सध्या पावसाने सगळीकडे दाणादाण केली आहे. अनेक ठिकाणी यामुळे पूर आला असून रोडवर दरडी पडल्या आहेत. धरणे देखील भरू लागली आहेत. राज्यभर सुरू असलेल्या या पावसाचा जोर सोमवारी कायम होता.
मंगळवारी सकाळपासून पुन्हा बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू आहे. यामुळे हा जोर वाढतच चालला आहे. दरम्यान, यामध्ये पुणे, सातारा, रत्नागिरी, ठाणे या जिल्ह्यांना ऑरेंज देण्यात आला आहे. तर विदर्भ, खानदेश, मराठवाडा या ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुढील काही दिवस पावसाचा हा जोर कायम असणार आहे. रायगड, रत्नागिरी, पालघर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट दिला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यांमध्ये पुढील चार दिवस पावसाचा जोर वाढणार आहे.
यामुळे नद्यांना पूर देखील येण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी सध्या नद्यांना पूर आले आहेत. तसेच धरणे देखील भरायला लागली आहेत. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन पश्चिम किनारी, कोकण, त्याचबरोबर विदर्भातील काही भागात पावसाचा जोर वाढणार आहे.
सध्या अनेक नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे. अनेक ठिकाणी रोडवर पाणी आले असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे. शेतीची कामे सध्या सुरू झाली आहेत.