गोगलगाय ही एक बहुभक्षी प्रकारची किड असून ती कापूस,भाजीपाला व विविध फळबागेमध्ये शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
नुकसानीच प्रकार : गोगलगाय हा मृदुकाय आणि उदरपाद वर्गात येणारा प्राणी आहे. गोगलगायीच्या जीवनाच्या तीन अवस्था असतात अंडी, पिल्ल, प्रौढ यातील पिल्ल आणि प्रौढ अवस्था खूप नुकसानकारक असते. ती विशेषतः रोपावस्थेत पिकाचे नुकसान करते व रोपांना समूळ नष्ट करते.
एकात्मिक किड व्यवस्थापन
१)उन्हाळ्यात जमिनीची खोलवर नांगरट केल्याने त्या नष्ट होतात.
२)कोंबड्या पाळाव्यात त्या गोगलगायी खातात.
३) शेताचे बांध स्वच्छ ठेवावेत त्यामुळें त्यास लपण्यास जागा मिळत नाही
४)खुराकाच मोकळं पोत ( गोणपाट) एक किलो गुळाच्या पाण्यात बुडवून संध्याकाळी शेतात टाकावीत,त्यावर गोगलगाय आकर्षित होईल नंतर ते जमा करून त्यावर औषधाची फवारणी करावी
५) मोसंबी, डाळिंब,व इतर बागेत दरवर्षी खोडावर बोर्डो पेस्ट लावावे म्हणजे गोगलगाय झाडावर चढणार नाही
६) तंबाखू भुकटी किंवा पावडर शेताच्या सर्व बाजूने टाकावी म्हणजे गोगलगाय आत येणार नाही
७) गोगलगाय नियंञणासाठी मेटाअल्डीहाइड २.५% दोन किलो प्रति एकरी भुकटी असणारे स्नेलकिल या मॉलुस्कीसाईड चा वापर करावा. हे विषारी कीटकनाशक असल्यामुळे याचा वापर करताना मास्क व हॅन्ड ग्लोव्हज च वापर करावा.
अशाप्रकारे शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव उदगीरच्या ज्या ज्या भागात मोठ्या प्रमाणात दिसून येत असेल त्या भागातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सामूहिकरित्या वरील प्रमाणे उपाय योजना केल्यास गोगलगायीचे नियंत्रण लवकरात लवकर व अधिक प्रभावीपणे होते.
प्रा.अमोल ढोरमारे
( सहायक प्राध्यापक, कृषि महाविद्यालय डोंगरशेळकी तांडा उदगीर)
photo credit : Animal sake

