आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरात (चढ उतार सुरु आहेत. मात्र सरासरी दरपातळी मागील तीन आठवड्यांपासून कायम आहे. देशातील बाजारात मात्र कापसाच्या दरात घट झालेली पाहायला मिळत आहे.
आजही काही बाजारांमध्ये कापसाच्या भावात नरमाई दिसली. मात्र कापूस दर सुधारण्यास पोषक स्थिती असल्याने दरवाढ होऊ शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
देशातील उद्योग सतत आपला कापूस भाव जास्त असल्याची ओरड करतात. मात्र वास्तवात देशातील कापूस भाव आता नरमले आहेत. त्यामुळे देशातून कापूस निर्यातही वाढली. दोन आठवड्यांपासून कापसाचे भाव खालच्या पातळीवर आहेत.
कापसाला सरासरी ८ हजार ते ८ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे. तर रुईचे भावही प्रतिक्विंटल १७ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान आहेत. या दरात रुईला चांगला उठाव मिळत आहे.

