गहू निर्यातीवर सर्जिकल स्ट्राईक असे एका इंग्रजी दैनिकाचे हेडिंग आहे. खरे तर हे सर्जिकल स्ट्राईक शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर आहे. यासंदर्भात, गहू निर्यातीवर बंदी म्हणजे अप्रत्यक्षात शेतकऱ्यांवर सर्जिकल स्ट्राईक आहे, अशी भूमिका भारत कृषक समाज या संघटनेने घेतली आहे.
भारताने दोन दिवसांपूर्वीच गव्हाच्या निर्यातीवर तत्काळ बंदी घातली आहे. अन्न-धान्याच्या किंमती नियंत्रित ठेवण्यासाठी ही निर्यात रोखण्यात आल्याचे सरकारकडून सागंण्यात आले आहे. दरम्यान, भारताच्या या निर्णयानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात गव्हाच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत
भारताने गव्हावर निर्यातबंदी लादल्यानंतर शिकागो मार्केटमध्ये 6 टक्क्यांनी जुलै गहू वायदे भाव वाढले. युक्रेनमधील पुरवठा रखडल्याने आधीच अडचणीत आलेला जागतिक गहू पुरवठा आता भारताच्या निर्यातबंदीनंतर अधिकच पेचप्रसंगात सापडला आहे.
रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार अमेरिका, फ्रान्स या प्रमुख निर्यातदार देशांमध्ये प्रतिकूल हवामानामुळे गहू उत्पादन घटणार आहे. भारतातही मार्च मधील उष्ण लाटेमुळे गव्हाचे उत्पादन 10 कोटी टनाच्या आत असेल.
एप्रिलमध्ये 11 लाख टन गहू निर्यात झाला होता आणि. 40 लाख टनाचे सौदे झाले होते. ज्यांना एलसी प्राप्त झाली त्यांची निर्यात सुरू असेल. दरम्यान, इजिप्तला गहू निर्यातबंदीतून वगळण्यात आल्याचे रिपोर्ट्स आहेत.
credit – Deepak Chavan.