सध्या द्राक्ष बाजारपेठ वाढत असून बाजारात विक्री वाढत आहे. यावेळी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागला. यामुळे अनेक शेतकरी अडचणीत सापडले. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे
असे असताना आता बाजारात येणाऱ्या द्राक्षाला चांगला दर मिळत आहे. यामुळे शेतकरी समाधानी आहे. यामुळे मराठवाड्यात (Marathwada) सध्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
कधी नव्हे तो एवढा विक्रमी दर सध्या द्राक्षाच्या बागांना (Grape Orchard) मिळत आहे. त्यात चांगल्या दर्जामुळे काळ्या द्राक्षाला (Black Grape) 121 ते 130 रुपये प्रति किलो तर साधारण द्राक्षाला 70 ते 80 रुपये भाव मिळत आहे.
सध्या नाशिकमधील द्राक्षाला बाजारात यायला आणखी काही दिवस शिल्लक आहेत. अशात मराठवाड्यातील द्राक्ष मात्र बाजारात येण्यासाठी तयार झाली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी मराठवाड्याच्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांकडे खरेदी सुरू केली आहे.
यामध्ये औरंगाबाद जालना जिल्ह्यात द्राक्ष बागांकडे व्यापारी जात असून बागेतच व्यवहार करत आहेत. येथील काळ्या द्राक्षांना 121 रुपये प्रति किलोचा दर मिळत आहे. तसेच इतर द्राक्षांना 50 ते 70 रुपये प्रति किलोपर्यंत दर मिळत आहे.