दिवसेंदिवस वाढणारी महागाई सामान्यांचा जीव आणखी मेटाकुटीला आणत आहे. सणासुदीच्या दिवसात जेव्हा सामान्य ग्राहकांची खरेदी वाढते तेव्हा जर महागाईच्या भस्मासुराने तोंड उघडले तर सामान्य ग्राहक अगदी मोडून पडतो. अगदी सणासुदीच्या तोंडावर असेच घडले आहे. ग्राहक किंमत निर्देशांकानुसार नुसार किरकोळ महागाई दरात ७.४१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सप्टेंबरमध्ये ७.४१ वाढ नोंदवली गेली. मागील पाच महिन्यात हा महागाई दरचा उच्चांक आहे. त्यामुळे ऐन दिवाळीमध्ये सामन्यांचा खिसा आणखी रिकामा होणार आहे. सरकारने याबाबतची अधिकृत आकडेवारी जाहीर केली
हा सलग ९ वा महिना आहे जेव्हा महागाईचे आकडे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) 2-6% च्या मर्यादेच्या वर राहिले आहेत. ग्राहक किंमत निर्देशांकात ३ महिन्यांचा घसणीचा कल दर्शवत असताना अचनाक ७ टक्क्यांची वाढ झाली आहे. अन्नधान्याच्या वाढत्या किमतींमुळे हे आकडे वाढले आहेत. आरबीआयला प्रत्येक बाजूने 2% च्या फरकाने महागाई 2 – 4% च्या मर्यादेत ठेवण्याचे काम सरकारने दिले आहे.
आरबीआयचे चलनविषयक धोरण समिती तिचे द्वि-मासिक चलनविषयक धोरण तयार करताना किरकोळ चलनवाढीचा डेटा विचारात घेते. त्यामुळे बँका आपल्या कर्जदरात आणखी वाढ करण्याची शक्यता आहे. याचाच अर्थ सामान्यांच्या खिशावर आणखी बोजा पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.