सातारा ः आले पिकांच्या दरात मागील दोन महिन्यांपासून सुधारणा झाली आहे. परिणामी, आले बियाण्याच्या दरही वाढले आहे. सध्या बियाण्यास प्रति गाडी २४ ते २५ हजार रुपये दर निघाला आहे.
आले पिकांचे दर वाढतील त्याच तुलनेत बियाण्याचा दर वाढणार असल्याने आले पिकांच्या भांडवली खर्चात मोठी वाढ होणार आहे.
जिल्ह्यात आले लागवडीच्या दृष्टीने तयारी सुरू झाली आहे. आले लागवडीपूर्वी बियाणे ढेप लावून बंदिस्त करून सावलीत ठेवले जाते. यासाठी बियाणे एक ते दीड महिना अगोदर खरेदी करावी लागते. सध्या लागवडीसाठी बियाणे खरेदी सुरू झाली आहे. पाणी, जमीन, वातावरणातील बदल केल्यास उत्पादनात वाढ होत असते.

