नमस्कार आज बीट या पिकाचे बाजार भाव या विषयी चर्चा करणार आहोत.बीटचे भाव हे मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती हा आधार धरून मांडणार आहोत जिथे वर्षे भर सातत्याने बीटची आवकं चालू रहाते. आणि मालाचे वितरण बऱ्याच राज्यांमध्ये होते.तर 2022 बीट बाजार भावचा आढावा घेतला तर थोडंसं पाठीमागे जाऊन पहाता 2021 च्या डिसेंबर महिन्यात 40 रुपये किलो पर्यंत भाव होते. जानेवारी 2022 ला ते 25/30 रुपये दरम्यान पहायला मिळतात. 15 फेब्रुवारी नंतर भाव घसरले ते 20 रुपये वरून 12 रुपये पर्यंत खाली आले. मार्च ते मे महिन्याच्या 10 तारखेपर्यंत 4/10 रुपये दरम्यान चालले. 10 मे पासून पुन्हा वाढायला सुरुवात झाली.
अलीकडच्या काळात कोल्डस्टोरेज मध्ये बीट साठवणूक वाढतं आहे. 5/6 रुपये दर हा शेतकऱ्यांना परवडत नाही मग तिथे साठवणूक वाढते आणि. बीट ची साठवणूक क्षमता 3/4 महिन्यापर्यंत असल्यामुळे जसे भाव चालतील तसा स्टॉक चा माल बाजारात उपलब्ध होतो.
जेव्हा कुठच्याही पिकांचे भाव जास्त खाली येतात तेव्हा लागवड घटते आणि मोठ्या प्रमाणात भाव वाढले की लागवड वाढते हा सर्वसामान्य नियम सर्व शेतकऱ्यांना ज्ञात आहे.जसे मार्च एप्रिल महिन्यात भाव घटले त्यांचे परिणाम जुन महिन्यात दिसायला लागले आणि बीटचे भाव 20/25 रुपये किलो झाले. आणि थोड्याफार फरकाने अजूनही ते टिकून आहे.
आता पुढे ऑगस्ट ते ऑक्टोबर 2022 चा विचार करता एक गोष्ट पहिली लक्षात घ्यावी लागेल की जास्त पाऊस असेल तर कमी वयाचे बीटचे पिक लवकर बळी पडते.एक महिन्याचे पिक सतत चा पाऊस सहन करत नाही. मागिल 10 वर्षाचा आढावा घेतला तर ऑगस्ट सप्टेंबर महिन्यातील बीट लागवड चांगले भाव खाऊन गेली आहे.
2019 ला 15 सप्टेंबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान 30/35 रुपये होते.2020 ला याच कालावधीत आतापर्यंतच्या बीटच्या बाजार भावाने रेकॉर्ड ब्रेक करत नवीन उंची गाठली . ते 60 रुपये पर्यंत वाढले 4/2 दिवस तर 75 रुपये किलो चा भाव दाखवला . आणि 2021 ला सप्टेंबर आक्टोबर 20 रुपये दरम्यान पहायला मिळाला.आणी पुढे नोव्हेंबर डिसेंबर 30/40 रुपये पहायला मिळाले.
आता ऑगस्ट 2022 चा विचार करता बीटचे भाव सध्या च्या सरासरी 20 रुपये पेक्षा जास्त रहाण्याची शक्यता आहे . ऑगस्ट 25+ राहू शकतो.सप्टेंबर आणि आणि आक्टोबर 25 ते 35 रुपये दरम्यान पहायला मिळू शकतात.मात्र 15 नोव्हेंबर 2022 नंतर बीट ची आवकं वाढण्याची शक्यता आहे.
शिवाजी आवटे

