मुलगी शिकली प्रगती झाली ही समाधानाची बाब असली तरी, या वाढलेल्या शिक्षणाने सर्वच समाजासमोर एक वेगळाच प्रश्न उभा राहिला आहे. मुली शिकल्या, त्यामुळे त्यांच्या अपेक्षाही वाढल्या. किमान आपल्यापेक्षा जास्त शिकलेला अन् सरकारी किंवा चांगला पगार असलेला नोकरीवाला मुलगा असावा ही मुलींची अपेक्षा पूर्ण करणारे अनुरूप मुले मिळत नसल्याने मुलांसोबतच आता मुलींच्याही विवाहाचे वय वाढतच असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
तुळशीच्या लग्नापासून म्हणजे ९ नोव्हेंबरपासून वधू-वर शोधमोहीम सुरू होईल. मुलींच्या अपेक्षा वाढल्याने अनेक मुलांचे लग्नाचे वय संपत चालले आहे. जिल्ह्यात विवाहयोग्य २२०० मुलांमागे १२२ विवाहयोग्य मुली आहेत. मुलींचे प्रमाण खूप कमी असल्याने अनेक मुले भेटतील या आशेने अनुरूप उपवराच्या शोधात मुलीकडचे नातेवाईकही वर्षानुवर्षं संशोधन सुरू ठेवतात.
या आहेत मुलींच्या अपेक्षा
■ शासकीय किंवा चांगल्या पगाराची नोकरी हवी दहा ते पंधरा एकर शेती हवी. पण शेतकरी नको
घर स्वतःचे असावे, चारचाकी गाडी घरी असावी आई-वडिलांना सोडून बाहेरगाची नोकरी करणारा हवा
मुलगा दिसायला चांगला व निर्व्यसनी हवा
मुलीही करिअर घडविण्यात मग्न
विवाहाची जबाबदारी पडण्यापूर्वी करिअर घडविणे हल्लीच्या मुला-मुलींना योग्य वाटते. मग शिक्षण, नोकरी, स्पर्धा परीक्षांच्या नादात त्याच्याही नकळत विवाहयोग्य वय वाढत जाते. नोकरी मिळाल्यानंतरही त्यात स्थैर्य हवे अशा अपेक्षेने काही मुले स्वतःच उशिरा बोहल्यावर चढतात. अशीच स्थिती मुलीच्या बाबतीत असते.