घोटवडे गावातील रहिवासी कै.विजया कृष्णदास मेहता यांची नात व नामवंत CA श्री. सुरेश मेहता यांची कंन्या IAS संपदा मेहता यांची भारताच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांच्या खाजगी सचिवपदी 5 वर्षांकरिता झालेल्या निवडी मुळे तालुक्यात सर्वत्र उत्साहाचे वातावरण पसरले असून त्यांचे सर्वत्र जोरदार कौतुक होत आहे.
घोटवडे गाव व पंचक्रोशितील नागरिकांचा IAS संपदा मेहता यांचा जंगी “कौतुक सोहळा” करण्याचा मानस आहे.
सीए. सौ. संपदा मेहता, IAS, यांचा अल्प परिचय:-
जन्म पुणे दिनांक १६ जानेवारी, १९८२.
अतिशय दैदिप्यमान शैक्षणिक कामगिरी.
प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण: – हुजूरपागा, पुणे -४११ ०३०.
महाविद्यालयीन शिक्षण: – सर परशुराम भाऊ महाविद्यालय, पुणे -४११ ०३०.
इयत्ता दहावी – पुणे विभागात गुणवत्ता यादीत.
इयत्ता बारावी – वाणिज्य शाखा – पुणे विभाग सर्व प्रथम.
सनदी लेखापाल अभ्यासक्रम – सुरेश के मेहता आणि कंपनी, पुणे.
परीक्षा उत्तीर्ण २००४-CA Final.
सन २००६- UPSC- पहिल्यांदा निवड केंद्रीय उत्पादन शुल्क विभाग – Central Excise, गाझियाबाद येथे एक वर्ष.
सन २००७-UPSC- दुसऱ्यांदा निवड- आयकर विभाग- नागपूर.
सन २००८-UPSC- तिसऱ्यांदा निवड- भारतीय प्रशासन सेवा -IAS- महाराष्ट्र राज्य स्तरावर प्रथम क्रमांक.
मसुरी येथे एक वर्षाचे प्रशिक्षण.
२००९ – महाराष्ट्र राज्य सेवेत IAS अधिकारी म्हणून रुजू
नंतर
१. जळगाव जिल्हा उपजिल्हाधिकारी,
२.नाशिक – आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी,
३. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हा परिषद – मुख्य कार्यकारी अधिकारी,
४. नंतर पुणे येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आणि कृषी कार्यालयात विवीध पदांची जबाबदारी,
५.व्यवस्थापकीय संचालक – हाफकिन इन्स्टिट्यूट, मुंबई,
६. जिल्हाधिकारी, मुख्य मुंबई,
७. नंतर वस्तू आणि सेवा कर विभाग – सहसंचालक, मुंबई,
८. नंतर संचालक, राजस्व विभाग, केंद्रीय अर्थ मंत्रालय, नवी दिल्ली.
९. आताची नियुक्ती – मा. महामहीम राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू यांच्या खाजगी सचिवपदी ११ सप्टेंबर रोजी नियुक्ती.
स्काऊट गाईड समभाग आणि प्रशासकीय प्रशिक्षणाच्या निमित्ताने परदेश दौरे.
पती श्री रणजीत कुमार, IAS-2008 – महाराष्ट्र राज्य.
सध्या कर्मचारी आणि प्रशिक्षण विभाग, उत्तर प्रभाग, ( Department of Personnel and Training, New Delhi, North block ) येथे सहसचिव (Joint Secretary) या पदावर कार्यरत.