पंधरा मे ला दक्षिण अंदमानात येणारा मान्सून केरळात येण्याच्या तारखेशी तसा अर्थार्थी मागील उपलब्ध डाटानुसार संबंध जाणवत नाही, असे ह. विभाग स्पष्ट करतांना, लेटेस्ट बातमीनुसार सांख्यिकी मॉडेल आधारित मान्सून आगमनाच्या खालील ६ कसोट्यानुसार २७ मे ला मान्सून जरी केरळात दाखल होण्याची शक्यता असली तरी मॉडेलचा फरक हा अधिक व उणे ४ दिवसाचा होवु शकतो म्हणजेच मान्सून ३१ मे किंवा १ जून किंवा ती तारीख २३ मे सुद्धा होवु शकते. असा अर्थ मॉडेल दर्शवते.
सहा कसोट्या i) जम्मू काश्मीर, यू पी ते राजस्थान अश्या ६ राज्यातील पहाटे ५ चे किमान तापमान. ii) केरळ, ता. नाडूमधील अतितीव्र पूर्वमोसमी पाऊस. iii) दक्षिण चीन समोरील विषववृत्त नजीक असलेल्या समुद्री पाण्याचे रात्रीतून होणारे उष्णतेचे उत्सर्जन iv) जावा सुमात्रा बेटे, मलेशिया इंडोनेशीया लगतच्या समुद्रावरील पाण्याच्या पृष्ठभागापासून २ किमी पर्यंत उंची दरम्यानपर्यंत वाहणाऱ्या वाऱ्याची दिशा व गती v) वरील(iv) मधील क्षेत्रातील विषवृत्तदरम्यान वाहणारे वारे vi) दक्षिण अमेरिकेच्या पेरू चिली समोरील आग्नेय पॅसिफिक महासागरातील पाण्याचे रात्रीतून होणारे उष्णतेचे उत्सर्जन इत्यादी सहा कसोट्यावर आधारित सांख्यिकी मॉडेल भारतात मान्सून आगमनाची तारीख ठरवण्यास मदत करतात.
बघू या मान्सून केरळात १ जून ला येतो कि भाकीतप्रमाणे २७ मे ला येतो. असे घडले तर मान्सून महाराष्ट्रात जून च्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी येऊ शकतो.
माणिकराव खुळे, Meteorologist (Retd.),
IMD Pune. ह. मु. वडांगळी ता. सिन्नर, जि. नाशिक