावरण ,जमिनीत असणाऱ्या नैसर्गिक गोष्टी ,बाहेरून कराव्या लागणाऱ्या कृत्रिम गोष्टी, या सगळ्याचा दिवस-रात्र अभ्यास केला. तोही इतका की तेवढा अभ्यास मन लावून केला असता तर एखादी एमपीएससी, यूपीएससी तर नक्कीच पास झालो असतो. तिथे तरी हातात एखादी डिग्री असते. कोणाचातरी नोकर करून म्हणून का होईना पण चांगले जीवन जगता आलं असतं इथे शेतीच शिक्षण असून उपयोग पण नाहीत
त्या शिक्षणाच्या जोरावर काढलेल्या पिकाला भाव नाही , जगण्याची इच्छा असतानी जगता येत नाही धड मारता येत नाहीत अशी परिस्थिती आज शेतकरी बांधवांची झालित,अमच्या सारख्या नव्या तरुनाइने शेतीचे नवे मॉडेल उभे केलेत ,राहत्या घराला चांगलं छप्पर नाहीत आम्ही शेतीला शेडनेट केले ,अंथरायला झोपायला पक्की गादी नाहीत आम्ही शेतीला मल्चिंग टाकले ,घरात पामतेल खाणारे आम्ही पिकाला शेंगदाणा ढ़ेप वापरले ,किलोभर गोडतेल अणताना घरात चार वेळेस विचार करणारे आम्ही ,दोनशे रुपये पर किलोचे दहा दहा किलो खत एकावेळेस पिकाला दिले, घरात अर्ध्या उपाशी राहून मजुरांना मजुरी दिली मुलाने दोन दोन रुपये करून जमवून ठेवलेले पन्नास रुपये जेव्हा त्याच्या खाऊसाठी आमच्याकडे दिले, तर औषध दुकानदाराला औषधासाठी पन्नास रुपये कमी पडले तर आम्ही पोराच्या खाऊचे पैसे त्याला दिले, मुलाला खाऊ नाही आणला, पण पिक जगावी म्हणून त्याच्यासाठी औषध आणले ते पण मुलाच्या खाऊच्या पैशातून ही आमची चूक का ?
वीस हजार पगार कमावणार्या शहरवासीयांची लाईफस्टाईल आणि बापजाद्यांनी दिलेल्या पंधरा एकर जमिनीचे आम्ही मालक असणारे आमची लाइफस्टाइल यांच्यामधला फरक पाहता तो आमच्या पेक्षा कितीतरी पटीने सुखी ,आम्ही पिकवलेल्या मालाचा व्यापार करून व्यापारी दर वर्षी नवीन गाडी नवीन बगली नवीन प्लॉट घेतोय आणि आम्ही दरवर्षी हे वर्ष चागले येईल अशी अपेक्षा करतोय .असा काय गुन्हा केला आम्ही शेतकऱ्यांनी की आम्ही प्रत्येक दिवस तिळतिळ मारतोय.
आयुष्याच्या एका क्षणावर आयुष्याच्या एका वळणावर तत्ववेत्ते भेटून गेले सांगून गेलेत नवीन शेती करा ,पिक बदल करा, म्हणून शिमला लावली, ति पण पुर्ण अभ्यास करून , दर दिवसाला दोन गाड़ी मार्केटला नेऊन अठवडयाचा किराणा आणता येईल , एवढे पन शिल्लक उराणा, आज दरवज 200 कैरेट🍅 मार्केटला आहे, पन नफा सोडा मजूरी पन मिलेना,
शेवटी आज उत्तम शेती कधी कनिष्ट होऊन बसली कळलीच नाही,
शेतकरी अत्महत्या झाल्यावर 1 लाख देण्यापेक्षा, आज त्याच्या मालाला योग्य भाव द्यावा अशी अपेक्षा करून थाबतो , कारण मला हे पन माहित आहे की कितीही अतरमनातून सगीतल किवा लिहल तरी शेतकयाची व्यथा कोणाला समजनार नाही , कळनार नाही,,शेवटी पिकाला थोड़ा भाव मिळाला की दररोज 1000 रुपये एन्जॉय म्हणून उडवनारे बोबलना
लेखक हे एक शेतकरी पुत्र आहेत

