दोन वर्षांपासून सोयाबीनला चांगला दर मिळत असल्याने निफाड तालुक्यात चालू खरीप हंगामात सरासरीपेक्षा १२५ टक्के क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला. मात्र, पावसाचा खंड, त्यातच तणनाशक फवारणी केल्याने पिकावर विपरित परिणाम दिसून येत आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक सोयाबीन पेरा असलेल्या निफाड तालुक्यात ही परिस्थिती आहे. याबाबत शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी समोर आल्या आहेत. दरम्यान, पीक पिवळे पडल्याने शेतकऱ्यांना उत्पादन घटण्याची भीती सतावत आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी क्षेत्रिय पातळीवर पाहणी केली आहे.
शेतकऱ्यांनी त्यांचा शेतीमाल विकल्यानंतर त्यांना तातडीने पैसे द्यावे व व्यापाऱ्यांनी जर तसे केले नाही तर संबंधित व्यापाऱ्यावर आता कारवाई करण्याचेच आदेश राज्याचे पणन संचालक शैलेश कोतमीर यांनी दिले. त्यामुळे आता शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाचे पैसे व्यापाऱ्यांना अगदी वेळेवर देणे गरजेचे आहे. नाहीतर पणन संचालनालयाच्या माध्यमातून कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.
यामध्ये महत्त्वाचे असे आहे की शेतीमाल व्यापाऱ्यांनी खरेदी केला व तो खरेदी केल्यानंतर मालाचे वजन झाल्यानंतर भावाप्रमाणे शेतकऱ्यांचे पैसे लगेच देणे व्यापाऱ्यांना बंधनकारक करण्याचा आदेश पणन संचालकाकडून देण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला बऱ्याचदा बाजारभावात घसरण झाल्यामुळे आधीच फटका बसतो व त्यातही पैसे वेळेवर जर मिळाले नाही तर शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागतो.
या अनुषंगाने या घटनेचे गांभीर्य ओळखून पणन संचालकांनी अशा व्यापाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. यामध्ये आता जर माल खरेदी केल्यानंतर व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना वेळेवर पैसे दिले नाहीत तर संबंधित अधिकाऱ्यांकडून व्यापाऱ्यांच्या हिशोबवहीची तपासणी केली जाणार आहे व यामध्ये जर व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना पैसे देण्याला टाळाटाळ केली तर व्यापाऱ्यांची बँकेमध्ये जी काही डिपॉझिट असते त्यामधून पैसे देण्यात येणार आहेत किंवा दुसरी बाब म्हणजे ज्या बँकेने संबंधित व्यापाऱ्याचे हमी दिली आहे अशा बँकेकडून शेतकऱ्यांना पैसे देण्याची कायद्यात तरतूद आहे.
यामध्ये पणन संचालकांचा जो काही आदेश आहे त्यानुसार बाजार समितीमध्ये शेतीमालाचे लिलाव झाल्यास व्यापाऱ्यांच्या खरेदी आणि विक्री सह विक्री दराची माहिती घेण्याचे काम हे बाजार समितीचे असल्याचे देखील यामध्ये नमूद करण्यात आला आहे व या माध्यमातून ज्या व्यापाऱ्यांनी सदर नियमांचे पालन केले नसेल तर त्यावर कारवाई करण्याचा उल्लेख आहे.

