यंदा कांद्याचे नीट पोषण न झाल्यामुळे टिकवण क्षमतेबाबत खूप प्रश्न आहेत…एकूणच खूप कसोटीचे परीक्षा पाहणारे वर्ष आहे…कांदा हे खूप कष्टदायक पीक आहे आणि यंदा तर समस्यांनी परिसिमाच गाठली.
काल सुपर क्वॉलिटी माल होल्ड करण्याबाबत पोस्ट लिहिली आहे. त्याबाबत शेतकरी मित्रांचे फोन आलेत. त्यानुसार – आपण सर्वांनी जो कांदा दोन महिन्यावंर टिकू शकत नाही, त्याच्या विक्रीसाठी वाट मोकळी करून द्यावी…आणि दोन महिन्यांवर टिकू शकेल असा माल आज तरी रोखण्याची गरज आहे असे प्रतिपादन शेतमाल बाजारभाव अभ्यासक श्री दीपक चव्हाण सर यांनी कांदा उत्पादक शेतकऱयांना केले आहे
आपल्या असहायतेचा फायदा घेवून नाफेड असो वा व्यापारी – सुपर क्वॉलिटी मालाची हजार अकराशेत वाट लावता आहेत…हे थांबले पाहिजे, म्हणून आपण आज होणारी कोंडी कमी करण्याची गरज आहे. ज्यांची टिकवण क्षमता कमी आहे, त्यांना विकू द्या…ज्यांचा माल टिकेल त्यांनी थांबून जा.