टरबुज व खरबूज हे वेलवर्गीय असून मराठवाड्यात ते उन्हाळी हंगामात बागायती तसेच नदीच्या पात्रात घेतले जातात या दोन्हीं पिकासाठी उष्ण व कोरडे हवामान ,भरपूर सूर्यप्रकाश व जमिनीचा पीएच ५.५ ते ७ या सर्व पोषक बाबी मराठवाड्यात उपलब्ध आहेत.यामुळे या पिकाचे क्षेत्र आणि उत्पादनं दोन्हीं ही वाढले आहे. या यशस्वी उत्पादनातील सर्वात मोठी अडचण म्हणजे फळमाशी (bactocera cucurbitae) हे शास्त्रीय नाव असुन (Tephertidae) या कुळातील आहे. फळ माशी ही बहुभक्षी किड असून ती ८१ पेक्षा अधिक पिकांवर आपला जीवनक्रम पूर्ण करते उदा. टरबुज, खरबूज, काकडी , दोडका, भोपळा आदी.
जीवनक्रम
फळमाशीच्या प्रामुख्याने जीवनाच्या अंडी, अळी,(मॅगोट) कोष आणि माशी या चार अवस्था असतात. त्यातील अळी व माशी अवस्था खूपच नुकसानकारक आसतात.मादी साधारणपणे १ -४० अंडी ते फळाच्या सालिमध्ये २-४ मिमी खोल घालतेआणि दोन ते चार दिवसात अंड्यातून अळी बाहेर पडते. अळी (मॅगोट) फळांच्या आतील गर खाते अळी अवस्था ही ६ ते ११ दिवसाची असते त्यानंतर पिकाच्या जवळ जमिनीत तिच्या कोष अवस्थेचा काळ हा एक ते दोन आठवडे असू शकतो. त्यानंतर प्रौढ फळ माशीचा जीवन कालावधी हा ५ ते १५ महिन्यापर्यंत असू शकतो
नुकसानीचा प्रकार
टरबुज व खरबुज याच प्रकारचा वेलवर्गीय प्रजातीवर फळमाशी चा प्रादुर्भाव दिसून येतो हवेतील आर्द्रता ही ६० ते ७० टक्के आणि तापमान व ३२°C च्या खाली येते तेंव्हा या किडींचा प्रादुर्भाव वाढतो. मादी फळमाशी ही फळाच्या सालीमध्ये अंडी घालते. अंड्यातून अळी बाहेर पडते तिला डोके नसते ती अळी फळातील गर खाते त्यामुळे फळ सडायला सुरू होते अणि नंतर फळे गळतात.
एकात्मिक किड व्यवस्थापन
१.पीक काढल्यानंतर खोलवर नागरणी करावी त्यामुळं फळमाशीची कोष अवस्था प्रखर सूर्यप्रकाश मुळे किंवा किटकभक्षी पक्षांमुळे नष्ट होते.
२. आंतर मशागत करून तण वेळोवेळी काढून टाकावे.
३. टरबुज व खरबूज पिकात फुले येण्याच्या वेळी नर फळमाश्यांना आकर्षित करण्यासाठी आमिष असलेलं १०-१५ मक्षिकारी सापळे प्रती हेक्टरी लावावे.
४. प्रौढ फळ माशीच्या नियंत्रणासाठी ४५० ग्रॅम गूळ १० लीटर पाण्यात घालून त्याचे मिश्रण तयार करावे त्यात मलाथिओंन १% ५ मिली टाकावे आणि फूले येण्याची वेळी फवारणी करावी किंवा फ्लुबेंडीअमाईड ८.३३% + डेल्टामेथरीन ५.५६ डब्लु /डब्लु .एस. सी प्रती ५ मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
प्रा. अमोल पांडूरंग ढोरमारे
( कीटकशास्त्र तज्ञ द अग्री- कोड कृषि प्रतिष्ठान खापर पांगरी, बीड)

