राज्य कांदा संघटनेचा फुकटच्या भावाने नाफेडला कांदा देण्यास पुर्ण विरोध राहील असे विधान महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केले आहे.
नाफेडमार्फत कांदा खरेदीचे टेंडर मिळालेल्या फेडरेशनच्या माध्यमातून फार्मर प्रोड्युसर कंपन्यांनी थेट शेतकऱ्यांचा कांद्याला द्यायचा आजचा प्रती क्विंटलचा भाव पुढीलप्रमाणे , नाशिक व धुळे- 121 रू , अहमदनगर व बीड- 1051 रू
उस्मानाबाद- 1008 रु ,औरंगाबाद- 991 रू पुणे- 964 रु वरील भाव हा उत्पादन खर्चापेक्षाही कमी असल्याने
महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा नाफेडच्या या भावात कांदा खरेदीला पुर्णपणे विरोध असून पुढील 2 ते 3 दिवसांत नाफेडचे व्यवस्थापक शैलेंद्र कुमार यांना जाब विचारला जाणार आहे.
नाफेडकडून शेतकऱ्यांचा कांदा संपूर्ण महाराष्ट्रात त्या त्या दिवशी वेगवेगळ्या दरात खरेदी न करता एकच भाव आणि तोही जास्तीत जास्त कसा मिळेल यासाठी सर्व कांदा उत्पादकांनी संघटनेला साथ द्यावी अशी भारत दिघोळे यांनी विनंत केली आहे.

