Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

महाराष्ट्रात थंडीची चाहूल

November 5, 2024

Banana Cultivation : उन्नत तरीके से केले की खेती कैसे करें ?

April 16, 2024

Jowar Market : किसानों को ज्वार सें हुआ करोडो का नुकसान

April 16, 2024
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » ‘हबल’ दुर्बीण : महास्फोट (बिग बँग) सिद्धांताला बळकटी देण्याचे काम करणारी दुर्बीण
ताज्या बातम्या

‘हबल’ दुर्बीण : महास्फोट (बिग बँग) सिद्धांताला बळकटी देण्याचे काम करणारी दुर्बीण

Neha SharmaBy Neha SharmaMay 17, 2022Updated:May 17, 2022No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

‘हबल’ दुर्बीण हे मानवी आश्चर्यांपैकी एक आहे आणि मानवाच्या यशाचे एक प्रतिक देखील आहे. याचे कारण म्हणजे मानवाची उद्याबद्दलची कल्पना विस्तारण्यात हबलचा खूप मोठा वाटा आहे. हबलने मानवाला काय नाही दाखवून दिले? कृष्णविवरे (ब्लॅकहोल्स), सुपरनोव्हा, अवकाशातील बुडबुडे, रेड जाइंट्स, ई. खूप गोष्टी हबलने मानवाला दाखवल्या. हबल जेव्हा अवकाशाकडे रोखली जाते तेव्हा मानवाला फक्त तारेच नाही तर त्याचा 1380 कोटी वर्षांपूर्वीपासूनचा भूतकाळ दिसतो.

एडविन हबल नावाचा एक महान खगोलशास्त्रज्ञ होऊन गेला, त्याच्याच नावावरून या दुर्बिणीचे नाव हबल ठेवण्यात आले. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 563 किलोमीटर उंचीवर 1990 साली नासा आणि स्पेस टेलिस्कोप सायन्स इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही दुर्बीण अवकाशात सोडण्यात आली. ताशी 16093 किलोमीटर या वेगाने दर 96 मिनिटाला ही दुर्बीण पृथ्वीची एक फेरी पूर्ण करते. आज ही दुर्बीण म्हणजे पृथ्वीचा अवकाशाकडे पाहायचा डोळा आहे.

आकाराने एका स्कुलबस एवढी असलेली ही दुर्बीण 11110 किलो वजनाची आहे. हबल जेव्हा पृथ्वीवर चित्रे पाठवते तेव्हा ती कृष्णधवल असतात. पृथ्वीवरचे शास्त्रज्ञ ती चित्रे घेऊन त्यावर प्रक्रिया करून रंगीत चित्र बनवतात. त्यातला निळा रंग म्हणजे ऑक्सिजन, लाल रंग दाखवतो सल्फर, हिरवा रंग म्हणजे हायड्रोजन, ई. हबल मधून दर तासाला नवीन माहिती पृथ्वीवर पाठवली जाते आणि इथे असलेल्या कम्प्युटर्समध्ये ती माहिती साठवून ठेवली जाते.

महास्फोट (बिग बँग) सिद्धांताला बळकटी देण्याचे काम देखील हबलने केले आहे. उदाहरण सांगतो, 1992 मध्ये SL-9 हा धूमकेतू गुरू ग्रहाच्या जवळून जात होता. ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणात अडकून तो धूमकेतू तुटला आणि त्याचे सात तुकडे झाले आणि ते तुकडे गुरू ग्रहाच्या कक्षेत विखुरले गेले. हेच तुकडे हळूहळू गुरू ग्रहाच्या पृष्ठभागावर आदळले जाणार होते. शास्त्रज्ञांनी या घटनेची निरीक्षणे नोंदविण्याचे ठरवले. ही निरीक्षणे महास्फोट सिद्धांताला बळकटी देतील अशी शास्त्रज्ञांची आशा होती. अर्थात यासाठी त्यांना हबलचीच मदत घ्यावी लागली.

हबलमधून धुमकेतूचे तुकडे आणि गुरू ग्रह यांची टक्कर पहायचे ठरले. गुरूच्या कक्षेतले ते तुकडे एक एक करून गुरूवर आदळणार होते. पहिला तुकडा आदळला आणि काहीच घडले नाही. पृथ्वीवर शास्त्रज्ञ लोकांत सन्नाटा पसरला. पण जेव्हा दुसरा तुकडा आदळला तेव्हा मात्र एक प्रचंड मोठा स्फोट झाल्यासारखे दृश्य दिसले आणि गुरू ग्रहावरच्या वायूंचे अवकाशात 3000 किलोमीटर वरपर्यंत लोट उठले. हीच ती घटना होती ज्यावरून हे समजले की महास्फोट झाल्यानंतर जी काही वेगवेगळ्या ग्रह-तारे-धूमकेतू यामध्ये टक्कर चालू होती ती आजही ही चालू आहे. आणि विश्वाच्या प्रसरणाला देखील पुष्टी मिळाली. याशिवाय आईनस्टाईनच्या सामान्य सापेक्षता सिद्धांताला पुष्टी देणाऱ्या ब्लॅकहोल्सची निरीक्षणे देखील हबलने नोंदवली आहेत.

हबलने घेतलेली चित्रे लोकांमध्ये इतकी लोकप्रिय आहेत की त्यानंतर ती चित्रे पोस्टाच्या तिकिटावर पण आली. अशा या हबलची दुरुस्ती किंवा देखभाल ही अवकाशात केलेल्या एखाद्या सर्जरी सारखी अवघड आहे. हबलची शेवटची देखभाल 2009 मध्ये केली होती. गेली जवळपास तीस वर्षे हबल अविरतपणे काम करत आहे पण अजूनही निवृत्तीपासून कोसो दूर आहे.

Credit : Dr. Ajit Dhanawade

habal
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

Pm Surya Ghar Yojana : मोदी सरकार की नई योजना; एक करोड़ घरों को मिलेगी मुफ्त बिजली, ऐसे करें आवेदन।

March 30, 2024

Summer Management Of Dairy Animal : गर्मियों में ऐसे करे डेयरी पशुओं की देखभाल।

March 29, 2024

Agriculture Market : चुनाव की आपाधापी में किसान संकट में; सोयाबीन और चना सहित कृषि उपज की कीमतों में गिरावट।

March 28, 2024

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

महाराष्ट्रात थंडीची चाहूल

हवामान November 5, 2024

सध्या ऑक्टोबर हिटचा प्रभाव अजूनही जाणवत आहे. पण लवकरच महाराष्ट्रात थंडीचीही चाहूल लागू शकते. सध्या…

Banana Cultivation : उन्नत तरीके से केले की खेती कैसे करें ?

April 16, 2024

Jowar Market : किसानों को ज्वार सें हुआ करोडो का नुकसान

April 16, 2024

ROSE CULTIVATION : पॉलीहाउस में गुलाब लगाकर कमाएं लाखों रुपए।

April 12, 2024

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.