पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डात रविवारी (दि. 1) पुणे विभागासह राज्य तसेच परराज्यातून 100 ट्रकमधून शेतमालाची आवक झाली. गत आठवड्याच्या तुलनेत आवकेत दहा ट्रकने वाढ झाली. मागणीच्या तुलनेत आवक कमी पडल्याने हिरवी मिरची, ढोबळी मिरची, पावटा व तोतापुरी कैरीच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली. उर्वरित सर्व फळभाज्यांचे भाव स्थिर राहिले.
परराज्यांतून आलेल्या शेतमालामध्ये बंगळूर येथून 2 टेम्पो आले. गुजरात, आंध्र प्रदेश व कर्नाटक येथून सुमारे 10 ते 12 टेम्पो हिरवी मिरची, आंध्र प्रदेश व तामिळनाडू येथून 3 ते 4 टेम्पो शेवगा, गुजरात येथून 2 टेम्पो भुईमूग शेंग, कर्नाटक येथून 3 ते 4 टेम्पो घेवडा, पावटा 3 ते 4 टेम्पो, घेवडा 3 ते 4 टेम्पो, 150 क्रेट्स तोतापुरी कैरी, कर्नाटक व गुजरात येथून 3 ते 4 टेम्पो कोबी, बंगळूर येथून 2 टेम्पो आले, राजस्थान येथून 9 ते 10 ट्रक गाजर, मध्य प्रदेश व पंजाब येथून 25 ते 26 ट्रक वाटाणा तर मध्य प्रदेशातून लसणाची 7 ते 8 ट्रक इतकी आवक झाली.
स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे 1100 ते 1200 पोती, टोमॅटो 9 ते 10 हजार क्रेट्स, काकडी 7 ते 8 टेम्पो, फ्लॉवर 8 ते 10 टेम्पो, कोबी 4 ते 5 टेम्पो, ढोबळी मिरची 7 ते 8 टेम्पो, गवार 6 ते 7 टेम्पो, भेंडी 6 ते 7 टेम्पो, तांबडा भोपळा 10 ते 12 टेम्पो, कांदा 100 ट्रक यांसह आग्रा, इंदूर व स्थानिक भागातून बटाट्याची 50 ट्रक इतकी आवक झाली. आवक घटल्याने मेथी, कांदापात, करडई, पुदिना, चवळई महाग रविवारी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात पुणे विभागातून कोथिंबिरीच्या 1 लाख 25 हजार व मेथीच्या 1 लाख जुड्यांची आवक झाली.
गेल्या आठवड्याच्या तुलनेत कोथिंबिरीची आवक स्थिर राहिली, तर मेथी आवक 20 हजार जुड्यांनी वाढली. मागणीच्या तुलनेत आवक घटल्याने मेथी, कांदापात, करडई, पुदिना व चवळईच्या भावात गड्डीमागे 5 रुपयांनी वाढ झाली. तर, मागणीअभावी मुळ्याच्या भावात गड्डीमागे 5 रुपयांनी घसरण झाली. उर्वरित सर्व पालेभाज्यांची आवक-जावक कायम असल्याने भाव टिकून होते. रविवारी घाऊक बाजारात पालेभाज्यांच्या प्रतिजुडीचे भाव 2 ते 15 रुपय, तर किरकोळ बाजारात 10 ते 20 रुपये इतके राहिले.