गत आठवड्यात पाकिस्थान मध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. या झालेल्या जोरदार पावसाने पाकिस्थानात जवळजवळ शेतीचे पूर्णच नुकसान झाले आहे, परिणामी पाकिस्थानात अन्नधान्य पुरवठा विस्कळित व उत्पन्नात नुकसाणीने कृषी उत्पादित मालाची चांगलीच महागाई वाढली आहे.
अश्या या प्रसंगी पाकिस्थान देशाला कृषी उत्पादित माल आयात करण्याखेरीज पर्याय नसल्याचे चित्र स्पष्ट होतांनाही दिसून आले आहे. यात भारतीय निर्यात धोरणांचे योग्य नियोजन केल्यास भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला कृषिचा ठसा उमटण्याची संधी चालून आली आहे, त्याच बरोबर भारतीय शेतकऱ्याला निर्यात धोरणातून चांगली प्रगती साधता येऊ शकते. या व अनेक चर्चा सध्या शेतकरी वर्गात चांगल्याच रंगू लागल्या आहेत.
यात आंतरराष्ट्रीय स्तरावर दोन्ही देशात आज पहिली बैठक झाली खरी, पण भारत-पाक, आयत – निर्यात धोरणाविषयी कुठलाही ठोस निर्णय झाला नाही.
असफल झालेल्या भारत-पाक, आयत – निर्यात धोरणांची सकारात्मक चर्चा होत नसेल तर, पाकिस्तान सरकार यूएई मध्ये येत असलेला कृषी उत्पादित माल पाकिस्थानात आणण्याचा दुसरा मार्ग चाचपत आहे. यातून भारतीय शेतकऱ्यांना व भारत सरकारला कमी आणि यूएई सरकारला व व्यापारी वर्गाला याचा अधिक फायदा होईल, आणि भारत चालून आलेल्या संधीपासून लांब लोटला जाईल.