जय किसान शेतकरी मित्रांनो आज आपण बटाटा या पिकाचे सप्टेंबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत काय भाव रहाण्याची शक्यता आहे या विषयावर चर्चा करणार आहोत. भाजीपाल्यामध्ये सर्वात जास्त वापरला जाणारा बटाटा हा प्रक्रिया युक्त भाजीपाल्यामध्ये पण सर्वात आघाडीवर आहे. वर्षभर सातत्याने मागणी आणि पुरवठाही भरपूर पहायला मिळतो. एवढं असूनही आजपर्यंत चा इतिहास हे दाखवतो की बटाट्याने होलसेल 40 रुपये किलो पेक्षा जास्त उंची गाठली नाही.
बटाट्याचे बाजार भाव हे पुर्णतः कोल्ड स्टोरेज मध्ये किती स्टॉक आहे यावरच अवलंबून असतात. मागील 15/20 वर्षाचा बाजार भाव आढावा घेतला तर एक गोष्ट लक्षात येते की साधारण एप्रिल ते सप्टेंबर आणि ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत बटाट्याचे बाजार भाव हे एका समान पातळीवर स्थिरावलेले दिसतात.म्हणजे एप्रिल ते सप्टेंबर महिन्यात समजा 14 ते 18 ही भाव पातळी असली तर आक्टोबर ते डिसेंबर इथं ही पातळी साधारण पणे 16 ते 20 रुपये पर्यंत वाढते .याचे महत्त्वाचे कारण इथे टप्याटप्याने माल बाजारात उपलब्ध केला जातो. मागील 2020 या वर्षाचा विचार करता फेब्रुवारी महिना सोडला तर सातत्याने बटाट्याचे बाजार भाव 20 ते 28 रुपये दरम्यान पहायला मिळाले.तर 15 सप्टेंबर ते 10 डिसेंबर 2020 या कालावधीत आजपर्यंत च्या सर्वात जास्त उच्चांकी पातळीवर म्हणजे 30 ते 40 रुपये किलो पर्यंत पहायला मिळाले .हे होलसेल चे भाव आहे आणि किरकोळ विक्री प्रथमच 50+ रुपये गेलेली पहायला मिळाली.याच्या उलटं 2021 मध्ये अपवाद वगळता एकही दिवस बटाट्याचे भाव 22 रुपये किलो पेक्षा जास्त उंची वर गेलेले दिसले नाही. 2022 सप्टेंबर ते डिसेंबर चा विचार करता खरिपातील बटाटा लागवड चे प्रमाण कमी असल्याचे पहायला मिळते.मात्र फेब्रुवारी 2022 चे भाव असे दर्शवतात की कोल्डस्टोरेज चा स्टॉक हा पुर्ण ताकदीने झाला आहे. आणि खरिपाच्या लागवडी कमी असल्या तरी कोल्डस्टोरेजचा पुरवठा 15 नोव्हेंबर पर्यंत तरी चांगल्यापैकी टिकून राहण्याची शक्यता आहे.
त्यानंतर मात्र बटाट्याची आवकं मर्यादित रहाण्याची शक्यता आहे.सध्याची भाव पातळी 18 ते 22 रुपये किलो ही रेंज 1 डिसेंबर 2022 पर्यंत कायम रहाण्याची शक्यता आहे.1 डिसेंबर नंतर बटाट्याचे भाव 22 रुपये पेक्षा जास्त होऊन कदाचित 25+ पण होण्याची शक्यता दिसते. उत्तर प्रदेश बिहार पश्चिम बंगाल आसाम ही राज्ये 2022 ला फार मोठ्या दुष्काळाला सामोरी जात आहे.आणि या राज्यांमध्ये भारतातील एकूण बटाटा उत्पादनापैकी 60/70% उत्पादन होतं असल्यामुळे 2023 च्या बटाटा पुरवठ्यावर निश्चित परिणाम होणार आहे. त्यामुळे सध्या रब्बीतील बटाटा लागवडीसाठी चांगली संधी निर्माण झाली आहे.कदाचित 2023 ला 2020 ची पुनरावृत्ती होऊन बटाट्याचे बाजार भाव 20+ रुपये किलो 2023 ला जास्तीत जास्त दिवस टिकून रहाण्याची शक्यता आहे . बाजार भावाचे असेच अपडेट मिळवण्यासाठी आपल्या Shivaji Awate शेती बाजार भाव विचार मंच या युट्यूब चॅनलला भेट देऊन सबस्क्राईब करा धन्यवाद. 🙏🙏 शिवाजी आवटे 9/9/2022