Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

महाराष्ट्रात थंडीची चाहूल

November 5, 2024

Banana Cultivation : उन्नत तरीके से केले की खेती कैसे करें ?

April 16, 2024

Jowar Market : किसानों को ज्वार सें हुआ करोडो का नुकसान

April 16, 2024
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » लसूण लागवडीचे व्यवस्थापन
शेतीविषयक

लसूण लागवडीचे व्यवस्थापन

Neha SharmaBy Neha SharmaNovember 5, 2022No Comments6 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

लसणात आैषधी  गुणधर्म असून मनुष्याच्या शरीरातील काही रोगांचे नियंत्रण करण्यास याचा उपयोग होतो. कंदवर्गीय पिकांमध्ये भारतात प्राचीन काळापासून व जगात एक महत्वाचे मसाल्याचे पीक म्हणून उपयोग केला जातो. भारतात मध्यप्रदेश, गुजरात, ओरिसा, राजस्थान, उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्र ही राज्ये लसूण लागवडीत आघाडीवर आहेत. महाराष्ट्रात पुणे, नाशिक, धुळे, अहमदनगर, जळगाव व सातारा हे लसूण पिकवणारे प्रमुख जिल्हे आहेत. आपल्या देशातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता प्रती हेक्टरी सरासरी उत्पादकता ४ ते ५ टनात वाढ करून १० ते १२ टन मिळविणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी लसणाच्या अधिक उत्पादन देणा-या जातींची लागवड व योग्य पीक उत्पादन पद्धतीचा अंगीकार करणे आवश्यक आहे.

 

हवामान व लागवडीचा हंगाम

आपल्या देशात सपाट मैदानी भागात लसणासाठी उपयुक्त हवामान नोव्हेंबर ते एप्रिल महिन्यांदरम्यान उपलब्ध असते. त्यामुळे देशभरात ९० टक्के लसणाची लागवड ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात होते. लसूण तापमानास संवेदनशील पीक असून भरपूर व दर्जेदार उत्पादनासाठी लागवडीचा योग्य हंगाम साधणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात लसणाची लागवड ऑक्टोबर महिन्यात करणे योग्य आहे. लसूण हे पीक थंड हवेस प्रतिसाद देते. पण लसणाचा गडुा पक्व होत असताना व काढणीच्या काळात कोरडे हवामान आवश्यक असते. लसणाच्या पाकळ्या लावल्यानंतर पानाची वाढ होते व त्याची संख्या वाढते. हा काळ साधारणपणे ४५ ते ५० दिवसांचा असतो. या काळात रात्रीचे तापमान १० ते १५ अंश सें.ग्रे. व दिवसाचे तापमान २५ ते २८ अंश सें.ग्रे च्या दरम्यान लागते. तसेच हवेत ७० ते ८० टके आद्रता व ११ ते १२ तास सूर्यप्रकाश हवा. यानंतर पाकळ्या पोसू लागतात व गडुा आकाराने वाढू लागतो. हा कालावधी ३० ते ४० दिवसांचा असतो. या काळात हवेतील आद्रता कमी व तापमान वाढलेले पाहिजे. त्यामुळे पात वाळणे, गडुा सुकणे या क्रिया सुलभ होतात. महाराष्ट्रात लसणाची लागवड ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात करावी. उशिरा लागवड झाली तर गड्यांचा आकार कमी होतो, वजन कमी भरते व उत्पादनदेखील कमी येते. थंड व पहाडी क्षेत्रात लावल्या जाणा-या जाती वेगळ्या असतात. या जातीमध्ये १० ते १२ पाकळ्या असतात, परंतु प्रत्येक पाकळ्याचे वजन ४ ते ५ ग्रॅम असल्यामुळे गडुा आकाराने मोठा असतो. या जाती महाराष्ट्रातील हवामानात येत नाहीत. केवळ पाने वाढतात व पाकळ्या तयार होत नाहीत.

 

जमीन

लसणाचा गडुा जमिनीत पोसत असल्याने वाढीकरिता पाण्याचा उत्तम निचरा होणारी भुसभुशीत व कसदार जमीन लागते. जमिनीचा सामू ६ ते ७ असावा. जास्त क्षरीिय अथवा लावणीय जमिनीत उत्पादन कमी होते. मध्यम काळ्या जमिनीत सेंद्रिय खतांचा चांगला पुरवठा करून जास्त उत्पादन घेता येते. भारी काळ्या, चोपण, मुरमाड व हलक्या जमिनीत गडुा नीट पोसला जात नाही. यासाठी अशा जमिनी लसूण लागवडीसाठी टाळाव्यात.

 

सुधारीत जाती

लसूण हे पीक शाखीय अभिवृद्धी पद्धतीने लावले जाते. या पिकात फलधारणा होऊन बी तयार होत नसल्याने स्थानिक वाणातून निवड करून अधिक उत्पादन देणा-या नवीन जाती तयार करण्यात आल्या आहेत. काही जाती स्थानिक नावाने ओळखल्या जातात. जसे, पूर्वी जामनगर, महाबलेश्वर, लाड़वा, मलिक, फवारी, अमलेटा व राजेली गड़ी इत्यादी नावाने प्रचलित आहेत. गेल्या १० ते १२ वर्षात निरनिराळ्या कृषि संशोधन केंद्रात अनेक वाण गोळा करून निवड पद्धतीने सुधारित वाण विकसित करण्याचे काम चालू आहे. संशोधनातून गोदावरी (सिलेक्शन-२), श्वेता (सिलेक्शन-१०), अॅग्रेिफाऊंड व्हाईट (जी-४१), यमुना सफेद (जी-५०), जी-१, जी.जी.–२, जी-२८२, जी-३२३, फुले बसवंत, भीमा ओंकार इत्यादी जाती भारताच्या मैदानी भागाकरिता उपयुक्त आहेत. जी-४१ ही जात जांभळा करपा व तपकिरी करपा या रोगांचा प्रादुर्भाव नसणा-या क्षेत्रात चांगले उत्पादन देते व साठवणक्षमता सुध्दा चांगली आहे. ही जात पुणे, नाशिक, सातारा, अहमदनगर, इत्यादी भागासाठी उपयुक्त आहे. फुले बसवंत व गोदावरी ही जात जांभळ्या रंगाच्या लसूण लागवडीसाठी उपयुक्त आहे. जी-५० या जातीत पाकळ्यांची संख्या 30 ते ४0 पर्यत असते.

 

कांदा व लसूण संशोधन संचालनालयाद्वारे विकसित केलेल्या लसणाच्या जाती

भीमा ओंकार

सन २oo८-०९ मध्ये कोईम्बतूर येथे झालेल्या (ए.अय.सी.आर.पी.) (व्ही.सी.) च्या २६ व्या समूह  बैठकीमध्ये भीमा ऑकार (आय.सी. ५६९७८९) या वाणाला ६ व्या विभागासाठी मान्यता   आली/शिफारस करण्यात आली. कारण भीमा ओंकार ही जात भारतामध्ये (लसूण पीक घेत असणा-या) कोणत्याही भागात यशस्वीपणे वाढू शकते. विभाग ६ (गुजरात, हरियाणा, राजस्थान आणि दिल्ली) लसणाची ही जात अधिकतम उत्पादन आणि चांगली प्रत यासाठी प्रसिद्ध आहे. नालंदा बिहार येथील स्थानिक वाणांची कृन्तक निवड करून ही जात विकसित केली आहे. या जातीच्या असतात. प्रत्येक कांद्यामध्ये १८ ते २० पाकळ्या असतात. एकूण विद्राव्य घटकांचे प्रमाण ४१.२ टक्क्यांपर्यंत असते. मध्यम हिरव्या रंगाची थोडीशी अवतल पाने विविध क्षेत्रांमध्ये प्रायोगिक तत्वावर केलेल्या उत्पादनाच्या पाहणीनुसार उत्पादनाचे प्रमाण ८० ते १४o किंवटल प्रती हेक्टर पर्यंत असते. सरासरी उत्पादन १o७.६ किंवटल प्रती हेक्टर एवढे असते. पानांच्या रोगांना प्रतिकारक्षम आहे.

 

भीमा परपल

भीमा परपल (आय.सी. ५७o७४२) ही जात लसूण पीक घेत असणा-या | भारतातील कोणत्याही भागात यशस्वीपणे वाढू शकते. म्हणूनच विभाग ३ (दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा बिहार आणि पंजाब) आणि विभाग ४ (महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश) या विभागांसाठी भीमा परपलला मान्यता देण्यात आली/शिफारस करण्यात आली. लसणाची ही जात अधिकतम उत्पादन आणि चांगली प्रत यासाठी प्रसिद्ध आहे. मध्यम आकाराचा एकसंध जांभळट रंग असणारा, १६ ते २o कळ्या/ पाकळ्या असणारा कांदा (बल्ब) असतो. एकूण विद्राव्य घटकांचे प्रमाण ३३.६ टक्के आणि अॅसिलिन (ताज्या वजनाच्या) प्रमाणे २.५ मि.ग्रॅ. प्रती ग्रॅम तसेच सुकवलेल्या वजनाच्या प्रमाणे ९६ मि.ग्रॅ. प्रती ग्रॅम प्रमाणे असते. मध्यम हिरव्या रंगाची थोडीशी अवलत पाने असतात. सरासरी उत्पादन ६ ते ७ टन प्रती हेक्टर एवढे असते.

 

बियाणे

लसणाची लागवड पाकळी लावून करतात. यासाठी सुधारित जातींचे शुद्ध व खात्रीलायक बेणे वापरावे. पाकळ्या वेगळ्या करताना वरच्या पापुद्रयाला अथवा पाकळ्यांना इजा होणार नाही, याची दक्षता घ्यावी. साधारणपणे १ ते १.५ ग्रॅम वजनाच्या पाकळ्या लागवडीसाठी लागवडीसाठी वापरू नयेत. लहान पाकळ्या लावल्या तर गडु उशिरा तयार होतात व उत्पादन कमी मिळते. मागील हंगामात तयार झालेल्या थंड व कोरड्या जागेत साठवून पुरेशी विश्रांती मिळालेले मोठ्या आकाराचे गडु लागवडीसाठी निवडावेत. एक हेक्टर क्षेत्र लसूण लागवडीकरिता पाकळ्यांच्या आकारानुसार ३00 ते ५oo किलोग्रॅम लसूण लागतात.

 

पूर्व मशागत, रानबांधणी व लागवड

उन्हाळ्यात खोल नांगरट करून २ ते ३ कुळवाच्या पाळ्या घालाव्यात. लसणाचे गडे जमिनीत पोसतात व त्यांची मुळे १५ ते २० सें.मी. खोलीपर्यंत जात असल्याने जमिनीचा ३0 ते ४0 सें.मी. पर्यंतचा भाग भुसभुशीत असणे आवश्यक आहे. शेवटच्या कुळवणीच्या वेळी हेक्टरी २५ ते ३० टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. लसणाची लागवड सपाट वाफ्यात केली जाते. त्यासाठी जमिनीच्या उताराप्रमाणे ४ × २ किंवा ३ x २ मीटर अंतराचे सपाट वाफे तयार करावेत. जमिनीचा उतार जास्त असल्यास लहान आकाराचे सपाट वाफे तयार करावेत. जमीन सपाट असल्यास १.५ ते २ मीटर रुंद व १o ते १२ मीटर लांब सरी वाफे तयार करून लागवडीसाठी वापरता येतात. लागवडीसाठी निवडलेल्या पाकळ्या सपाट वाफ्यात रुंदीशी समांतर १५ सें.मी. अंतरावर खुरप्प्याने रेघा पाडून त्यात १० सें.मी. अंतरावर पाकळ्या उभ्या लावून कोरड्या मातीने झाकाव्यात. उभ्या पाकळ्या लावल्यामुळे एकसारखी उगवण होते. सपाट वाफ्यात ढेकळे जास्त असल्यास हलके पाणी देऊन वापर कांदा व लसूण पिकात होत आहे. राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन केंद्राने गेली तीन वर्षे कांदा व लसणासाठी ठिबक व तुषार सिंचनाचे प्रयोग केले. या पद्धतीने पाणी देण्यासाठी रानबांधणी वेगळ्या प्रकारे करावी लागते. यासाठी १२0 सें.मी. रुंदीचे ४0 ते ६0 मीटर लांबीचे व १५ सें.मी. उंचीचे गादी वाफे ट्रॅक्टरला जोडता येणा-या सरी यंत्राने तयार करावेत. सरी यंत्राच्या फाळाची दोन टोके १६५ सें.मी. अंतरावर कायम करून ट्रॅक्टर चालविला तर १२0 सें.मी. रुंदीचा गादी वाफा तयार होतो व वाफ्याच्या दोन्ही कडेला ७५ सें.मी. रुंदीच्या दोन सा-या तयार होतात. या जागेचा उपयोग फवारणी करणे, गवत काढणे, नळ्यांचे व पिकांचे निरीक्षण करणे इत्यादी कामासाठी होतो. तुषार किंवा ठिबक सिंचनासाठी पाईप, उपपाईप व ठिबक नळ्या यांची शेतात कायमची सोय करणे आवश्यक असते. ठिबक किंवा तुषार सिंचनावर लागवड करताना संच चालवून वाफ्यांना पाणी द्यावे व नंतर वाफ्यावर पाकळ्याची टोकणी करावी. लागवडीपूर्वी लसणाच्या पाकळ्या १0 लीटर पाण्यात २0 मि.ली. कार्बोसल्फान व १५ ग्रॅम कार्बन्डॅझिमच्या द्रावणात दोन तास बुडवून मग लागवड करावी. या संबंधी प्रात्यक्षिक व तांत्रिक सल्ला केंद्रावर दिला जातो.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

Banana Cultivation : उन्नत तरीके से केले की खेती कैसे करें ?

April 16, 2024

Jowar Market : किसानों को ज्वार सें हुआ करोडो का नुकसान

April 16, 2024

ROSE CULTIVATION : पॉलीहाउस में गुलाब लगाकर कमाएं लाखों रुपए।

April 12, 2024

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

महाराष्ट्रात थंडीची चाहूल

हवामान November 5, 2024

सध्या ऑक्टोबर हिटचा प्रभाव अजूनही जाणवत आहे. पण लवकरच महाराष्ट्रात थंडीचीही चाहूल लागू शकते. सध्या…

Banana Cultivation : उन्नत तरीके से केले की खेती कैसे करें ?

April 16, 2024

Jowar Market : किसानों को ज्वार सें हुआ करोडो का नुकसान

April 16, 2024

ROSE CULTIVATION : पॉलीहाउस में गुलाब लगाकर कमाएं लाखों रुपए।

April 12, 2024

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.