Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

महाराष्ट्रात थंडीची चाहूल

November 5, 2024

Banana Cultivation : उन्नत तरीके से केले की खेती कैसे करें ?

April 16, 2024

Jowar Market : किसानों को ज्वार सें हुआ करोडो का नुकसान

April 16, 2024
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत अनुदान योजनेचा लाभ देण्यात येणार !
ताज्या बातम्या

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत अनुदान योजनेचा लाभ देण्यात येणार !

Neha SharmaBy Neha SharmaApril 24, 2022Updated:April 24, 2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत अनुदान योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. या व्याज सवलत योजनेमध्ये विहित मुदतीत अल्प मुदत पीककर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून कर्जावर व्याज सवलत देण्यात येते. या योजनेमध्ये जे शेतकऱ्यांनी विहित मुदतीत कर्जाची परतफेड करतील त्यांना व्याज सवलत देण्यात येते.

फायदे –
व्याजात सवलत मिळण्यासाठी शेतकऱ्यांना पीककर्जाची मुदतीत परतफेड करतील, त्यामुळे बँकांची वसुली वाढून त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल.

व्याज सवलतीमध्ये दोन टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांना आता तीन लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी पीककर्ज उपलब्ध होईल. त्यातून वेळेवर कृषी निविष्ठांची खरेदी शक्य होईल. शेतकऱ्यांना उत्पादन वाढ मिळण्यास मदत होईल.

काय आहे योजना –या योजनेत विहित मुदतीत अल्प मुदत पीककर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना एक १ लाख रुपये कर्ज मर्यादेपर्यंत ३ टक्के व्याज सवलत दिली जाते. तर १ ते ३ लाख रुपये या कर्ज मर्यादेपर्यंत व्याजदरात १ टक्का सवलत देण्यात येत होती. त्यात आता १ ते ३ लाख रुपये मर्यादेपर्यंत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी अल्प मुदत पीककर्जाची परतफेड मुदतीमध्ये केल्यास त्यांना अधिक २ टक्के व्याज दरात सवलत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत १२ जून २०२१ रोजी घेण्यात आला. त्यानुसार आता विहित मुदतीत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ३ लाख रुपये मर्यादेपर्यंत्या कर्जावर सरसकट ३ टक्के व्याज सवलत राज्य शासनामार्फत मिळेल.

तसेच केंद्र शासनामार्फत ३ लाख रुपये कर्ज मर्यादेपर्यंत अल्प मुदत पीककर्जाची परतफेड जर केली, तर २ टक्के व्याज सवलत मिळणार आहे. त्यामुळे आता २०२१-२२ पासून शेतकऱ्यांना ३ लाख रुपये कर्ज मर्यादेपर्यंत अल्प मुदतीच्या कर्जाची परतफेड ही मुदतीमध्ये केल्यास त्यांना एकूण ६ टक्के व्याज सवलत मिळणार आहे. म्हणजेच त्यांना पीककर्ज हे शून्य टक्के व्याज दराने उपलब्ध होणार आहे.

…असा आहे योजनेचा इतिहास –
राज्यातील शेतकऱ्यांना कमी दरात पीककर्ज देणारे धोरण १९९१ मध्ये आणले गेले होते. तेव्हा दहा हजारांपर्यंतचे पीककर्ज वेळेत फेडल्यास ४ टक्के व्याजसवलत मिळत होती.

१९९९ मध्ये या धोरणाला डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना असे नामकरण केले गेले. कर्जमर्यादा २५ हजार रुपयांपर्यंत केली गेली.

२००७ मध्ये ही मर्यादा तीन लाखापर्यंत नेली गेली. मात्र व्याज सवलत फक्त दोन टक्के होती.

२०१२ पासून शेतकऱ्यांना एक लाखापर्यंतच्या पीककर्जावर तीन टक्के व्याज सवलत दिली जाऊ लागली. एक लाखापासून पुढे तीन लाखांपर्यंत अल्पमुदत पीककर्ज वेळेत फेडले तर एक टक्का व्याजसवलत मिळत होती.

या योजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी शासनाने सहकार आयुक्तांकडे दिलेली आहे. जिल्हास्तरावर उपनिबंधकांकडून (डीडीआर) या योजनेचा आढावा घेतला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीही अडचण असल्यास तालुका किंवा जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे दाद मागता येते.

संदर्भ : अग्रोवोन

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

Pm Surya Ghar Yojana : मोदी सरकार की नई योजना; एक करोड़ घरों को मिलेगी मुफ्त बिजली, ऐसे करें आवेदन।

March 30, 2024

Summer Management Of Dairy Animal : गर्मियों में ऐसे करे डेयरी पशुओं की देखभाल।

March 29, 2024

Agriculture Market : चुनाव की आपाधापी में किसान संकट में; सोयाबीन और चना सहित कृषि उपज की कीमतों में गिरावट।

March 28, 2024

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

महाराष्ट्रात थंडीची चाहूल

हवामान November 5, 2024

सध्या ऑक्टोबर हिटचा प्रभाव अजूनही जाणवत आहे. पण लवकरच महाराष्ट्रात थंडीचीही चाहूल लागू शकते. सध्या…

Banana Cultivation : उन्नत तरीके से केले की खेती कैसे करें ?

April 16, 2024

Jowar Market : किसानों को ज्वार सें हुआ करोडो का नुकसान

April 16, 2024

ROSE CULTIVATION : पॉलीहाउस में गुलाब लगाकर कमाएं लाखों रुपए।

April 12, 2024

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.