महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक शब्द वापरून शिवाजी महाराजांची अवहेलना केल्याच्या निषेधार्थ सर्वधर्मीय शिवप्रेमी पुणेकरतर्फे मंगळवार दि 13 डिसेंबर रोजी पुणे बंद आयोजित करण्यात आला आहे तसेच मुक मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. केंद्र सरकारने राज्यपाल कोशारी यांची तातडीने हकालपट्टी करावी, कोशारी यांनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी, भारतीय जनता पक्षानेही माफी मागावी, तसेच वाचाळवीर मंत्र्यांवर तातडीने कारवाई करावी या मागणीसाठी मंगळवारी पुणे बंद व मुकमोर्चा आयोजित केला आहे.
सकाळी 9.30 वाजता डेक्कन जिमखाना येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मुक मोर्चास प्रारंभ होणार आहे. डेक्कन जिमखाना, अलका चित्रपटगृह चौक, मार्गे लक्ष्मी रस्त्याने बेलबाग चौकातून लालमहाल येथे मुक मोर्चाची सांगता जाहीर सभेने होणार आहे. या मुकमोर्चात पुणे शहर व जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळाने या बंदला पाठिंबा दिला आहे तसेच मंडळांचे कार्यकर्ते या मुकमोर्चात सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर विविध सामाजिक संघटना, संस्था, रिक्षा संघटना, व्यापारी संघटना, विविध पक्षाचे नेते व कार्यकर्ते, सर्वस्वी नागरिक स्वयंस्फूर्तीने या बंद व मोर्चात सहभागी होणार आहेत