१ किलो राजगिरा २० किलो वाळु किंवा घनजिवामृतात कालवून १ एकर क्षेत्रावर फोकुन द्या त्याला पाणी दया. म्हणजे ८-१० दिवसात राजगिरा उगवून येईल. ३-४ पाण्याचा पाळ्या ८-१० दिवसांच्या अंतराने दया. म्हणजे १.५ ते २ महीन्यात हा राजगिरा १.५ ते २ फुट साधारण गुडघ्याएवढा झाला म्हणजे त्याचे मुळ हे लव्हाळ्याच्या गाठींवर जावुन आदळते व लव्हाळयाला मारुन टाकते.
लव्हाळीच्या झाडाच्या मुळ्यावर ७ गाठी (र्हिज़ोमेस) असतात हया सर्व मरतात लव्हाळीचा नायनाट होतो यानंतर मग आपल्या जवळील मार्केट मधे राजगिरा भाजी विकता येते. नवरात्री मध्ये ही भाजी उपवासात वापरतात, भाव नसेल तर उपटुन किंवा कापुन आच्छादन करा त्यावर डिकंपोस्ट एक किलो + गुळ एक किलो दोन तास भिजत ठेवून ड्रिपने सोडा चांगल्या प्रतिचे कंपोष्ट खत तयार होईल.
आपण कायमस्वरूपी लव्हाळी पासुन मुक्त तर व्हालच व आपला उद्देश साध्य होईल. लव्हाळा हे बहुवार्षिक तण आहे. ऊस, सोयाबीन, मका, कापूस, भात, फळबागा यासारख्या पिकांमध्ये ते अधून येते. याच्या प्रादुर्भावाने २०-९० टक्क्यांपर्यंत उत्पन्नामध्ये नुकसान होण्याची शक्यता असते. लव्हाळा शाखीय पद्धतीने वाढते. त्याच्या गाठी जमिनीत असतात त्यांना नागरमोथे देखील म्हणले जाते. दरम्यान खुरपणी झाली तरी नागरमोथे खोलवर जमिनीमध्ये जिवंत राहतात.
त्याच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण मिळाले की हे तण झपाट्याने वाढते. त्यामुळे खालील पद्धतीने व्यवस्थापन करा, फायदा होईल. ऊसातील लव्हाळा नियंत्रणासाठी धानुका सॅम्प्रा ३६ ग्रॅम याची प्रति एकर या प्रमाणात फवारणी करा. सॅम्प्रा तणनाशक फवारल्यानंतर ८ दिवस जमिनीची मशागत करू नका. दरम्यान महिनाभर आंतरपीक म्हणून काही लावू नका.
भातामध्ये लव्हाळ्याचा प्रादुर्भाव दिसून आल्यास बायर सनराईज ४० ग्रॅम प्रति एकर या प्रमाणात फवारणी करा. फवारणीनंतर २४ तासांनी पिकात पाणी सोडा. तसेच तणनाशकाची फवारणी झाल्यानंतर पिकावर पिवळेपणा येऊ शकतो त्यासाठी चिलेटेड झिंक १५ ग्राम प्रति पंप या प्रमाणात फवारणी करा