Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

महाराष्ट्रात थंडीची चाहूल

November 5, 2024

Banana Cultivation : उन्नत तरीके से केले की खेती कैसे करें ?

April 16, 2024

Jowar Market : किसानों को ज्वार सें हुआ करोडो का नुकसान

April 16, 2024
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » ऊस पिकांतील हुमणी किडीचे एकात्मिक नियंत्रण
ताज्या बातम्या

ऊस पिकांतील हुमणी किडीचे एकात्मिक नियंत्रण

Neha SharmaBy Neha SharmaAugust 31, 2022No Comments7 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

नमस्कार शेतकरी बंधूनो,
ऊस हे महाराष्ट्रातील तसेच भारतातील महत्त्वाचे नगदी पीक आहे. ऊस पिकामध्ये सध्यस्थितीत अनेक भागामध्ये हुमणी किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. सध्या हुमणी कीड ही ऊसाच्या पिकालाच नव्हे तर सर्वच पिकांना त्रायदायक ठरत आहे. जवळ जवळ ४० ते ६० टक्के नुकसान ह्या किडी मुळे होताना दिसते. खोडवा तसेच आडसाली ऊस पिकात या किडीचा प्रादुर्भाव जास्त दिसून येत आहे याची सुरुवात होते, मेमध्ये वळवाच्या पावसानंतर त्याच कालखंडात हुमणी किड कोषावस्थेतून बाहेर पडते. ढगाळ वातावरणात सायंकाळी ७ ते ८ च्या सुमारास हुमणीचे भुंगेरे बाहेर पडून जवळ असणाऱ्या कडुनिंब, बाभूळ व बोर या झाडावर गोळा होवून पाने खातात व सकाळी ५ ते ७ च्या सुमारास पुन्हा जमिनीत जातात. हा क्रम दररोज भुंगे जिवंत असे पर्यंत जवळ जवळ ७० ते ८० दिवस चालतो. याच कालावधीत मादी कीड पुंजक्याने अंडी घालते. सर्वप्रथम शेतात असणारा काडी कचरा, सेंद्रिय घटक यावर तिचा उदरनिर्वाह होत असतो. नंतर दिवसेंदिवस तिची भूख वाढून पिकाच्या पांढऱ्या मूळ्या खाण्याकडे कल वाढतो. वेळीच नियंत्रण न केल्यास ऊस उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट येण्याची शक्यता असते. खरीप हंगामामध्ये हुमणी या किडीमुळे ऊस, भुईमूग, ज्वारी, बाजरी व मका यासारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हे टाळण्यासाठी किडीचा जीवनक्रम जाणून घेऊन प्रौढ व अळी अवस्थांचा नाश सामुदायिकरीत्या करणे आवश्‍यक आहे. सर्व शेतकऱ्यांच्या सामुदायिक प्रयत्नाव्दारे हुमणीचे यशस्वीरित्या नियंत्रण करता येईल.

हुमणी हि एक बहुभक्षी कीड आहे. हुमणी किडीच्या प्रामुख्याने दोन महत्वाच्या प्रजाती (होलोट्रीकिया सेराटा व ल्यूकोफॉलीस लेपिडोफोरा) महाराष्ट्रामध्ये आढळून येतात.
B) कोणत्या पिकांवर आढळते :- ऊस, भुईमूग, ज्वारी, बाजरी, मका
C) नुकसानाची तीव्रता :- ३० ते ८० टक्के (वालुकामय जमिनीमध्ये अधिक उपद्रव)
D) ओळख हुमणीची :-
a) अळी अवस्था –
प्रथम अळी अवस्था पांढरीशुभ्र, पिवळे डोके, सुमारे ८ मिमी लांबी छातीवर पायांच्या तीन जोड्या. पूर्ण विकसित अळ्या पिवळट सफेद, डोक्‍याचा रंग बदामी व इंग्रजीच्या “सी’ अक्षराप्रमाणे अर्धगोलाकार. पूर्ण विकसित अळीची लांबी सुमारे ४० ते ४५ मिमी असते.

b) प्रौढ भुंगेरा –
तपकिरी किंवा बदामी रंग, १८ ते २० मिमी लांब व ८ मिमी पर्यंत जाड, पंखाची प्रथम जोडी ढाली प्रमाणे मजबूत, पंखाची दुसरी जोडी पातळ व घडी करण्यासाठी लवचिक असून, पहिली जोडी सुरक्षित व पंख उघडताना मदत करते.

E) हुमणी किडीची जीवनसाखळी :-
1) पहिल्या पावसानंतर प्रौढ भुंगेरे सायंकाळी जमिनीतून बाहेर येतात.
2) कडूलिंब, बाभूळ, बोर यासारख्या वृक्षावर मादीसोबत मिलनासाठी जमतात.

F) नियंत्रण हवे याच वेळी :-
याच काळात बांधावरील यजमान झाडांची पाने खातात. रात्रीच्या वेळी प्रकाश सापळे लावून त्यांना आकर्षित करावे. संध्याकाळी व रात्री या झाडांच्या फांद्या जोरात हलवून प्रौढ खाली पाडावेत. ते गोळा करून केरोसीन वा कीटकनाशकमिश्रित पाण्यात टाकून नष्ट करावेत. हे काम सामुदायिकरीत्या करणे अधिक फायदेशीर. त्यानंतर सूर्योदयापूर्वी पुन्हा जमिनीत परत जातात. दिवसा प्रौढ किडे दिसून येत नाहीत.

अंडी घालण्याचा कालावधी (जून ते जुलै) :-
जमिनीत साधारणपणे ८ ते १० सेंमी खोलपर्यंत साबुदाण्याच्या आकाराची व लांबट गोल अंडी घातली जातात, एक मादी तिच्या जीवनकाळात ६० ते ७० अंडी देते. अंड्यातून ९ ते १० दिवसांत अळी बाहेर येते.

अळी अवस्था :-
अळी अवस्था साधारणतः ५ ते ७ महिन्यांची असते, जमिनीत ती १० ते १५ सें.मी खोल अर्धगोलाकार अवस्थेत पडून राहते. हीच पिकासाठी खरी नुकसानकारक अवस्था असते. ऑक्‍टोबरच्या तिसऱ्या आठवड्यानंतर अळी जमिनीत खोलवर कोषावस्थेत जाते. कोष तांबूस तपकिरी रंगाचा व टणक असतो, कोषावस्था २० ते २५ दिवस असते.

प्रौढ अवस्था :-
कोषातून निघणारे प्रौढ कीटक पहिल्या पावसापर्यंत जमिनीतच सुप्तावस्थेत भुंगेरे सुरवातीस पिवळसर पांढरट व कालांतराने तपकिरी होतात. भुंगेऱ्यांचे आयुष्य सुमारे ८० ते ९० दिवसांचे असते. हुमणीची अशा प्रकारे एका वर्षात एक पिढी पूर्ण होते.

नुकसान कालावधी :-
हुमणी कीड प्रामुख्याने आढळणारे महिने ऑगस्ट ते सप्टेंबर या महिन्याच्या कालावधीत हुमणी कीड पिकांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान करते, प्रथमावस्थेतील अळ्या पिकाची तंतुमुळे खातात. ती उपलब्ध नसल्यास सेंद्रिय पदार्थ खातात. तंतुमुळांचा फडशा पाडल्यानंतर मुख्य मुळे खाण्यास सुरू करतात. परिणामी झाड वाळते. एका झाडाचे मूळ कुरतडून खाल्ल्यानंतर हुमणी दुसऱ्या झाडाकडे वळते. शेतात एका ओळीत झाडे वाळल्याचे दिसून येते.

G) एकात्मिक कीड नियंत्रण :-
नैसर्गिक पद्धतीने नियंत्रण :-
१) उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरट करावी, नांगरट नेहमी दिवसा करावी त्यामुळे जमिनीतील किडीच्या सुप्तावस्था (प्रौढ कीटक) वरती येऊन उन्हाच्या तीव्रतेने नाश पावतात. तसेच मशागत होत असताना पशु-पक्षी यांच्या मार्फत हुमणीच्या अळ्या व कोष सहज टिपले जातात, हुमणीचे नैसर्गिक शत्रू बगळा, चिमणी, घार, कावळे, रानमांजर, रानडुक्कर, मुंगूस हे हुमणीच्या अळ्या आवडीने खातात.
२) सतत एकच पिक न घेता पिकांची फेरपालट करावी, कमी कालावधीची पिके म्हणजे भुईमूग व हिरवळीच्या खतासाठी ताग किंवा धेंच्या सारखी पिके घ्यावीत त्यामुळे हुमणीची साखळी तुटू शकते.
3) एकात्मिक हुमणी नियंत्रण करण्यासाठी सापळ्यांचा प्रभावी वापर करावा जसे लाईटचा बल लावून व त्या खाली मोठे घमेले किंवा खड्डा करून सापळा तयार करावा. मोठे घमेले किंवा खड्यात प्लास्टिकचा कागद टाकावा व त्यात केरोसीन किंवा कीटकनाशक मिश्रित पाणी वापरावे. त्यात रात्री हुमणीचे किडे प्रकाशाला आकर्षित होऊन येऊन मोठे घमेले किंवा खड्यात ठेवलेल्या केरोसीन किंवा कीटकनाशक मिश्रित पाण्यात पडून नष्ट होतील व हुमणीच्या पुढील साखळी तोडता येऊ शकते. हा उपाय प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांनी सामुदायिकरित्या करणे गरजेचे आहे.
४) प्रकाश सापळे किंवा पेट्रोमॅक्साचा वापर करुनदेखील प्रौढ भुंगेरे जमा करता येतात. हे प्रकाश सापळे किंवा पेट्रोमॅक्स सर्व शेतकऱ्यांनी शेतामधील घर, झोपडी, विहीरीजवळ किंवा झाडावर लावावेत. सापळयात जमा झालेले भुंगेरे नष्ट करावेत. हे सापळे साधारणपणे संध्याकाळी ७.३० ते ८.३० या कालावधीत लावावेत.

जैविक पद्धतीने नियंत्रण :-

1) जैविक पद्धतीने नियंत्रण करत असताना परोपजीवी बुरशी बिव्हेरिया बॅसियाना, मेटारायझिम ऍनिसोपली या जैविक कीड नियंत्रकांचा २ लिटर प्रति एकरी किंवा ४०० लिटर पाण्यामधून वापर करावा. या जैविक औषधांचा वापर आळवणी किंवा पाटपाणी किंवा ड्रीपद्वारे करू शकता.
2) जैविक पद्धतीने नियंत्रण करत असताना हुमणीच्या अळीला रोगग्रस्त करणाऱ्या सूत्रकृमी (EPN) हिटरोऱ्हॅब्डिटीस व स्टेनरनेमा या सूत्रकृमीचा १ लिटर प्रति एकरी किंवा ४०० लिटर पाण्यामधून वापर करावा. या सूत्रकृमी औषधांचा वापर आळवणी किंवा पाटपाणी किंवा ड्रीपद्वारे करू शकता.
3) जैविक पद्धतीने नियंत्रण करत असताना निंबोळी पेंडीचा किंवा निंबोळी व करंज पेंड युक्त सेंद्रिय खतांचा ३०० ते ४०० किलो प्रति एकर वापर करावा.

रासायनिक नियंत्रण :-
हुमणी किडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीपेक्षा जास्त असेल तर रासायनिक उपाययोजना अवलंबणे उपयुक्त ठरेल. त्यामध्ये खालील प्रमाणे उपाययोजना कराव्यात…
१) यजमान झाडांवर फवारणीसाठी कार्बारील (६० टक्के) २० ग्रॅम किंवा थायोडीकार्ब (७५ टक्के) १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये एकत्र मिसळून हे द्रावण सर्व पानांवर व्यवस्थितरीत्या फवारावे.
२) ऊस लागवड करत असताना किंवा कोणतीही पेरणी करीत असताना बेसल डोस सोबत फिप्रोनील ०.३% दाणेदार १० किलो किंवा क्लोरअँट्रानिलीप्रोल ०.४% दाणेदार ८ किलो एकत्र करून जमिनीत मातीआड करून द्यावे.
ऊस लागवड करण्यापूर्वी बेणेप्रक्रिया करणे अत्यंत महत्वाचे आहे त्यात बेणेप्रक्रियेसाठी
३) ऊस लागवड करून १५ दिवसानंतर क्लोरोपायरीफॉस २०% ईसी ३०० ते ४०० मिली प्रति एकर किंवा २०० लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी.
४) हुमणी किडींच्या प्रौढ अवस्थेत लेसेंटा १४० ग्रॅम अधिक डेसिस १०० मिली हे एकरी प्रमाण घेऊन ४०० लिटर पाण्यात एकत्र मिसळून आळवणी करावी.
५) आळवणी करत असताना जमिनीत पुरेशी चांगली ओल असणे अत्यंत महत्वाचे आहे. कारण दिलेले कीटकनाशक मुळांच्या कक्षेत जाऊन हुमणी किडींचा चांगलाच बंदोबस्त होईल.
वरील प्रमाणे एकात्मिक पद्धतीने हुमणी किडींचे नियंत्रण केल्यास हुमणी किडीचा वेळेत बंदोबस्त करता येईल व ऊस पिकामध्ये होणारे नुकसान टाळता येईल. हुमणी हि ऊस पिकातील अतिशय हानीकारक व महत्वाची कीड असून सध्या मराठवाडयातील खरिप व रब्बी पिकांच्या कमी उत्पादनासाठी मुख्य कारण आहे. ही कीड बहुभक्षी, वर्षभरात एकच जीवनक्रम, जमिनीत राहणारी असल्यामुळे केवळ एका पध्दतीचा वापर करुन व्यवस्थापन करता येणार नाही. हुमणीच्या यशस्वी व्यवस्थापनासाठी प्रौढ भुंगेरे व अळयांचे व्यवस्थापन एकात्मिक व सामुदायिकरित्या सातत्याने करावे लागेल. शेतकरी, शास्त्रज्ञ व शासन यांच्या संयुक्त प्रयत्नाने हुमणीचे योग्यरीत्या व्यवस्थापन करता येईल.

एकात्मिक अन्नद्रव्ये, पाणी व रोग-किड व्यवस्थापन मार्गदर्शन…पिकांच्या सर्वांगीण विकासासाठी, भरघोस फुलधारणा, फळधारणा, फुगवण, चकाकी आणि संपुर्ण रोग व कीड संरक्षणासाठी देवअमृत अॅग्रोटेकची दर्जेदार व विश्वसनीय उत्पादने एकदा अवश्य वापरून पहा…
…….. यापुढे “अद्यावत शेती म्हणजे विपणनाभिमुख शेती होय”…!!!✍
🙏🙏🙏🙏🙏 शेतकरी हितार्थ 🙏🙏🙏🙏🙏
—-
🦚🌹🦚 !! अन्नदाता सुखी भव: !!🦚🌹🦚
काळजी घ्या…आपला जिव्हाळा कायम राहो
🙏विचार बदला! जीवन बदलेल!!🙏
“Agriculture is My Love, Passion, Culture & Life.”
Mr.SATISH BHOSALE
Founder & CEO,
KRUSHIWALA FARMER’S GROUP
(General Manager)
DevAmrut Agrotech Pvt Ltd.
Mob No.: 09762064141

फोटो क्रेडिट : होय आम्ही शेतकरी

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

Pm Surya Ghar Yojana : मोदी सरकार की नई योजना; एक करोड़ घरों को मिलेगी मुफ्त बिजली, ऐसे करें आवेदन।

March 30, 2024

Summer Management Of Dairy Animal : गर्मियों में ऐसे करे डेयरी पशुओं की देखभाल।

March 29, 2024

Agriculture Market : चुनाव की आपाधापी में किसान संकट में; सोयाबीन और चना सहित कृषि उपज की कीमतों में गिरावट।

March 28, 2024

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

महाराष्ट्रात थंडीची चाहूल

हवामान November 5, 2024

सध्या ऑक्टोबर हिटचा प्रभाव अजूनही जाणवत आहे. पण लवकरच महाराष्ट्रात थंडीचीही चाहूल लागू शकते. सध्या…

Banana Cultivation : उन्नत तरीके से केले की खेती कैसे करें ?

April 16, 2024

Jowar Market : किसानों को ज्वार सें हुआ करोडो का नुकसान

April 16, 2024

ROSE CULTIVATION : पॉलीहाउस में गुलाब लगाकर कमाएं लाखों रुपए।

April 12, 2024

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.