राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे पक्षातर्फे सोमवारी 31 ऑक्टोबर अधिकृत ट्वीटर हॅंडल वरून कळवण्यात आले आहे.
81 वर्षीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात नेण्यात आले असून पुढील तीन दिवस ते दाखल राहतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसने या निवेदनात म्हटले आहे.
पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी अधिकृत पत्राद्वारे केलेल्या विनंतीनुसार, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर जमू नये,” असेही यात म्हटले आहे.