राज्यात मागील आठवडाभरात पाऊस चांगलाच बरसला असून मागील 2-3 दिवसांत राज्यात बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी बघायला मिळाली. काल देखील कोल्हापूर,मुंबई, ठाणे, पुणे, अहमदनगर, विदर्भ, सातारा-सांगलीत अधिक पाऊस झाला. पुढील 1-2 दिवसांत महाराष्ट्राच्या आणखी भागांतून मान्सून माघारची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटलं आहे.
राज्यात परतीच्या पावसाने लोकांना हैराण केलं असून उत्तराखंड, उत्तर प्रदेश, गुजरात आणि मध्य प्रदेशातून मान्सूनने परतीचा प्रवास केल्याचं सांगितलं जातंय. परतीच्या पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यात शेतमालाचे मोठे नुकसान केले आहे . मका आणि सोयाबीनचे सर्वाधिक नुकसान झाल्याचं समजत आहे यामुळे शेतकऱ्यांची आणि नागरिकांची तारांबळ उडाली आहे.
हवामान विभागाने पुन्हा पावसाचा अंदाज व्यक्त करत म्हटलं आहे की, येत्या 5 दिवसात अनेक जिल्ह्यांत तीव्र स्वरुपाचा पाऊस होऊ शकतो. आता मुंबईसह ठाणे जिल्ह्यातही पुढील दोन दिवस पाऊस होण्याचा अंदाज आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, जालना या जिल्ह्यांमध्येही आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. औरंगाबाद, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये बुधवारपर्यंत मेघगर्जनेसह पाऊस बरसण्याची शक्यता आहे.