नाशिकच्या शेतकऱ्यांसमोर आता नवीन संकट उभे राहिले आहे. आधीच अस्मानी संकटाने शेतकरी मेटाकुटीला आलेल्या असल्याने पुन्हा शेतकरी भीतीच्या सावटाखाली आलेला आहे. मुसळधार पावसाने शेतकऱ्याच्या शेतमालचे नुकसान झाले होते. त्यात कसाबसा वाचविलेला शेतमाल दोन पैसे मिळवून देणारा ठरत असल्याने त्यावरच चोरडे डल्ला मारत आहे. त्या विशेष म्हणजे टोमॅटोला बाजारात चांगला भाव मिळत असल्याचे पाहून भुरटे चोर रात्रीच्या वेळी टोमॅटो चोरी करत आहे. नाशिकच्या परिसरात टोमॅटो काढणी सुरू आहे. त्यात शेतात काढणीला आलेल्या टोमॅटोची चोरी होत असल्याची घटना मखमलाबाद शिवारात घडली आहे. वारंवार अशा घटना घडत असल्याने शेतकऱ्यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अनेकदा याबाबत तक्रार देऊनही चोर हाती लागत नसल्याने शेतकरी वर्गात तीव्र नाराजी पसरली आहे.
अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यात शेतकऱ्यांनी मेहनत घेऊन काही पिकांना या विपरित परिस्थितीही वाचवून पीक वाचवली आहे.
त्यातमध्ये टोमॅटो या शेतपिकाला सध्या चांगला बाजारभाव मिळत आहे. मार्केटमध्ये ७०० ते ८०० रुपयांना प्रतिजाळी म्हणजेच कॅरेटला विकली जातेय.
नाशिकच्या मखमालाबाद परिसरासह दिंडोरी, सिन्नर आणि पिंपळगाव परिसरात मोठ्या टोमॅटो पिकाचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे या परिसरात चोरांनी लक्ष केले आहे.
टोमॅटो पीक सध्या काढणीला आले आहे. त्यात दिवसभर शेतकरी आणि शेतमंजूर हे टोमॅटो काढतात, आणि शेतातच टोमॅटोचे कॅरेट भरून ठेवतात, आणि पहाटे मालवाहतूक वाहनाने बाजार नेतात.
अशी पद्धत ही सर्वत्र असते, यंदाच्या वर्षी शेतीमालाचे नुकसान झाल्याने टोमॅटोला चांगला भाव मिळत आहे, आणि हीच संधी शोधून भुरटे चोर टोमॅटोची चोरी करत आहे.
या चोरीच्या घटनेमुळे शेतकऱ्यांना हजारो रुपयांचा फटका बसंत असून या चोरीबाबत ज्ञानेश्वर पिंगळे, शंकर पिंगळे यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
मखमलाबाद शिवारात टोमॅटो चोरीच्या घटना थांबलेल्या नाहीत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त करत आहे, याबाबत पोलिसांनी तातडीने या भुरट्या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरत आहे.