पशुपालन व्यवसायात सर्वाधिक खर्च काढला तर तो चारा आणि पशुखाद्य यांवर होतो. हे प्रमाण एकूण खर्चाच्या ७० ते ७५ टक्के असते. उत्पादन देणा-या एकदल, द्विदल व बहुचर्षिक चारापिकांची निवड करून वर्षभर हिरव्या चा-यांचे उत्पादन त्यासाठी आवश्यक आहे.
पशू आहारामध्ये ७० टक्के भाग हिरव्या व सुक्या चान्याचा असतो आणि ३० टक्के भाग ह्या पशुखाद्याचा असतो. हे लक्षात घेता हिरव्या व सुक्या चा-याचे वार्षिक नियोजन करणे महत्चाचे आहे. वर्षभर हिरवा चारा मिळवण्यासाठी हंगामानुसार पेरणी करणे गरजेचे आहे; परंतु मारवेल इत्यादी; तसेच रब्बी हंगामात बस्सीम, लसूणघास, मका व ओट तर उन्हाळ्थात मका, ज्वारी, चवळी इत्यादी या चारापिकांची लागवड़ कराची.
चा-याचे नियोजन
पूर्ण वाढ झालेल्या दुधाळ गाईला साधारणपणे १५ किलो एकदल व द्विदल चान्याची व ५ किलो सुक्या चा-याची गरज असते. यासाठी एका दुभत्या गाईला १० गुंठे जमीन आवश्यक असते. जर एखाद्या शेतक-याकडे ५ ते ६ दुभत्या गाई असतील, तर त्यानुसार ६० गुंठे क्षेत्रावर चारापिकांची लागवड करणे गरजेचे आहे. एक गाईसाठी वार्षिक चारापिकांचे नियोजन करायचे असल्यास हिरवा चारा ९ ते १० टन व सुका चारा २ ते २.५ टन आवश्यक आहे. यानुसार ६ गाईंसाठी ६० गुंठे जमीन आवश्यक आहे. यातून अंदाजे ५५ ते ६० टन हिरवा चारा व २० ते २५ टन सुका चारा जनावरांना उपलब्ध होऊ शकेल. सुक्यचा-यासाठी ज्वारीचा वापर कराचा किंवा संकरित नेपीअर, मारवेलसुद्धा योग्य प्रमाणात वाळवून जनावरांच्या आहारात वापरता येऊ शकतो. एकदल व द्विदल चारा कुट्टी करून एकत्र करून घ्यावा. संकरित नेपिअर बांधाच्या कडेने लावावे. कोणताही चारा ५० टक्के फुलो-यात असताना कापणी केल्यास जास्त अन्नघटक त्यापासून मिळतात. तीन वर्षांनंतर पिकांचा फेरपालट करावा.
चा-यासाठी मका लागवड
लागवडीसाठी सुपीक, कसदार व निचरायुक्त, मध्यम ते भारी जमीन या पिकाच्या वाढीसाठी आवश्यक आहे. लागवडीसाठी जमिनीची एक खोल नांगरट करून घ्यावी. नंतर कुळवाच्या दोन ते तीन पाळ्या देऊन जमीन चांगल्या प्रकारे भुसभुशीत करून व्यवस्थितरीत्या शेत पेरणीपूर्वी तयार करून घ्यावे. पेरणी वेळेत करणे उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्चाचे आहे. पेरणीसाठी हेक्टरी ७५ केिली बियाणे लागेल. पेरणी पाभरीने ३० सेंमी. अंतरावर करावी. लागवडीपूर्वी १० किलो बियाण्यास २५० ग्रॅम जिवाणुसंवर्धकाची बीजप्रक्रिया करावी.
पेरणीपूर्वी २० ते २५ गाड्या शेणखत अथवा कंपोस्ट खत जमिनीत मशागतीच्या वेळी चांगले मिसळून द्यावे. पेरणीच्या वेळी प्रतिहेक्टर १०० किलो नत्र, ५० किलो पालाश आणि ५० किलो स्फुरद द्यावे. पेरणीनंतर साधारणपणे एक महिन्याने नत्राचा दुसरा हसा हेक्टरी ५० किलो या प्रमाणात द्यावा. पीकवाढीच्या सुरुवातीच्या काळात एक कोळपणी व एक खुरपणी करावी. पिकांची वाढ व्यवस्थितरीत्या होण्यासाठी ७ ते ८ पाण्याच्या पाळथा द्यान्था लागतात. कापणी साधारणपणे ५० टक्के फुलो-यात असताना करावी. साधारणपणे योग्य व्यवस्थापन मक्याचे हेक्टरी ५५० ते ७oo किंटल हिरव्या चा-याचे उत्पादन मिळते.
क्र. | चारा पिकांचे नाव | पेरणीची वेळ | सुधारित वाण |
---|---|---|---|
१ | ज्वारी | अॉक्टोंबर | रुचिरा ,फुले अमृता ,पुसा चारी , एमपी चारी |
२ | मका | अॉक्टोंबर – नोव्हेंबर | मांजरी काॅम्पोझीट,विजय , गंगा , सफेदी २ |
३ | ओट | अॉक्टोंबर – नोव्हेंबर | फुले हरिता ,जेएचओ ८२२ |
४ | बरसीम | अॉक्टोंबर – नोव्हेंबर | वरदान मेस्कावी जेवी -१ जेएचबी-१४६ |
५ | लघुनघास | अॉक्टोंबर – नोव्हेंबर | आरएल – ८८ , सिरसा ९ , आनंद -२ |