डोमकळी अंड्यातून बाहेर पडलेली अळी, कळीमध्ये प्रवेश करते व आतील भाग पोखरते. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भावामुळे कळीचे नुकसान झाल्यामुळे फूले आवट उमललेल्या गुलाबाच्या कळीसारखी दिसतात यालाच
डोमकळी म्हणतात.
🔰 डोमकळी कशी ओळखावी पहिल्या अवस्थेतली गुलाबी बोंडअळी फुलांमध्ये शिरते. पाकळ्यांना लाळेद्वारे एकमेकांना जोडुन स्वताला स्वरक्षणासाठी बंद करून घेते.
🔰 प्रादुर्भावग्रस्त फुले अर्धवट उमललेल्या गुलाबाच्या कळीसारखी दिसतात. अश्या कळ्या म्हणजेच डोमकळया डोमकळ्या तोडून पाकळ्यांना वेगळे केल्यास, पाकळ्या एकमेकांना लाळेद्वारे जोडल्यासारख्या दिसतात.
🔰बारकाईने निरीक्षण केल्यास पांढरट रंगाची पहिल्या किंवा दुस-या अवस्थेतील गुलाबी बोंडअळी आतमध्ये असल्याचे दिसून येते.
🔰 • या फुलांमध्ये सर्वप्रथम गुलाबी बोंड आळीचा प्रादुर्भाव सुरू होतो. अंडयातून निघालेली अळी, ताबडतोब पाते. कळ्या, फुले यांना छिद्र करून आत मध्ये शिरते. प्रादुर्भावग्रस्त फुलांचे डोमकळीत रुपांतर करते. •
🔰गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव १० दिवसापेक्षा कमी कालावधीच्या कळीमध्ये झाल्यास झाडावरून कळी गळून पडते. उशीरा झालेल्या प्रादुर्भावामधे नुकत्याच लागलेल्या बोंडावर किंवा उशीरा लागलेल्या फुलांवर गुलाबी
🔰 बोंड अळीची मादी पतंग अळी घालते. • या फुलामधुन किंवा लहान बोंडाला छिद्र पाडून अळी बोंडात शिरते, असे छिद्र बोंडाची वाढ झाल्यामुळे बंद होते.
🔰 एकदा का अळी बोडामध्ये शिरली की, बोंडावरील छिद्र बंद असल्याने बोंडाचे वरून निरीक्षण केल्यास अळीचा प्रादुर्भाव दिसून येत नाही. त्याठिकाणी फक्त काळा डाग दिसतो.
🔰 • अळी आतमध्ये राहून लहान हिरव्या बोंडामधील अपरीपक्व कापूस व सरकी खाऊन टाकते तर मोठया बोंडामध्ये या फक्त सरकीवर आक्रमण करते.
🔰 एक अळी बोंडामधील तिन ते चार सरकीच्या दाण्यांचे नुकसान करते. एका बोंडामध्ये एक अथवा अनेक अळया आपला जीवनक्रम पूर्ण करू शकतात.
🔰 • प्रादुर्भावग्रस्त बोंडे परिपक्व न होताच उमलतात, त्यामुळे रुईची प्रत खालावते. सरकीतील तेलाचे प्रमाण घटते आणि बियाण्याची उगवणशक्ती कमी होते.
🔰 कापूस पिकातील डोमकळया वेळीच नष्ट न केल्यास यातील गुलाबी बोंडअळीची दुसरी पिढी तयार होऊन, गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव प्रचंड वाढतो व कापूस पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे शेतकरी बघुना कापूस पिकातील डोमकळीचे व्यवस्थापन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
🔰 डोमकळीचे नियंत्रण:
🔰 १. डोमकळया गोळा करून अळीसह नष्ट कराव्यात, जेणेकरून गुलाबी बोंडअळीची पुढची पिढी तयार होणार नाही व प्रादुर्भाव होण्याच्या मुळ कारणाला आळा घालता येईल.
🔰 २. ट्रायकोग्रामाटॉयडीया बैंक्ट्री या परोपजीवी गांधील माशीचे कार्ड (१.५ लाख अंडी/हे) शेतामध्ये लावावेत.
🔰 ३. कामगंध सापळे १० प्रति हेक्टरी लावावेत. कपाशीवरील गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणाकरिता गरजेनुसार खालील रासायनिक किटकनाशकांचा वापर करावा.
🔰 प्रोफेनोफॉस ५० ईसी किंवा ३० मिली / १० लिटर
🔰 थायोडीकार्ब
[७५ डब्ल्यू पी २० ग्रॅम /१० लिटर)
🔰 इमामेक्टीन बेन्झोएट ५ एस जी ४ ग्रॅम / १० लिटर
विकास पाटील
कृषि संचालक, (विस्तार व प्रशिक्षण) कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
संकलन :- टीम कृषि शास्त्र